विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - द सांबा किंग्ज

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in विशेष
16 Jun 2010 - 7:38 pm
फिफा२०१०

काय मग लोक्स..... काय भारी माहौल बनतोय की नाही मिपावर फुटबॉलचा? डॉन, प्रभो, मेघवेडा... धमाल उडवतायत! आकडेवारी काय, टीम्सच्या फॉर्मची चर्चा काय, मोठमोठ्या स्टार खेळाडूंची ओळख काय.... ओहोहोहो.... बहार आलिये ! बाहेर पाऊस, हातात - गरमागरम चहा / कॉफी... वाफाळणारी भजी (किंवा थंडगार बीअर आणि दाणे), आमचा गणपा म्हणतो त्याप्रमाणे "आपलं आवड्त्या व्यक्तीचा सहवास" आणि समोर चाललेला रंगतदार सामना (आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज).... अशी चैन करत नसाल तर खरंच एक सोहळा मिस करताय बरं का.

काय टाकलाय भौ जर्मनीनी ऑस्ट्रेलियाला... आयव्हरी कोस्ट काय खेळलं बघित्तलंत? हॉलंड आहे...इंग्लंड नेहेमीसारखं माती खातंय... सगळं काही मस्त चाललंय. पण काल पोर्तुगल आयव्हरी कोस्ट मध्ये ऐकलंत? टीव्ही कमेंटेटर्स सुद्धा म्हणत होते... आज "बझ" थोडा जास्तच आहे. पण तो कशासाठी जास्त होता? ड्रॉग्बासाठी की क्रिस्तियानो साठी?? नाय - कारण - "the Brazilians are in town" - आज ब्राझील खेळणार म्हणून.

अरे काय जर्मनी, स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल, हॉलंड घेऊन बसलात..... हा... सगळे भारी खेळतातच ... शंकाच नाही. जर्मनीचा वेग, स्पेनचा "परिपूर्ण" खेळ, इंग्लंडचं "स्टारडम", इटलीचा भक्कम बचाव, हॉलंडची अनपेक्षित खेळ करण्याची ताकद .... सगळं सगळं मान्य... पण कोणीही मान्य करील की ब्राझील हा फुटबॉलच्या सिनेमाची हिरॉईन आहे. फुटबॉलचं जर काही ग्लॅमर असेल....काही सेक्स अपील असेल... काही oomph factor असेल.. काही सौंदर्य असेल, नजाकत असेल, अदा असेल.. घायाळ करणारं असं काही असेल तर ते फक्त आणि फक्त ब्राझील आहे. ब्राझील म्हणजे फुटबॉलची मधुबाला, माधुरी दीक्षित, अँजेलीना जोली आणि मेरलिन मोन्रोदेखील ! तिच्याशिवाय कसले वर्ल्डकप आणि कसला फुटबॉल?

म्हणतात ना “The English invented football, the Brazilians perfected it”. अरे एखाद्या खेळावर जर पोटच्या पोरासारखं प्रेम केलंत... त्याच्यासाठी प्रेमिकांसारखे झुरलात... घरच्या वडीलधार्‍यासारखी त्याची काळजी घेतलीत तर अजून काय होणार? दुनियेत फिफाचे २०८ सदस्य देश आहेत. पण आत्तापर्यंतची प्रत्येक विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव संघ म्हणून फक्त ब्राझीलच मिरवू शकतो. पुढची स्पर्धा २०१४ मध्ये ब्राझीलमध्येच व्हायची आहे... तेव्हा तिथेही ते असणारच ! लोकं कुठकुठल्या टीम्सची पात्रता फेरीतली कामगिरी कशी होती, त्यांचा सध्याचा "फॉर्म" कसा आहे, त्यांचे डावपेच कसे असू शकतील, त्यांची "काँबिनेशन्स" कशी असतील, त्यांच्या प्रशिक्षकामुळे काय फरक पडू शकेल, कुठल्या संघाविरुद्ध ते कसा खेळ करतील, काय योजना आखतील असल्या एक ना दोन.. हजारभर गोष्टींबद्दल चर्चा करूदेत. ब्राझीलबद्दल काय चर्चा करणार डोंबल? आकडे, फॉर्म, स्टार खेळाडू, प्रतिस्पर्धी ह्या सगळ्या पलिकडे गेलेली लोकं आहेत ही.

समजा, ब्राझील अगदी मरत मरत पात्र ठरलं असेल, तरी आहे कोणाची हिंमत त्यांना "संभाव्य विश्वविजेत्यांत" न गणायची? आणि सगळ्यांना चेचत अंतिम फेरीपर्यंत पोचले तरी अंतिम सामना जिंकतीलच ह्याचीही गॅरंटी नाही! तेव्हा कुठे ह्यांचे आकडे न काय घेऊन बसायचं? त्यांचे डावपेच - त्यांना ठाऊक असतील तेव्हाच तुम्हाला कळतील ना? ठीके - ४-४-२ नी खेळणार.... मधल्या फळीतले काका, दादा पुढे बॉल देणार...पुढे दोघे आक्रमण करणार.. पण जरका गोलरक्षकाच्या शेजारी उभा असणं अपेक्षित असलेल्या रोबेर्टो कार्लोसला गोल मारायची हुक्की आली तर कोण काय करणार?? डाव्या बाजूनी एकटाच घुसेल न गोलकीपर भानावर यायच्या आत गोल मारून कॉर्नरच्या झेंड्याशेजारी नाचत बसेल! कसलं प्लॅनिंग आणि कसली "स्ट्रॅटेजी" ! आणि कार्लोस, रोनाल्डो, बेबेतो, रोमारिओ, झीटो, गारिंचा, सॉक्रेटस, रिवाल्डो, पेले, टॅफॅरेल, सध्याचा कोच डुंगा ही नावं बदलली आणि त्या जागी काका, लुइझाओ, गिल्वेर्टो सिल्व्हा, ज्युलियो सेझार, रोबिन्हो ही नावं घातलीत तरी विशेष फरक पडत नाही. कारण ह्या पिवळे शर्ट घालून खेळणार्‍यांचे देह वेगवेगळे असले तरी त्यांचं फुटबॉल खेळण्याच "डोकं" एकच असतं. फुटबॉलचं मैदान हा कोणासाठी रणभूमी असते, कोणासाठी आपले गुण दाखवायचं "शोकेस", कोणासाठी प्रेरणास्थान तर कोणासाठी तीर्थक्षेत्र. पण विश्वचषक खेळणार्‍या प्रत्येक ब्राझीलियनसाठी ते असतं एक मोठ्ठं कॅनव्हास. आणि हे ११ कलाकार त्या कॅनव्हासवर आपल्या अचाट दैवदत्त प्रतिभेचं आणि अपार कष्टांचं चित्र रेखाटतात. कधी ते जमून येतं - कधी तितकंस येतही नाही. एक मात्र नक्की, ब्राझील आपल्या चाहत्यांना रटाळ खेळानी निराश मात्र कधीच करत नाही.

