मनापासुन in जे न देखे रवी... 28 Mar 2008 - 7:19 pm कुणी बाइ गुणगुणले..... रानारानात गेलीबाइ शीळ...... बाई या पावसाने ( संगीत/गायक पु ल) ही गाणी कोणाला आठवतात का? असल्यास त्या कविता इथे द्याल का... आपणास मनापासुन धन्यवाद देइन.... हे ठिकाण प्रतिक्रिया रानारानात गेलि बाइ शीळ 28 Mar 2008 - 7:31 pm | लिखाळ साभार : http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1184.htm रानारानात गेलि बाइ शीळ राया, तुला रे, काळयेळ नाही राया, तुला रे, ताळमेळ नाही थोर राया, तुझं रे कुळशीळ वाहे झरा ग, झुळझुळवाणी तिथं वाऱ्याचि गोड गोड गाणी तिथं राया तु उभा असशील तिथं रायाचे पिकले मळे, वरी आकाश शोभे निळे शरदाच्या ढगाचि त्याला झील येड्यावानी फिरे रानोवना जसा काही ग, मोहन कान्हा हासे जसा ग, राम घननीळ गेले धावून सोडुन सुगी दुर राहून राहिली उगी शोभे कसा ग गालीचा तो तीळ रानि राया ग हा फुलावाणी फुला फुलात मी फुलराणी बाइ, सुवास रानि भरतील फिरु गळ्यात घालुनि गळा, मग घुमव मोहन शिळा, रानि कोकीळ सुर धरतील ! गीत - ना. घ. देशपांडे संगीत - जी. एन्. जोशी स्वर - जी. एन्. जोशी साभार : http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/460.htm कुणि बाई, गुणगुणले गीत माझिया ह्रुदयी ठसले मोदभरे उमलल्या कमलिनी शांत सरोवरि तरंग उठले मानस-मंदीर आनंदले रम्य स्वरांनी मोहित केले चंद्रकरांनी क्षणोक्षणीही अंबर अवघे पुलकित झाले गीत - दत्ता डावजेकर संगीत - दत्ता डावजेकर स्वर - आशा भोसले
प्रतिक्रिया
28 Mar 2008 - 7:31 pm | लिखाळ
साभार : http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1184.htm
रानारानात गेलि बाइ शीळ
राया, तुला रे, काळयेळ नाही
राया, तुला रे, ताळमेळ नाही
थोर राया, तुझं रे कुळशीळ
वाहे झरा ग, झुळझुळवाणी
तिथं वाऱ्याचि गोड गोड गाणी
तिथं राया तु उभा असशील
तिथं रायाचे पिकले मळे,
वरी आकाश शोभे निळे
शरदाच्या ढगाचि त्याला झील
येड्यावानी फिरे रानोवना
जसा काही ग, मोहन कान्हा
हासे जसा ग, राम घननीळ
गेले धावून सोडुन सुगी
दुर राहून राहिली उगी
शोभे कसा ग गालीचा तो तीळ
रानि राया ग हा फुलावाणी
फुला फुलात मी फुलराणी
बाइ, सुवास रानि भरतील
फिरु गळ्यात घालुनि गळा,
मग घुमव मोहन शिळा,
रानि कोकीळ सुर धरतील !
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - जी. एन्. जोशी
स्वर - जी. एन्. जोशी
साभार : http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/460.htm
कुणि बाई, गुणगुणले
गीत माझिया ह्रुदयी ठसले
मोदभरे उमलल्या कमलिनी
शांत सरोवरि तरंग उठले
मानस-मंदीर आनंदले
रम्य स्वरांनी मोहित केले
चंद्रकरांनी क्षणोक्षणीही
अंबर अवघे पुलकित झाले
गीत - दत्ता डावजेकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले