बीटाची कोशिंबीर

मनस्वी's picture
मनस्वी in पाककृती
27 Mar 2008 - 11:43 am

साहित्य :
मध्यम आकाराचे बीट - २
मध्यम आकाराचा बटाटा - १
दाण्याचा कूट - १ चमचा (optional)
दही - ८-१० चमचे
साखर - १/२ चमचा
कोथिंबीर
मीठ

फोडणीसाठी -
तूप - २-3 चमचे
जिरे - १/२ चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरून

कृती :
(१) बीट आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. साले काढून एकत्र कुस्करावे.
(२) त्यात दाण्याचा कूट, दही, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकसारखे करावे.
(३) दुसरीकडे कढईत तूप, जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी करावी.
(४) फोडणी थोडी थंड झाली की मिश्रणावर ओतून मिश्रण परत एकसारखे करावे.

मनस्वी

पाकक्रिया

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 12:13 pm | सृष्टीलावण्या

मला पण सोपे पदार्थ आवडतात, भावतात. आम्ही बटाटा न घालता बीट किसून कोशिंबीर करतो.
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

आनंदयात्री's picture

27 Mar 2008 - 12:24 pm | आनंदयात्री

आजच करुन पहातो, आम्ही आत्ताच स्वयंपाकाच्या विश्वात प्रवेशलो आहोत, आता प्रयोग करुन पहायला हरकत नाही :)
धन्यवाद.

स्वाती राजेश's picture

27 Mar 2008 - 3:07 pm | स्वाती राजेश

बीट व बटाटा उकडून कोशिंबीर हा नविन प्रकार आहे लवकरच करेन..
मी कच्चीच फक्त बीट ची करते. पण त्यात दाण्याचा कूट आवश्यक असतो.
मनस्वी येऊ देत नविन नविन प्रकार्..स्वागत आहे:))))

प्राजु's picture

27 Mar 2008 - 8:41 pm | प्राजु

मी सुद्धा कच्च्या बीटाची किसून कोशिंबीर करते. उकडून बटाटा घालून कधी केली नाही. आता करून बघेन नक्की.
बीटाचे सूप मात्र आमच्याकडे कायम होते...
धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

27 Mar 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर

मनस्वी,

बिको बाकी सह्हीच केली आहेस! तू दिलेली पाकृ अतिशय आवडली..

मलाही बिको खूप आवडते, शिवाय बीट या प्रकारावर माझे अत्यंत प्रेम आहे. आयर्नच्या वगैरे कुठल्याही गोळ्या न घेता, नैसर्गिकरित्याच बीट हे रक्तशुद्धीकरता अत्यंत प्रभावी मानले गेले आहे..

असो, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर देत जा, अशी तुला विनंती...

आपला,
(बीटप्रेमी) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2008 - 2:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला बीटाच्या चांगल्या गुणांबद्दल माहितीच नव्हती. धन्यवाद तात्या.

मनस्वी's picture

27 Mar 2008 - 3:22 pm | मनस्वी

सृष्टीलावण्या, आनंदयात्री, स्वाती, तात्या.. धन्यवाद.
चांगल्या पाककृती देण्याचा नेहेमीच प्रयत्न असेल.

मनस्वी

वरदा's picture

27 Mar 2008 - 5:32 pm | वरदा

मी बीट उकडून, कापून त्यात दही आणि दाण्याचं कूट घालते..आता बटाटा घालून पाहीन.....

स्मार्ट बनी's picture

6 Aug 2008 - 4:36 am | स्मार्ट बनी

मी टोमटो घालते ...किन्वा लिम्बू पिळते

शितल's picture

6 Aug 2008 - 8:33 am | शितल

बीट उकडुन अजुन कोशिंबीर नाही केली कधी पण करून नक्की पाहिन. :)
मनस्वी,
वेगवेगळ्या रेसिपीज येऊ दे आम्हाला तु़झ्या कडुन. :)

विजुभाऊ's picture

6 Aug 2008 - 11:48 am | विजुभाऊ

बीटाची कोशिंबीर मला हे काहीतरी ऍटोमीक प्रकार वाटला
( मी अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी असे काहितरी लिहायलासुद्धा घेतले होते ) :)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनस्वी's picture

6 Aug 2008 - 12:04 pm | मनस्वी

विजुभाऊ, बरोबर वाटले तुम्हाला. तसाच प्रकार आहे तो!
तुमच्या अल्फा ची खीर आणि गॅमा ची चटनी च्या पाककृती येउद्यात लवकर!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2008 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्कीटरावांनी व्यक्तिचित्र लिहिलं आता तुमची पाककृती हवीच!