पण भौ... ब्राझील म्हणजे हरफनमौला, मस्तकलंदर, मौजमजा करणारा, मनोरंजन करणारा संघ एवढंच वाटत असेल तर अजून १८ वेळा विचार करा. ह्यांच्या आचरटपणाचा इतिहास खूप मोठा आहे. १८ व्यांदा विश्वचषक खेळतायत ते! ५ वेळा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ आहे हा. २ वेळा उपविजेता तर २ वेळा उपांत्य फेरीत हारलेत. १९३८ नंतर फक्त एकदा त्यांना दुसर्‍या फेरीत जाण्यात अपयश आलं आहे. तब्बल ८ वेळा "कोपा अमेरिका" आणि ३ वेळा "कन्फेडरेशन्स कप" जिंकणारा हा संघ फिफाच्या जागतिक क्रमवारीत सर्वांत जास्त वेळा अव्वल स्थानावर राहिला आहे. २०१०च्या स्पर्धेतही त्यांना प्रथम मानांकन आहे.

संघः

गोलरक्षक: - ज्युलियो सेझार, गोम्स, दोनी

बचावफळी - माइकॉन, लुशिओ, उआन, लुइझाओ, थिएगो सिल्व्हा आणि गरज पडल्यास कोणीही

मधली फळी - सँटोस लेइट्टे (काका), गिल्बेर्टो सिल्व्हा (आबा), क्लेबर्सन (मामा), ज्युलिओ बॅप्टिस्टा (दादा), एलानो (भाऊ), फेलीपे मेलो (आण्णा) आणि रामिरेझ (छोटू - आमच्या वर्ल्डकपच्या मॅचला यायचं हं)

आक्रमक - तसे सगळेच. पण नावंच घ्यायची झाली तर फॅबियानो, रोबिन्हो, निलमार आणि ग्राफिटे

साक्षात रोनाल्डिन्हो, मार्सेलोसारख्या दिग्गजांना संघाबाहेर ठेवणारा डुंगा त्यांचा प्रशिक्षक आहे. "विजय मिळवण्यासाठी आम्ही अनाकर्षक फुटबॉल खेळायला देखील तयार आहोत" असं त्यानं आधीच जाहीर केलंय. त्यातला दुसरा भाग - अनाकर्षक खेळण्याचा - त्याच्या संघाला कधीच जमणार नाही ही गोष्ट निराळी! पण विजेतेपदासाठी भुकेला ब्राझील हा आकर्षक खेळणार्‍या ब्राझीलपेक्षा नक्कीच जास्त धोकादायक ठरू शकतो. पोर्तुगल, आयव्हरी कोस्ट आणि उत्तर कोरियाच्या "ग्रुप ऑफ डेथ" मध्ये सुद्धा ब्राझीलचा दुसर्‍या फेरीतला प्रवेश निश्चित मानला जातोय ते काही उगाच नाही. पुढे स्पेन किंवा चिलीसारखा मातब्बर प्रतिस्पर्धी येऊ शकतो. पण सामना कोणाशीही असो, ब्राझील "अंडरडॉग्ज" कधीच नसतील. काल उत्तर कोरियाला नमवलं तरी आयव्हरी कोस्टचा पोर्तुगलविरुद्धचा खेळ बघता पुढच्या फेरीत जाण्यासाठी ब्राझीलला सर्वोत्तम खेळ करावा लागणार हे स्पष्ट दिसतंय.

ब्राझीलची ताकद - मधल्या फळीतली गिल्बेर्टो सिल्व्हा - काका आणि आघाडीची फाबियानो - रोबिन्हो ह्या दुकली. जगातला कोणताही बचाव भेदण्याची क्षमता. जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि खेळाकडे "खेळ" म्हणून पाहण्याची वृत्ती !

ब्राझीलचे कच्चे दुवे - बचावातल्या सातत्याचा अभाव.

ब्राझीलची संधी - अर्थातच विजेतेपदाची. उप-उपांत्यपूर्व सामना सर्वांत महत्त्वाचा.

ब्राझीलला हरवू शकतील असे संघ
- खुद्द ब्राझील!

थोडक्यात काय.... निवांत मागे टेकून बसा, पाय समोर ठेवा, आवडती खाद्यं - पेयं जवळ ठेवा आणि "के सेरा सेरा" म्हणत ब्राझीलच्या खेळाचा लुत्फ लुटा ! तो हो ज्जाय !

