हा माझा जीव तिच्या...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
29 Mar 2008 - 4:30 am

१ एप्रिल जसा जवळ येऊ लागला तसे मिपाकरांना कसे फुल करवे ह्या विचारत होतोच, तेव्हड्यात चतुरंगशेठचे निवेदन वाचले... आणि डोक्यात किडा आला...१ एप्रिलला अजून ४-५ दिवस बाकी होते.. पण डोक्यात आलेला किडा गप्प कसा बसून देईल.. म्हणलं सगळे जण १ एप्रिलला एप्रिल फुल करतील आपण जरा आधीच करावे..आणि मग आमचा निर्णय प्रकाशित केले..
पण धडाधड आलेल्या प्रतिसादामुळे घाबरलो..म्हणलं जस्त नको ताणायला..फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा..
विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे..एक वेळ ते सगळे बंद पण होईल पण माझे विडंबन अशक्य आहे.. त्यामुळे जर काही लोकांना आनंद झाला असेल तर तो फार काळ टिकणार नाही त्याबद्दल त्याची क्षमा मागतो..
ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते..
तर समस्त फुल मिपाकरांना मनापासून धन्यवाद

परवा तात्याने कुठल्या एका प्रतिसादत कविवर्य सुरेश भट यांची अप्रतिम रचना  मग माझा जीव तुझ्या ... उतरवली होती तीच रचना आमची प्रेरणा ठरली

माझ्या नावा समोर नाव तुझे वाचले
थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले
नावाने मी उगाच हाक तिला मारली,
अन् माझी 'पाय''पीट' रस्त्यातच थाटली!

हा माझा जीव तिच्या लाथेने कळवळेल !
अन्‌ माझी बोंब पुऱ्या अवकाशी ह्या घुमेल !

ती निघेल लगबगीन थोडाशी बावरून;
माझे पाऊल तिच्या पावलात अडखळेल !

मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व
तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल !

चुकुन कधी तू घरात लावशील सांजवात;
सारे घरदार तुझे ज्योतीसम बघ जळेल !

दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील ,
कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !

जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील,
माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
अन सारी डास जात वासाने घुसमटेल !

केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Mar 2008 - 4:46 am | बेसनलाडू

चित्रमय विडंबन आहे.

तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल !

दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील ,
कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !

माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
अन सारी डास जात वासाने घुसमटेल !

हे विशेष आवडले.

(तिरपा)बेसनलाडू

वरदा's picture

29 Mar 2008 - 4:52 am | वरदा

शेवट वाचेपर्यंत विचार करत बसले
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
अन सारी डास जात वासाने घुसमटेल !

मस्तच्....आणि एक्स्प्लेनेशन वाचून जीव भांड्यात पडला....

अघळ पघळ's picture

29 Mar 2008 - 5:38 am | अघळ पघळ

केशवराव पुन्हा लिहिते झालात ते पाहुन बरे वाटले पण ती नसती ओढून ताणून एप्रिल फूल वगैरे थापेबाजी कशासाठी?
"वाचकांना तुमची विडंबने वाचून पोटशुळ होतो" वगैरे त्रागा केलात तो पण 'एप्रिल फूल' काय?

काही (तिरपे) प्रतिसाद वाचल्याने आला तिच्यायला राग आणि रागाच्या भरात केले लिहिणे बंद आता राग ओसरल्यावर आलो पुन्हा परत! अशी प्रांजळ कबुली दिली असती तर काही बिघडले असते का? उलट आम्हाला तरी तुमह्च्या स्ट्रेटफॉरवर्‍डनेसचे कौतुकच वाटले असते ह्या नसत्या थापेबाजीपेक्षा!

चला शेवटी देवदेवता आणि भट ह्यांमध्ये फक्त देवलोकांनाच विडंबनाचे कन्सेशन मिळणार असे दिसतय भटांचे मात्र काही खरे नाही :)
-अघळ पघळ

केशवसुमार's picture

29 Mar 2008 - 8:09 am | केशवसुमार

अघळपघळशेठ्/ताई,
तुम्ही बाकी एकदम बरोब्बर ओळखलत ..कस काय जमत बॉ तुम्हाला?
(आटोपशीर)केशवसुमार

प्राजु's picture

29 Mar 2008 - 6:14 am | प्राजु

दिवस सत्कारणी लागला... केशवाचे विडंबन वाचले आत छान जेवण जाईल.
केशवसुमार,
एप्रिलफुल... चालेल. पण तुम्ही लिहिते झालात हेच चांगले आहे आमच्यासाठी. हे विडंबनही अतिशय खमंग झाले आहे हे सांगणे न लागे...
खूप बरं वाटलं..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

सर्किट's picture

29 Mar 2008 - 7:44 am | सर्किट (not verified)

(केसु, ह्यावेळी मात्र आम्ही तुमच्या "प्रतिसाद न देणार्‍यांत" नाही, बरे का ?)

मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व
तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल !

क्या बात है !!!!!

- (हुळहुळणारा) सर्किट

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 8:05 am | विसोबा खेचर

फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा..

नक्कीच मारला असता तुला! च्यायला तात्याला धमक्या? अरे जो तुझ्या स्नेहाचा भुकेला आहे त्याला विडंबनं बंद वगैरे करण्याच्या धमक्या? शोभतं का तुला हे? :)

विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे..

हे मात्र सह्ही बोल्लास रे भोसडिच्या! (घे! हवी होती ना शिवी? चल, दिली!! ) ;)

ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते..

चलो कोई बात नही! बर्‍याचश्या मंडळींचं हेच म्हणणं होतं. ते तू मानलंस, समजून घ्यायचा प्रयत्न केलास हेच मी तरी महत्वाचं मानतो, मोलाचं मानतो!

चलो, अब हमेशा आगे बढो, यही हमारी शुभकामना!

आता ब्याक टू तुझे विडंबन...

मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व
तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल !

मस्त! 'रोमांचपर्व' हा शब्द आवडला..

जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील,
माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल !

हे कडवं सर्वात मस्त..!

असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो....! :)

आपला,
(केशवाचा शिवराळ मित्र!) तात्या.

ऋषिकेश's picture

29 Mar 2008 - 9:56 am | ऋषिकेश

दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील ,
कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !

हा हा हा :)))
सगळे विडंबनच सह्ही!!.. अजून येऊ दे!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

29 Mar 2008 - 5:59 pm | चतुरंग

मि.पा.च्या रंगमंचावरचा पुनर्प्रवेश एकदम झोकात!
एकदम 'दादा' विडंबन!!;))

(अवांतर - आता तुमच्या स्वागताला एक विडंबन सादर करणं आलं. टाकतो लवकरच.)

चतुरंग

स्वाती राजेश's picture

29 Mar 2008 - 6:05 pm | स्वाती राजेश

त्याबरोबर हे विडंबन सुद्धा....

दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील
कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल
या ओळी मस्त..:)))

केशवसुमार's picture

31 Mar 2008 - 9:47 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार.