कषाय-दान

पुष्कर's picture
पुष्कर in जे न देखे रवी...
8 Jun 2010 - 2:48 pm

(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान)

आता खाद्यात्मके देवे, येणे खाद-यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे, कषाय-दान हे|

जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो
पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे|

मधुमेह्यांचा मेद जावो, विश्व सदुग्ध-कषाये पिवो
जो जें वांछील तो ते लाहो, मानव-जात|

वर्षत सकळ मंगळी, चहाबाजांची मांदियाळी
भरभरून पात्रान्तरी, देत तू चहा|

चला चहापत्तींचे आरव, आसामातले जणू ते गाव
बोलते जें अर्णव, कषायांचे|

वेलची आल्याचे चूरण, मिसळून करी जें प्राशन
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु|

किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती
अथवा कोरा चहा पिती, अखंडित|

आणि कषायोपजीविये, विशेषी लोकी इये
घोटा घोट विजये, होआवे जी|

येथ म्हणे श्री खाद्येश्वरावो, हा होईल दान कषायो
येणे वरे हा शंतनो, तवाना जाला|

- पुष्कर ऊर्फ शंतनु भट

विडंबन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 3:00 pm | नितिन थत्ते

मस्त.

(सर्व प्रकारचा चहा आवदणारा) नितिन थत्ते

तिमा's picture

13 Jun 2010 - 11:20 am | तिमा

कषाय म्हणजे काय हे फक्त अस्सल सारस्वतांनाच कळेल.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

पैसा's picture

4 Sep 2010 - 11:18 pm | पैसा

आमच्या गोव्यात सर्दी झाल्यावर जो काढा करतात, त्याला कषाय (कसाय) म्हणतात!

टारझन's picture

13 Jun 2010 - 11:37 pm | टारझन

=)) =)) =)) हल्ली कसली तरी पेंगुळवाणी रसग्रहणं येत आहेत त्या पेक्षा हे लै भारी आहे ;) जियो !!

- संत खाणेश्वर

पुष्कर's picture

14 Jun 2010 - 11:49 am | पुष्कर

"हल्ली कसली तरी पेंगुळवाणी रसग्रहणं येत आहेत त्या पेक्षा हे लै भारी आहे".. बर बर. धन्यवाद

सागर's picture

26 Jul 2010 - 12:46 pm | सागर

पुष्करा,

सर्वच "कषायदान" हे सुंदर आहे ... केवळ अप्रतिम ...

खास करुन या ओळी फार आवडल्यात

जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो
पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे|

किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती
अथवा कोरा चहा पिती, अखंडित|

आणि कषायोपजीविये, विशेषी लोकी इये
घोटा घोट विजये, होआवे जी|

आणि सुरुवातीचा विनय तर तुझ्या नम्रपणाची पावतीच
(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान)

मन जिंकलस मित्रा :)

पुष्कर's picture

26 Jul 2010 - 8:38 pm | पुष्कर

सागर, आभारी आहे. विनय वगैरे काही नाही (ह्यातही काही विनय नाही.. नाहीतर 'ये तो आपका बडप्पन है' वगैरे कैच्यकै म्हणायचे), पसायदान हे खूप भारी आहे. कषायदानावर हसू येत असेल तर ते मला स्वतःला माझ्या अगाढ अज्ञानाविषयी आणि मूर्खपणाविषयी आलेले हसू आहे.

सागर's picture

8 Aug 2010 - 8:00 pm | सागर

पुष्कर मित्रा,

अशा प्रकारच्या निर्मितीसाठी प्रतिभा लागते ती आहेच तुझ्यापाशी
तेच महत्त्वाचे आहे.
बाकी विष्णुगुप्त लेख मालेमुळे तुझी प्रतिभा जास्त माहिती झाली ...

आता कैच्याकै म्हणून पुन्हा प्रतिसाद देण्यापेक्षा स्वतःला समजाव कसं ;)

पाय जमीनीवर आहेत तेच महत्त्वाचे आहे :)

धन्यवाद सागर. (असं किती वेळा म्हणू!) विष्णुगुप्त काही केल्या पुढे सरकत नाहीये. अजून १ महिना तरी काही खरं नाही.