प्रतिक्रिया

प्रभो's picture

16 Jun 2010 - 7:48 pm | प्रभो

>>ब्राझील म्हणजे फुटबॉलची मधुबाला, माधुरी दीक्षित, अँजेलीना जोली आणि मेरलिन मोन्रोदेखील ! तिच्याशिवाय कसले वर्ल्डकप आणि कसला फुटबॉल?

मस्तच रे. जे पी......

पण पहिल्या मॅच ला मजा नाय आला एवढा... मायकॉनने बाजी पलटवली... :)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2010 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll

अरे प्रभ्या पण मायकनने मारलेला गोल पाहीलास का? काय अशक्य कोनातून मारला होता. हॅटस् ऑफ. मानायचे तर याच कारणासाठी. बाकी कोरीयाला कमी उंचीचा तोटा होत होता. :( नाहीतर पहीले ४५ मिनीटे त्यांचा बचाव केवळ अभेद्यच होता.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

प्रभो's picture

17 Jun 2010 - 7:34 pm | प्रभो

अरे पुप्या, तसं म्हटलं तर काल स्पेन विरूध्द स्वित्झर्लंडनेपण एक गोल मारला आणी स्पेन हारली. मी एवढच म्हणालो की ब्राझील ज्या प्रकारच्या खेळासाठी प्रसिध्द आहे तो खेळ परवा त्यांनी केला नाही...सो मला तेवढी मजा नाही आली... बस.....
अशक्य कोनासाठी मला रॉबर्टो कार्लोसचा गोल आवडतो. ०.९ कोनातून केलेला...मायकॉन चा गोल अ‍ॅटलीस्ट १० डीग्री कोनातून केला आहे.

गणपा's picture

17 Jun 2010 - 7:43 pm | गणपा

माताय हे कोनमाकप कुठुन आणलस रे भौ.

प्रभो's picture

17 Jun 2010 - 7:45 pm | प्रभो

इंटरनेट जिंदाबाद...परवा ब्राझीलच्या मॅच आधी नेटवर हुंदडताना सापडलं...

मेघवेडा's picture

17 Jun 2010 - 7:49 pm | मेघवेडा

कर्कटक, गुण्या वगैरे सुद्धा आहेत काय रे?

:D

गणपा's picture

17 Jun 2010 - 7:56 pm | गणपा

खालची सही राहीली ओ हरी तात्या ;)
--पुराव्यानीशी शाबीत

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 1:10 am | मेघवेडा

__/\__

तुला नाही रे.. त्या जादूगाराला! बेण्ड इट लाईक कार्लोस! :) मस्तच!!

गणपा's picture

16 Jun 2010 - 8:02 pm | गणपा

एकदम चाबुक

>>(आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज)
इतकी यथार्थ उपमा.. क्लास !!!!!
=))

मेघवेडा's picture

16 Jun 2010 - 8:23 pm | मेघवेडा

एकच शब्द - दर्जा! च्याम्मायला वरचा क्लास अगदी! काल डान्याचा 'स्पेन' वरला लेख या लेखमालेतला सर्वोत्तम म्हणत होतो आज तो मान तुला रे राजा! सुंदर लिहिलंय!

>>.. आणि रामिरेझ (छोटू - आमच्या वर्ल्डकपच्या मॅचला यायचं हं)

=)) =)) =))

पण प्रभ्या म्हणतो तसं कालच्या मॅचला मजा नाय आली! आयव्हरी कोस्ट झुंजवणार असं वाटतंय! (ये रे जेप्या.. वेलकम टू द क्लब. तुझीच वाट बघत होतो.. काय म्हणतोस? ब्राझील आमच्या जर्मनीला डावलून वर्ल्ड कप जिंकणार? हॅहॅहॅ! आयव्हरी कोस्ट ला हरवू दे आधी! हॅहॅहॅ!!) :D

जे.पी.मॉर्गन's picture

17 Jun 2010 - 11:13 am | जे.पी.मॉर्गन

कोरियाविरुद्ध मजा नाय आली हे खरंय.... विथ ब्राझील, मजा कान्ट बी टू फार ! :). त्यांना फॉर्म वगैरे काही लागत नाही रे.... एका दिवशी मनात आलं तर जर्मनीलादेखील चेचतील B)

जे पी

केशवसुमार's picture

16 Jun 2010 - 8:39 pm | केशवसुमार

ब्राझील मधे आहे आणि सध्याच्या इथल्या वातावरणाबद्दल मी काय बोलू...फुटबॉल साठी देश/लोक किती वेडी असू शकतात हे जवळून अनुभवतो आहे..
सगळा देश पिवळ्या आणि हिरव्या रंगात नाहून निघाला आहे.. गाड्यांना / घराच्या खिडक्यांना, गॅलरी मध्ये ,ऑफिसात डेस्कवर ब्राझील चे झेंडे लावलेले आहेत.. रस्त्या रस्त्यावर पिवळ्या हिरव्या पताका आहेत..सोसायटीज, हॉटेल मध्ये मोठ्ठे स्क्रिन, टॅक्सी मध्ये पोर्टेबल टिव्ही लावलेले आहेत..टिव्ही वरचा कुठलाही चॅनेल घ्या ..फक्त फुटबॉल आणि फुटबॉल..
ब्राझिलच्या मॅच च्या दिवशी तर विचारू नका..सर्व ऑफिसेस मध्ये चपराश्या पासून मालक/मॅनेजर सगळे ब्रझिल चा टीशर्ट मध्ये, मॅचच्या दोन तासा द्धी ऑफिसेस बंद..रस्ते ओस..बिगुल, तुतार्‍या, ढोल.. लहान मुलांपासून म्हातार्‍या कोतार्‍यांपर्यंत, स्त्री, पुरुष.. एकच विषय फुटबॉल..फुटबॉल.. फुटबॉल..
मॅच आधी सर्व जय्यत तयारी.. खाणे पिणे सर्व टिव्ही समोर तयार..संपुर्ण कुटुंब.. मित्रमंडळी टिव्हीपुढे हजर..कोण ११ खेळाडू खेळवावेत, काय व्युहरचना असवी ह्यावर चर्चा.. पहिला गोल कोण मारणार .. बेटस..मारलेल्या प्रत्येक कीक वर प्रत्येक जण अधिकार वाणी ने , तावा तावाने बोलतो.. वाद..प्रतिवाद..फसफसलेले ग्लास (पेले !!) ब्राझिल कडून गोल झाल्यावर ५ -१० मिनिटे फक्त आरोळ्या,किंकाळ्या, शिट्ट्या, फटाके नाच , मिठ्या, चुंबने.. काही विचारू नका.. एखाद्या खेळाबद्दल इतके वेड जगात मी कुठेच बघितले नाही.. आणि ब्राझिलवर गोल झाला तर गोली / डिफेन्स, व्यवस्थापक, प्रशिक्षक ह्यांच्या खानदनाचा उद्धार.. स्वतः चे/सगळ्यांचे स्वांत्वन आणि पुन्हा जोरजोरात प्रोत्साहन.. शेवटच्या सेकंदापर्यंत ब्राझिलच जिंकणार हा दुर्दंम्य आत्मविश्वास..
माझ्या सारखा क्रिकेटप्रेमी माणसाला हा सगळा प्रकार अचंबित करतो..
सगळे वातावरण अवर्णनीय..
जस्ट बी पार्ट ऑफ ईट अ‍ॅड एंन्जॉय...
ब्राझिल...
ब्राझिल...
ब्राझिल...ब्राझिल...ब्राझिल..

फुटाबॉलच्या पंढरीत संतांच्या पावलांचे दर्शन..
DSCN0259DSCN0260DSCN0261

टारझन's picture

16 Jun 2010 - 9:19 pm | टारझन

मॉर्गनचा लेख सुंदर ...
आणि केसुंची अनुभवाची किनार असलेली प्रतिक्रीया तर फारंच रोमांचित करणारी @@
जियो ब्राझिल ... माझ्या २-३ चॅट मैत्रिणी आहेत ब्राझिल च्या , काय भरभरुन बोलतात फुटबॉल बद्दल , थकत नाहीत आज्जिबात :)

चतुरंग's picture

16 Jun 2010 - 10:32 pm | चतुरंग

जबरा प्रतिक्रिया आणि उच्च फोटू!

(अवांतर - शेवटल्या फोटूत ब्लॅकपर्लच्या पावलांच्या शेजारी आमच्याही गुर्जींच्या पावलांचे दर्शन झाले आणि धन्य झालो! ;))

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

17 Jun 2010 - 2:08 am | भडकमकर मास्तर

सँटोस लेइट्टे (काका), गिल्बेर्टो सिल्व्हा (आबा), क्लेबर्सन (मामा), ज्युलिओ बॅप्टिस्टा (दादा), एलानो (भाऊ), फेलीपे मेलो (आण्णा) आणि रामिरेझ (छोटू - आमच्या वर्ल्डकपच्या मॅचला यायचं हं)

हे काका मामा अण्णा दादा भाऊ छॉटू बेष्टच्....सर्व लेखच उत्तम जमला आहे... ___________

केसुचा प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव झकास... आणि पावलांचे मनोहारी दर्शन घडवलंत , आनंद वाटला...
अवांतर : गद्यातही कोटी ( फसफसणारे पेले)करायचा मोह आवरलेला नाही हे पाहून आनंद वाटला...
:)

राघव's picture

17 Jun 2010 - 1:13 am | राघव

जेपीशेठ तसेही कहर लिहितातच.. [आन् थ्ये फुढचं खेळीया सोधास्नी कुठं गेलं तं ठाव नाय.. :W ]
त्यात असला प्रतिसाद म्हणजे ब्येश्टेश्ट!

बाकी कोणाला काय म्हणायचे ते म्हणोत.. आपण डायहार्ड ब्राझील फ्यान आहोत! :X
तो बोलो.. ब्राझीssssssल लल्लारालारालारालाss... >:D< >:D<

राघव

चतुरंग's picture

16 Jun 2010 - 8:53 pm | चतुरंग

मधली फळी - सँटोस लेइट्टे (काका), गिल्बेर्टो सिल्व्हा (आबा), क्लेबर्सन (मामा), ज्युलिओ बॅप्टिस्टा (दादा), एलानो (भाऊ), फेलीपे मेलो (आण्णा) आणि रामिरेझ (छोटू - आमच्या वर्ल्डकपच्या मॅचला यायचं हं)

हे लै भारी!! =)) =))

तंत्र आणि शास्त्र बाजूला ठेवून फुटबॉल हा एक कला म्हणून खेळणारे सांबा हे मला मैदानावरचा मिखाईल ताल वाटतो!

(काका)चतुरंग

Nile's picture

2 Jul 2010 - 9:56 pm | Nile

आजच्या हरण्याचे दु:ख अनावर झाल्याने आम्ही काही तासांचा जालिय सन्यास घेत आहोत.

-निले (पेले) गेले

-Nile

प्रभो's picture

2 Jul 2010 - 9:58 pm | प्रभो

झोपायला चाल्लायस ते सांग की सरळ....

भारद्वाज's picture

16 Jun 2010 - 9:22 pm | भारद्वाज

ब्राझीलला हरवू शकतील असे संघ - खुद्द ब्राझील!

