शुक्रवारी अचानक वळीव बरसला. ऑफीसमध्ये काचेच्या तावदानातुन शांतपणे बघण्या पलिकडे काही करणे शक्य नव्हते. वाकुल्या दाखवत पडणारा पाऊस, मृदगंध पसरवुन जीवाची घालमेल करुन गेला. नकळत बोटे भ्रमणध्वनी वर फीरायला लागली, कुणा़कुणाला फोन लावायचा याची यादी मेण्दुत तयार होती.. साला पण कुणालाच वेळ नव्हता. एवढ्या लवकर कुठेही जायचे नाही असे ठरवल्याने प्रत्येक जण कशाना कशात अडकला होता. शेवटी ओंकारला फोन लावला, पण त्याने सुध्दा निराशा केली. वैतागलेल्या मनाने घरी आलो, जयवर्धेनेच्या शतकी खेळीने पुन्हा एकदा फील गुड आला आणि ताणुन दिली.
भल्या पहाटे दहा वाजता मातोश्रींनी आवाज दिला, "कुठे जाणार होतास ना त्या तिकोन्या का फिकोन्याला, ओंकारचे चार फोन आले, आता तरी उठा." झटकन उठुन ओंकारला फोन केला, कात्रज नाक्यावर भेटायचे ठरवुन आवरायला पळालो. गडबडीत नाश्त्याला फाटा मारुन ओंकारला ऊचलला आणि चांदण्यात पौडाची दिशा पकडली. खात्या-पित्याघरची दोन धट्टकट्टी माणसे गाडीवर बसल्या कारणाने हवा आधीच चेक करुन घेतली. बघता बघता चांदणी चौक-पिरंगुट पार करुन पौंडाला पोचलो. एस.टी. थांब्यापासुन उजवी घालुन तिकोना शोधत निघालो.
हा रस्ता थेट मुंबईला घेउन जातो, वाटेत तिकोना, तुंग,लोहगड, विसापुर, ढाक, जांबुवंती असे अनेक किल्ले आहेत. जरा वाट वाकडी करावी लागते की पोचलात मुक्कामी.. असो..
दुपारचे उन तापत असल्याची जाणीव पौड सोडल्यावर जरा जास्तच व्हायला लागली. वाटेत थांबुन जरा चहा-भजीचा बेत उरकला आणि चौकशी करुन मार्गाला लागलो. थोड्याच वेळात दर्शन झाले किल्ले तिकोन्याचे !!
थोड्या वेळात गावकर्याने सांगितलेला आंबा घावला आणि आम्ही कच्च्या रस्त्याने पुढे जायला वळलो. तिकोन्याच्या पायथ्याला गुरुद्वारा झाल्याने तिथपर्यंत ट्रॅक्टर जातो. त्याच रस्त्याने गावरान मोटोक्रॉस करत प्रवास चालु केला. तिकोन्याला जायचे म्हणजे, पौडनंतर उजव्या हाताला किल्ला ठेवुन किल्ल्याच्या पुढे १-२ किमी जायचे. तिथे मुख्य रस्ता डाव्या बाजुला काटकोनात खाली कोकणात उतरतो आणि उजव्या बाजुचा कच्चा रस्ता तिकोन्याला घेऊन जातो. गाडी मार्गाने गेलात तर २-३ किमी परत किल्ला उजव्या हाताला ठेउन, किल्ल्याची एक बाजु \ डोंगररांग धरुन जायचे, एका ठिकाणी उजवीकडे छोटी खिंड आहे त्या खिंडीतुन गुरुद्वाराकडे जाता येते, तिथेच शंकराचे मंदीर आहे. मंदीरापाशी गाडी लावली, आणि आम्ही खिंडीचा डोंगर चढायला घेतला.
तिकोनापेठ गावातुन एक रस्ता किल्ल्यावर जातो, तो रस्ता अवघड आणि चढाईचा आहे. आम्ही गेलो तो दुसरा रस्ता. तिकोनापेठच्या आधी काशीद म्हणुन छोटे गाव लागते. तिथुन ही खिंड, गुरुद्वारा आणि किल्ल्यावर जायचा रस्ता स्पष्ट दिसतो. दुपारी १-१:३० च्या सुमारास तो पर्वती एवढा डोंगर अंगावर चढताना, कुठुन झक मारली असे वाटले नसते तर नवल!! आमच्या कडचा पाण्याचा साठा अगदी कमी म्हणजे जेमतेम १ ली पाणी, रणरणते उन.. सावली फक्त आमचीच बाकी सारे वाळके गवत. पण समोर किल्ला दिसत असताना मागे फिरणे हे सर्वस्वी अशक्य, तेव्हा किल्ल्यावर पाणी असेल ह्याचा विचार करुन आम्ही वाटचाल चालुच ठेवली. सहज म्हनुन ओंकारला विचारले, "किती वेळ चालतोय रे?" उत्तर १५ मिनीटे... पण किती वेळ चालतोय असे वाटुन पार थकायला झाले होते. तेवढ्यात ही देवडी किंवा चेकनाका आला आणि किल्ला जवळ आल्याची जाणीव झाली. देवडीतल्या दगडाच्या गारव्यात बसल्यावर अंमळ बरे वाटले. हीच ती देवडी ...
तिथुन पुढे लगेच ५ फूटी मारुतीराय भेटले, शनिवार असल्याने त्यांनाही रुईच्या पानाचा गारवा लाभला होता.
त्यांना नमस्कार करुन छोटी चढण पार केली आणि WELCOME TO TIKONA अश्या पाटीने स्वागत झाले. तिकोन्याचा आजचा हवालदार म्हणुन काम पहाणार्याने ताकाची सोय केली होती. थंड पाणी, दोन दोन ग्लास ताक रिचवुन, किल्ला पहायला निघालो.
चुन्याचा घाणा
डौलदार तटबंदीचा कोट पांघरुन बसलेला तिकोना
आणि पहिला दरवाजा दिसला...
तिकोना नावाप्रमाणे तिन कोनांचा.. त्रिकोणी... ३ डोंगररांगानी बनलेला... ज्यानी कुणी टेहळणी साठी निवडला, किल्ला बांधला त्याच्या बुध्दीमत्तेला सलाम!!!
ह्या पायर्या ऊंच आणि जवळपास ९० अंशात चढत जायचे आहे, इथे ऊजवीकडे पहारेकर्यांसाठी खोल्या आहेत. पाण्याची टाकी आहे, टाक्यात मुबलक पाणी आहे, पण खराब..
डाव्या बाजुला १ बुरुज आहे अर्थात टेहळणीसाठी ... समोरच बघा तुंगचा सुळका.. पवनाचा जलाशय
हा किल्ल्याच्या अमलाखाली येणारा मावळ..
पायर्या चढुन आलो कि दर्शन होते ते मुख्य दरवाज्यचे आणि मजबुन गगनचुंबी तटबंदीचे...
गडाचा मुख्य दरवाजा
दरवाज्यातुन आत येताच ऊजवीकडे रहाण्यायोग्य गुहा आणि पिण्यायोग्य पाण्याचा साठा आहे. बाकी किल्ल्याचा विस्तार छोटा, तटबंदी शाबुत आहे,
इथुनच आलो आम्ही....
हा बालेकिल्ला
आत शंकराचे देऊळ, शेजारी बांधलेले तळे!!
आणि बाजुने थोडासा मोकळा भाग आहे. मावळावर लक्ष ठेवायला एक्दम उपयुक्त. इथे तटबंदी पुर्ण ढासलळी आहे, म्हणुन जरा जपुनच ओंकारा!!
तुंग, पवना डॅम, लोहगड, विसापुर.. अबब विस्तिर्ण प्रदेश!!
हा भगवा अगदी रस्त्यावरुनही लक्ष वेधुन घेतो , तिकोन्याच्या अस्तित्वाची, आणि भगव्या अस्मितेची जाणिव करुन देत, ताठ मानेने जगायचा इशारा देतो.
किल्ल्याचा उत्तुंग भाग.. निशाण टेकडी, इथे इमारत असावी सध्या फक्त अवशेष,, आणि अस्मादीक!
किल्ला पहायला १-२ तास खुप होतात.. खाली येताना अरे हो की... welcome च्या पाटी पासुन १० पावलावर गुहा आहेत, हे तळे आहे, तिथे सध्या कोणी साधु रामरायाच्या साधनेत मग्न आहेत.
अंग जाळणार्या उन्हात ह्याला सुगंध पसरविण्याची शक्ती देण्याची करामत तो निसर्ग नावाचा किमयागारच करु जाणे..
परतायच्या वाटेवर एक छायाचित्र..
निसर्ग पण टॅटुस बनवतो, बघा ही वनस्पती दाबुन धरली की छाप ऊमटतो!!
आणि सुर्यास्त.. पिरंगुटच्या घाटातुन!!
सकाळी ११ ला घरट्यातुन ऊडालेली पाखरे सातच्या आत घरात!!
मातोश्रींना काय आनंदाचे भरते आले म्हणुन सांगु..त्यात हा रानमेवा, मग रात्रीच्या पार्टीला परवानगी आपसुकच मिळाली .
प्रतिक्रिया
1 Jun 2010 - 1:57 am | मदनबाण
छान वर्णन आणि मस्त फोटो... :)
मदनबाण.....
Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower
1 Jun 2010 - 9:09 am | सहज
छान सहल!
1 Jun 2010 - 9:15 am | डॉ.प्रसाद दाढे
फॅन्टॅस्टिक! काय मजा केलीयत राव! वर्णन आणि फोटू
दोन्ही एकदम मस्त!
आम्हांला कधी जमणार असले ट्रेक..
1 Jun 2010 - 9:15 am | मिसळभोक्ता
मारुतराव अंमळ अश्लील वाटतोय.
तसाच आपला हात देखील.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Jun 2010 - 9:20 am | ऋषिकेश
वा! छानच.. मी गेलो होतो तेव्हा आम्ही पेठेतून गेलो होतो..
बाकी
हे फार आवडले :)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
1 Jun 2010 - 1:57 pm | प्रचेतस
सुरेख वर्णन आणि छान फोटो.
आम्ही ५/६ वर्षांपूर्वी तिकोना आणि तुंग केला होता तिकोना पेठेत मुक्काम करून त्याची आठवण झाली
1 Jun 2010 - 2:56 pm | भडकमकर मास्तर
झकास फोटो, मस्त ट्रेक
1 Jun 2010 - 4:49 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त फोटो अन माहिती.
1 Jun 2010 - 5:38 pm | अनिल हटेला
छान माहिती आणी फोटोसुद्धा !!
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
1 Jun 2010 - 5:40 pm | स्वाती२
सुरेख फोटो आणि लेखन!
1 Jun 2010 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार
सुरेख फोटु आणी सुरेख वर्णन.
एकदम आनंदी करुन टाकलेत बघा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Jun 2010 - 6:49 pm | प्रभो
मस्त!!
1 Jun 2010 - 8:54 pm | प्राजु
मस्तच!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/