केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला
तुटलेल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला ।
शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री
स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।
सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।
मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।
काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात
उंबर्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।
प्रतिक्रिया
24 May 2010 - 10:09 am | स्पंदना
सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।
मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।
=D> व्वाह! मनिष! व्वाह!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 2:49 pm | Dhananjay Borgaonkar
अहो नाव मनिषा आहे...कवयित्रीला तुम्ही कवी करुन टाकल..
हलकेच घ्या ;)
24 May 2010 - 1:57 pm | दत्ता काळे
शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री
स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।
- हे फार आवडलं.
24 May 2010 - 2:47 pm | Dhananjay Borgaonkar
सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।
मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।
क्या बात है!!!
24 May 2010 - 6:46 pm | राघव
साधी सोपी छान कविता! :)
.. स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।
..उंबर्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।
ह्या ओळी विशेष! पु.ले.शु.
राघव
24 May 2010 - 7:43 pm | फटू
काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात
उंबर्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।
इथे उंबर्यात या माझा, पाय कसा थांबलेला मात्र कळलं नाही.
- फटू
24 May 2010 - 7:46 pm | शुचि
कविता फार आवडली. मलाच आता सैरभैर वाटतय ती वाचून :( .... खूप करूण आहे खरच
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 May 2010 - 7:53 pm | sur_nair
हळुवार आणि सुंदर रचना. अजून येउदे असेच सुंदर लिखाण.
24 May 2010 - 7:56 pm | प्राजु
व्वा!! फार सुंदर रचना.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
24 May 2010 - 10:21 pm | मदनबाण
सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।
सुंदर... :)
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
25 May 2010 - 1:32 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
25 May 2010 - 1:50 am | मीनल
कविता आवडली .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/