येकदम येकदम ....येकदम बेस डायलॉग
-
जय हिंद जय ब्राझील

गणपा's picture

16 Jun 2010 - 9:30 pm | गणपा

मित्रा डाय्लॉग जरी बेष्ट असला तरी काल उ.कोरियाने फेस आणला होता त्यांच्या तोंडाला ;)

भारद्वाज's picture

17 Jun 2010 - 8:39 am | भारद्वाज

असूंदे की भावा....उत्तर कोरियातल्या टिवल्याबावल्या पोरांना तेवढाच आनंद ;)
-
जय हिंद जय ब्राझील

ऋषिकेश's picture

16 Jun 2010 - 9:35 pm | ऋषिकेश

आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज

हे लै म्हंजे लै भारी

बाकी यंदा स्पेन जिंकणार असली तरी फुटबॉल म्हंटलं की ब्राझिल वॉज, इज अँड विल बी ब्राझिल हे मान्य केलंच पाहिजे :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मेघवेडा's picture

16 Jun 2010 - 9:40 pm | मेघवेडा

>> बाकी यंदा स्पेन जिंकणार असली तरी..
लोल! स्पेन ०-१ स्वित्झर्लंड!

=))

;)

छोटा डॉन's picture

16 Jun 2010 - 9:46 pm | छोटा डॉन

>>बाकी यंदा स्पेन जिंकणार असली तरी..
>>लोल! स्पेन ०-१ स्वित्झर्लंड!
:)
असो, घ्या हसुन मनोसोक्त, हरकत नाही.
आजचा डाव भुताला म्हणुन आम्ही सोडुन देऊ, पुढे आहेच अजुन.

पण लक्षात ठेवा, समजा स्पेन दुसर्‍या नंबराने पुढे गेले तर ब्राझिलला पुढे जाण्यासाठी स्पेनशी खुप लवकर भिडावे लागेल ;)
स्पेनचा पराभव साजरा करताना पुढची रिस्क लक्षात घ्या म्हणजे झाले ;)

अवांतर :
जेपीचा लेख लै भारी, त्यावर आमचा प्रतिसाद शेप्रेट, हे केवळ स्पेनद्वेष्ट्यांना उत्तर :)

------
( कॅल्क्युलेटेड ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा's picture

16 Jun 2010 - 9:54 pm | मेघवेडा

>> तर ब्राझिलला पुढे जाण्यासाठी स्पेनशी खुप लवकर भिडावे लागेल
भिडेनात का.. कधीही भिडूदेत.. उपांत्यपूर्व फेरीत किंवा उप-उपांत्यपूर्व फेरीत.. आमचं काय जातं! काय रे गणपा? ;)

बाकी चालू द्या!
:D

गणपा's picture

16 Jun 2010 - 10:03 pm | गणपा

या प्रतिसादाचा केवळ आणि केवळ उद्देश डॉन्याला डिवचणे हाच आहे

मेघवेडा's picture

16 Jun 2010 - 10:06 pm | मेघवेडा

या प्रतिसादाचाही! :D

स्पेन हरली!!
येऽऽ
धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड..
टिंग टिंग टिंग टिंग टिंग टिंग टिंग टिंग..
धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड धत्ताड तात्ताड..
धुमधुमाक धुम धुमधुमाक धुम धुमधुमाक धुम.. धुऽऽम!!

टारझन's picture

16 Jun 2010 - 9:54 pm | टारझन

आर्रं यौन यौन यणार कोण ? पोर्तुगाल शिवाय हायेच कोण ?
तुम्ही फेका लेको वाफा ... ब्राझिल इंग्लंड स्पेन नं जर्मनीच्या नावानं ..
क्रिस्तियानो ची टिम कप उंचावणार ...

(आपल्याला काय जातंय टिमकी उडवायला ... =)) )

-टारियानो रोणाल्डो

ऋषिकेश's picture

17 Jun 2010 - 6:56 pm | ऋषिकेश

+१
हसून घ्या लेको.. तुर्तास हसण्याकडे दुर्लक्ष करतो :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विनायक पाचलग's picture

16 Jun 2010 - 10:36 pm | विनायक पाचलग

सध्या जर्मनीला फेवर करत असलो तरी ब्राझील इज दा बेस्ट..
मला फुटबॉलची ओळख ब्राझील मुळेच झाली..

२००२ च्या वर्ल्ड कप ची फायनल काही कळत नसताना महाराजांबरोबर एल सी डी वर पाहिला आणि मी फुट्बॉल मय झालो
असो

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Jun 2010 - 11:04 pm | ब्रिटिश टिंग्या

>>२००२ च्या वर्ल्ड कप ची फायनल काही कळत नसताना महाराजांबरोबर एल सी डी वर पाहिला आणि मी फुट्बॉल मय झालो

काही निरीक्षणे -

१. २००२ सालीसुद्धा तुम्हाला काही कळत नव्हते!
२. वर्ल्ड कप ची फायनल तुम्ही महाराजांबरोबर पाहिली.
३. २००२ साली तुम्ही एलसीडी टीव्ही बघत होतात हे दाखवण्याचा आणखी एक केविलवाणा प्रयत्न!

विनायक पाचलग's picture

16 Jun 2010 - 11:17 pm | विनायक पाचलग

नाही हो सरकार
तिथे मला जबरदस्तीने नेलेले होते ...मॅच बघायला...
तेव्हा एल सी डी म्हणजे असे आकर्षण वाटायचे ..काय सांगु राव..
तेव्हा जे ऑलिव्हर कान चा फॅन झालो ते झालोच

( स्वतःची टिमकी नाही हो ,त्या महाराजाना कोण विचारत नाही ,त्यांची मुले पण नाही ,मग त्यांचे नाव घेऊन मी कशाला मिरवु)

(शाळेचा गोल कीपर ) विनायक

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

वेताळ's picture

17 Jun 2010 - 7:10 pm | वेताळ

तो असावा. प्रोजेक्टर असावा. त्यावर तु ती मॅच बघितली असावीस.

