रंग होते राग होते गंध होते सोबती
या जीवणिचे हास्य तरीही स्पंदने माझे मागती
चन्द्र होता, होत्या तारका माझ्या संगती
हस्ताचे नक्षत्र तरीही तृषार्त ओठ माझे मागती
एकाचवेळी प्राजक्त आणि रातऱाणी माझ्या सभोवती
या मिठीचा एक क्षण हीच मात्र माझी संजीवनी
कोवळेसे उन होते आज माझ्या अंगणी
मागतो मी मात्र त्या निष्पर्ण तरुची सावली
वाहून गेली कित्येक युगे डोळ्यासमोरूनि
उरल्या मागे केवळ काही क्षणांच्या आठवणी
प्रतिक्रिया
16 Jun 2010 - 12:27 pm | मृत्युन्जय
माझी ही पहिलीच कविता आहे (यानंतर लिहिलेली दुसरी एक कविता आधीच आंतरजालावर प्रकाशित केली आहे). गझल म्हणुन टाकली असली तरी ती गझल अजिबात वाटत नाही अशी एका मित्राची प्रतिक्रिया होती आणी मी लिहिली आहे असे न सांगता एका मित्राला वाचायला दिली तेंव्हा दुसर्याने ही कविता चक्क भटांच्या कवितेवरून चोरली आहे अशी प्रतिक्रिया दिली. मी भटांच्या बर्याच गझला वाचल्या आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव आहे हे मान्य. त्यामुळे कदाचित तसे वाटत असेल. मात्र लिहिताना मला तसे जाणवलेच नाही. मित्राच्या प्रतिक्रियेमुळे मी ही कविता बरेच दिवस प्रकाशित नाही केली.
16 Jun 2010 - 1:07 pm | जागु
पहिली कविता चांगली आहे.
16 Jun 2010 - 1:17 pm | धमाल मुलगा
ओहोहो... क्या बात है! खासच!!!