आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता
मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा
जाई
होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे
( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)
प्रतिक्रिया
28 Mar 2008 - 8:05 pm | विसोबा खेचर
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
क्या बात है, केवळ अप्रतीम...!
एक अत्यंत दर्जेदार, संग्रही ठेवावे असे काव्य, असंच मी म्हणेन...
"सोनाली, जियो....!" अशी मनापासून दाद देतो...
आपला,
(अंतर्मूख!) तात्या.
13 Dec 2022 - 3:17 pm | उत्खनक
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा
जबर. आवडेश.
13 Dec 2022 - 5:41 pm | कर्नलतपस्वी
जबरदस्त.