वेताळ

टारझन's picture

16 Jun 2010 - 11:18 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

(निरिक्षकांचं णिरिक्षण करण्यात णिरिक्षण मय झालेला) बाडिस चोंग्या

शैलेन्द्र's picture

16 Jun 2010 - 11:23 pm | शैलेन्द्र

का रे छळता पोराला?

सहज's picture

17 Jun 2010 - 7:35 am | सहज

जेपी सरांचा लेख व केसुंचे पेले भारी.

वेताळ's picture

17 Jun 2010 - 12:32 pm | वेताळ

नुसत्या नावाच्या ओझ्यानी जड असलेले संघ आहेत. हे त्यानी आता सिध्द करुन दाखवले आहे.
जर्मनी किंवा इंग्लड जिंकणार हे नक्की आहे.

वेताळ

टुकुल's picture

17 Jun 2010 - 1:08 pm | टुकुल

जेप्या ....
तुझ नाव वाचुन लेख उघडला आणी अपे़क्षाभंग झाला नाही.
प्रतिसाद संपला, धन्यवाद.

--टुकुल

पण जरका गोलरक्षकाच्या शेजारी उभा असणं अपेक्षित असलेल्या रोबेर्टो कार्लोसला गोल मारायची हुक्की आली तर कोण काय करणार?? डाव्या बाजूनी एकटाच घुसेल न गोलकीपर भानावर यायच्या आत गोल मारून कॉर्नरच्या झेंड्याशेजारी नाचत बसेल! कसलं प्लॅनिंग आणि कसली "स्ट्रॅटेजी" !

हे मात्र एकदम पटेश १००% सहमत

बाकि लेख नेहमीप्रमाणे उत्तम

मामु

मी-सौरभ's picture

21 Jun 2010 - 10:40 am | मी-सौरभ

परत एकदा जिंकले...

-----
सौरभ :)

जे.पी.मॉर्गन's picture

21 Jun 2010 - 10:40 am | जे.पी.मॉर्गन

सगळ्या प्रश्नचिन्हांना पूर्णविरामात बदलत ब्राझील पुढच्या फेरीत !!!!

फाबियानोच्या पहिल्या गोलच्या आधीचा "अँकल टच" आणि शेवटचा सेझारचा सेव्ह.... असं फुटबॉल फक्त ब्राझील खेळू शकतं. बाकीच्या टीम्ससाठी धोक्याचा इशारा... "ब्राझील फॉर्मात येतंय"

जे पी

विसुनाना's picture

21 Jun 2010 - 10:57 am | विसुनाना

एक शंकासूर - फाबियानोचा दुसरा गोल हँडबॉल होता ना?

जे.पी.मॉर्गन's picture

21 Jun 2010 - 11:04 am | जे.पी.मॉर्गन

अहो नुसता तो गोलच नाही... अजूनही बराच काही झोल होता =))

काकाचा आगावपणा पाहिलात का? ऑल्मोस्ट मारामारीवर उतरले होते नंतर ! !

पण पुन्हा... असं फुटबॉल सुद्धा ब्राझीलच खेळू जाणे !

जे पी

छोटा डॉन's picture

21 Jun 2010 - 11:16 am | छोटा डॉन

>>पण पुन्हा... असं फुटबॉल सुद्धा ब्राझीलच खेळू जाणे !

+१, काकाच काही दोष नव्हता असे आमचे वैयक्तिक मत आहे.
त्याल बाहेर काढायला नको होते.

असो, थोड्या वेळात आमचे ह्या सामन्याचे 'फोटो परिक्षण' येईल.

------
(दादा)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

विसुनाना's picture

21 Jun 2010 - 1:52 pm | विसुनाना

एक कॉमेंटेटर काका म्हणत होता तर दुसरा कका... नक्की काय?
जर्सीवर स्पेलींग पाहिले तर 'कका' (Kaká )बरोबर वाटते.

कादेर कैटाच्या छातीत कोपर मारल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव म्हणजे - मी नाही त्यातली...(मी नव्हे त्यातला..:) ची हद्द होती..

मेघवेडा's picture

21 Jun 2010 - 10:46 pm | मेघवेडा

कोण
आहे ते ओळखलं की झालं. मग काका म्हणोत, कक्का म्हणोत, काखा म्हणोत की खाका म्हणोत. पाश्चिमात्यांनी गांधींना 'गॅण्ढी' म्हटलेलं आपण समजून घेतोच की. तसंच. आता खेळातलंच उदाहरण घ्यायचं तर आपल्या कुंबळेला तो बॉयकॉट 'क्युंबली' म्हणतो तेही आपण समजून घेतोच की! तसंच! :) आपणही 'दाह्विद व्हिया'* चं सरसकट 'डेव्हिड व्हिला' करतो. तसंच! :)
नावांचे अनेक उच्चार होऊ शकतात आणि त्यातला एखादाच बरोबर आणि बाकी सारे चूक असं लिहिलेलं नाही कुठे.

* हा उच्चारही संपूर्ण बरोबर नाही. हा उच्चार मराठीत लिहिता येणारच नाही कदाचित. असो.

स्वप्निल..'s picture

2 Jul 2010 - 8:51 pm | स्वप्निल..

१-१ ब्राझिल वि. नेदरलँड्स

ब्राझील ला महागात पडु शकतो असा गोल - जो मेलो नी स्वतःच्याच गोल पोस्ट मध्ये केलाय :O

श्रावण मोडक's picture

2 Jul 2010 - 9:38 pm | श्रावण मोडक

गेला. बाजार उठला.
सगळे लेखन मुद्दाम वाचले आत्ता. हीच का ती ब्राझीलची टीम, असा प्रश्न डोक्यात आला आजचा खेळ पाहून. ही वरची ब्राझीलविषयीची कवतिकं बहुदा नेदरलंडच्या टीमला डोळ्यासमोर ठेवून केली असावीत असं वाटून गेलं... अपवाद त्या आचरटपणा, बिचरटपणा, झोल वगैरेंचा.

