बजरंगाचा भक्त पैलवान
हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण
मी आहे बजरंगाचा भक्त, त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी, मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||
शाळेत होतो द्वाड, घरी करायचे नाही लाड
चिंचा बोरे आवळे पाडूनी खायी नाही कसली त्याला तोड
लहाणपणी म्हणती सगळे तू अभ्यासात सुस्त
आता मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||१||
दंड बैठका तालीम करतो, जोर मारूनी घाम गाळतो
शड्डू जोरात ठोकतो, गडी समोरचा घाबरतो
दुध, बदाम, खारीक यांचा खुराक करतो मस्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||२||
कुस्ती खेळ आहे भारी, धोबीपछाड डावपेच करी
समोरच्याची ओढावी तंगडी, चढावे त्याच्या छाताडावरी
जिरवावी खोडी असेल जर समोरचा पैलवान मत्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||३||
पंचक्रोशीत नाव गाजे, जेव्हा कुस्तीत पानी पाजे
पदके अन गदा घेवूनी मी नाचे, संगे ढोल अन ताशे वाजे
सांगतो अंगमेहनत करा अन रहा कायमचे तंदूरूस्त
त्यासाठी मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||४||
मी आहे बजरंगाचा भक्त त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/५/२०१०
प्रतिक्रिया
30 May 2010 - 11:34 am | टारझन
मा.श्री. पाषाणचंद्र भेदरावजी ,
साला , मुडंच आला सकाळ सकाळ रैवारी ... कुठाय कविता ....... ;)
अच्छा खाली आहे काय ...
हाहाहा .. कविता छाण आहे ... फक्त ते "पैलवाण लोकं गुढग्यात " असतात , त्याचा उल्लेख नाही , तो खटकला ... गुढग्यात असला की कसं , डोकेबडवी होत नाही =))
बाकी "टारझन दुध पीत नाही .. आणि कसला खुराक पण नै बॉ .. " आम्ही आपले "चहा चपाती" च्या खुराकावाले गरिब पैलवाण ...
खास अर्पण केल्या मुळे डोळे पाणावले हे वे सां न ल.
- पाबळखेड
3 Jun 2010 - 6:15 am | पाषाणभेद
>>> मा.श्री. पाषाणचंद्र
का कोण जाणे पण वरील उल्लेख काही हौशी लोक शरद पवार साहेबांचा शरदचंद्र पवार करतात तसा वाटला.
(अर्थातच याची चाल 'गांधी गेले, नेहरू गेले अन आजकाल माझीही तब्बेत चांगली नाही' म्हणण्याप्रमाणे नाही हे वे सां न ल.)
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
2 Jun 2010 - 8:14 pm | मी-सौरभ
टारोबा पैलवान,
तुमी कंदी गेल्ता का आखाड्यात????
(सूचना: हा प्रश्न फक्त माहिती असावी म्हणूनच आहे)
-----
सौरभ :)