Nile's picture

2 Jul 2010 - 9:39 pm | Nile

हरलेल्याचं समर्थन नाही पण स्वतःवर केलेल्या गोलनंतर ब्राझिलचे खेळाडू पुर्णपणे 'हगले".

पहिला हाफ पहा आणी दुसरा हाफ पहा मग मी काय म्हणतो आहे ते कळेल. शेवटी, इफ यु कान्ट कंट्रोल द नर्व्ह, यु आर इन ट्रबल. आता ब्राझिलचे स्वागत कसे होते ते कळेलच केसुंकडुन. त्याशिवाय (मागिल एका वर्ल्डकप मध्ये नेदरलंडला हरवुन हिरो बनलेला तेव्हाचा कप्तान आणि आताचा कोच) डुंगाची खरडपट्टी निघणार, तसेही त्याच्यावर खुप टीका होत होतीच. असो. आता आमचे पैसे स्पेनवरती. :-)

स्पेन ब्राझिल फायनल लै भारी झाली असती, स्पेन वील क्रश नेदरलंडस लाईक एनीथिंग.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 9:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी मॅच पाहिली ती ब्राझिलच्या गोलनंतर! आणि बराचसा वेळ बॉल नेदरलंड्सच्याच ताब्यात होता.

अदिती

Nile's picture

2 Jul 2010 - 9:53 pm | Nile

अहो बै, दुसर्‍या हाफमध्ये बॉल नेदरलंडकडे जास्त वेळ होता, पण पुर्ण मॅच मध्ये दोन्ही टीमने बॉल समान वेळ खेळवला.

-Nile

गणपा's picture

2 Jul 2010 - 9:49 pm | गणपा

>>स्पेन ब्राझिल फायनल लै भारी झाली असती, स्पेन वील क्रश नेदरलंडस लाईक एनीथिंग.
ओ निळ्याभौ लै लांबच्या उड्या मारुने. (मंग दात घश्यात जात्यात आपल्याच). पयल्यांदा स्पेनला सेमी चा अडथळा पार करुंद्यात, मंग फायनल ची स्वप्न पाहा :)

मेघवेडा's picture

2 Jul 2010 - 10:11 pm | मेघवेडा

बाडिस!

>> मंग दात घश्यात जात्यात आपल्याच
ताज्या अनुभवातून तरी शिकावं की नै माणसानं काहीतरी.. :P

चतुरंग's picture

2 Jul 2010 - 10:39 pm | चतुरंग

मेवे, माणसानं हा शब्द फारच महत्त्वाचा आहे! B)

चतुरंग

Nile's picture

2 Jul 2010 - 11:40 pm | Nile

सहमत, छोट्या छोट्या गोष्टी माणसानंच शिकाव्यात. खेळाडुंची कथाच निराळी.

-Nile

श्रावण मोडक's picture

2 Jul 2010 - 9:56 pm | श्रावण मोडक

सेल्फ गोल हा अपवाद ठरवण्याची हिंमत असलेला संघच वाटला नाही तो. आणि तुम्ही म्हणता तसं, दुसऱ्या हाफमध्ये आत्मविश्वास लांबच, चेंडूवर प्राथमिक खेळातून नियंत्रण ठेवता येतं हेही ते विसरलेले दिसले. मग शिल्लक राहिला तो फक्त धसमुसळेपणा. म्हणजे, ज्याला पाय घालणं म्हणतात ते अगदी नेमकं करत होते...
असो. आपल्याला फुटबॉलमधलं कैबी कळत नाही. तवा आमची ही एवढीच किक.
अदिती, पॉपकॉर्न आण गं... मी झाडावर बसलोय. :)

Nile's picture

2 Jul 2010 - 10:00 pm | Nile

वरील सर्वं आम्ही एका शब्दात वर्णन केलं आहे, 'हगले'. अजुन काय लिहणे? ;)

असो सन्यास सुरु आहे, पॉपकार्न खा.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचीच आवडती टीम होती म्हणे ती! असो, बाळा तू घे तुझा संन्यास!!
श्रामो, मी आणलेत पॉपकॉर्न ... मस्त दंगा करत खाता येतील!

HUP HOLLAND HUP!

अदिती

श्रावण मोडक's picture

2 Jul 2010 - 10:41 pm | श्रावण मोडक

आम्ही समजायचो मैदानात खेळायचं असतं. हे नवीनच. पण जाऊ द्या राव. आमाला त्यातलं कैबी कळत नाही. उगा शब्दांत पकडण्याचा खेळ व्हायचा. कसंय, की वरही तुम्ही लिहिलं की, हारण्याचं समर्थन करायचं नाही वगैरे. त्यामुळं झालं काय की तुम्हाला तेच करायचं असावं असं वाटू लागतं. ते वाक्य सोडून तुमचा प्रतिसाद लई भारी. तो जणू ब्राझीलच्या विरोधकानंच लिहिला असावा असा आहे. म्हणजे आमचा दृष्टीकोन समजून घ्या इतकीच विनंती. :) (ही स्मायलीही समजून घ्या बरं. डोळा मारलेला नाही. सरळ हघ्या अशी स्मायली आहे).

Nile's picture

2 Jul 2010 - 11:37 pm | Nile

बरोबर आहे, मैदानाच खेळायचं असतं पण जेव्हा तेच होत नाही त्यालाच हगणे म्हणतात(कीती लोकांनी 'शीट' केले, त्या सेल्फ गोलवेळी, हा आकडा यावा उद्या कुठल्या तरी पेप्रात)

त्यामुळं झालं काय की तुम्हाला तेच करायचं असावं असं वाटू लागतं.

मनी वसे ते... :)

तो जणू ब्राझीलच्या विरोधकानंच लिहिला असावा असा आहे.

जसे आम्ही कुठल्याही शिक्क्याचे समर्थक नाही तसेच विरोधकही नाही. त्यामुळे आमचा तो बाब्या ही नस्तं अन तुमचं ते कार्टं ही नसतं. खेळाडूंची वृत्ती खिलाडु, अन प्रेम खेळावर. :)

. सरळ हघ्या अशी स्मायली आहे).
»

तुमच्याच वरील प्रतिसादातील वाक्ये उद्धृत करतो.
>>उगा शब्दांत पकडण्याचा खेळ व्हायचा. कसंय, की वरही तुम्ही लिहिलं की, .... करायचं नाही वगैरे. त्यामुळं झालं काय की तुम्हाला तेच करायचं असावं असं वाटू लागतं.

असो. :)

-Nile

श्रावण मोडक's picture

2 Jul 2010 - 11:59 pm | श्रावण मोडक

फारच त्रास करून घेता बुवा तुम्ही!!! काळजी घ्या. फुटबॉलचा वर्ल्ड कप आज आहे. पुन्हा चार वर्षांनीच येतो. मधला काळ आपल्यालाच काढायचा असतो. म्हणून म्हटलं इतका त्रास नका करून घेत जाऊ. काळजी घ्या.
आम्ही आता काहीही बोलणार नाही बरं...

Nile's picture

3 Jul 2010 - 12:08 am | Nile

हे हे हे, आपल्या लोकांनी निराशा केली की थोडासा त्रास होतोच. पण आमच्या करता फुटबॉल नसानसांत आहे त्यामुळे चार वर्षांने घडत असला तरी तो विस्मरणात जात नाही. :)

बाकी काळाच काय हो, तो काढला नाही तरी जातोच, हाय काय अन नाय काय. बाकी काळजी नाहीच. फक्त सुमार खेळाला सुमार म्हणणे अन एका हाफ मधल्या फिआस्कोलाच टीम म्हणणे ह्यात फार फरक आहे. ब्राझिलच्या एका जुन्या खेळाडुची कंमेट सांगतो.

तो म्हणाला, 'आजच्या मॅचचा पहिला हाफ कुणाच्याही लक्षात राहणार नाही, फक्त दुसरा राहिल'.

-Nile

Nile's picture

3 Jul 2010 - 12:08 am | Nile

हे हे हे, आपल्या लोकांनी निराशा केली की थोडासा त्रास होतोच. पण आमच्या करता फुटबॉल नसानसांत आहे त्यामुळे चार वर्षांने घडत असला तरी तो विस्मरणात जात नाही. :)

बाकी काळाच काय हो, तो काढला नाही तरी जातोच, हाय काय अन नाय काय. बाकी काळजी नाहीच. फक्त सुमार खेळाला सुमार म्हणणे अन एका हाफ मधल्या फिआस्कोलाच टीम म्हणणे ह्यात फार फरक आहे. ब्राझिलच्या एका जुन्या खेळाडुची कंमेट सांगतो.

तो म्हणाला, 'आजच्या मॅचचा पहिला हाफ कुणाच्याही लक्षात राहणार नाही, फक्त दुसरा राहिल'.

-Nile

गणपा's picture

2 Jul 2010 - 9:35 pm | गणपा

हा हा हा यंदाचा विश्वचषक कधी कुणाचे दात कवळी सकट घशात घालेल त्याचा नेम नाही.
भले भले संघ उप्-उपांत्य फेरीच्या आतच ढेपाळलेत.

प्रभो's picture

2 Jul 2010 - 9:39 pm | प्रभो

घाना झिंदाबाद!!!!!

चतुरंग's picture

2 Jul 2010 - 9:44 pm | चतुरंग

आणि एका परीने बरंच झालं म्हणायचं!! आपला आवडता संघ हरताना बघायला कोणाला आवडेल?
ब्राझीलला बहुदा अतिआत्मविश्वास नडला असावा!

चतुरंग

Nile's picture

2 Jul 2010 - 9:48 pm | Nile

दुसर्‍या हाफमध्ये खरंतर आत्मविश्वासाचा अभाव नडला.

-Nile

रंगोजी's picture

2 Jul 2010 - 10:39 pm | रंगोजी

मेलो अण्णा येताना फक्त शर्ट पिवळा घालून आलेले. जाताना बरंच काही पिवळं झालेलं दिसलं!!

-( पिवळा गेल्यावर आता भगवा झेंडा घ्यावा की आकाशी-पांढरा, या गोंधळातला)
रंगोजी

प्रभो's picture

2 Jul 2010 - 10:42 pm | प्रभो

चूक, आज ब्राझील निळे डगले घालून आले होते... :D

रंगोजी's picture

2 Jul 2010 - 11:49 pm | रंगोजी

अर्रर्र .. :? :?
तरीच.. आम्हांस वाटले की आमच्या कृष्णधवल संचातील बिघाडामुळे ब्राझीलच्या हाफ चड्ड्या शर्टपेक्षा फिक्या दिसतायत..
~X( ~X( ~X( ~X(

मेघवेडा's picture

3 Jul 2010 - 12:23 am | मेघवेडा

बोल्डवलेला शब्द ड्वायरेक काळजाला भिडला! ;)

शिल्पा ब's picture

3 Jul 2010 - 2:27 am | शिल्पा ब

सेल्फ गोल करून हरलं हो तुमचं ब्राझील ...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/