वय वर्षे १४

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
23 May 2010 - 12:40 am

पहिल्यांदाच एकटी अशी राहत होती आणि स्वातंत्र्याचा अनुभव येत होता....आपल्याला बोलायला, ओरडायला, उत्तर द्यायला कोणी नाही याचा आनंद वाटत होता...पण इथला गायकवाड का एवढा खार खाउन असतो काही कळत नव्हते...मरू दे...काय कोणाला भाव द्यायचाय...."तो" आहे ना आपल्याला protect करायला...इतके वर्ष तणावाखाली आणि मार खात घालवल्यावर आभाळ मोकळं मिळालं तर त्याचा आनंद घ्यायचा एवढेच मनात होते...

३१ डिसेंबरच्या रात्री बियर खूप झाल्यावर झोप अशी आलीच नाही...मध्यरात्री कधीतरी एकदम उलटी येईल असे वाटल्याने ती रूमच्या बाहेर आली आणि चौकातील पाण्याच्या नळाजवळ जाऊन बसली...तोंड धुतले...परत रूमवर येताना रात्रीच्या अंधारात एक मुलगी मोठी ब्याग पाठीला लाऊन येताना दिसली...लगेच डोक्यात प्रकाश पडला " हे खरे आहे तर !!"

दुसऱ्यादिवशी "तिला" जवळून पहिले आणि वाटले " अरे, हि तर नेहमीच्या बघण्यातली पोरगी...खूपच सज्जन आहे. आपलेच काहीतरी चुकत तर नसेल ना ? "

संध्याकाळी रूमवर यायला वेळ झाला. खरं तर १०-१५ मिनिटच उशीर झाला होता पण गेटवरचा गायकवाड गुर्मीत ओरडला " इतका उशीर का? वेळेवर येत येत नाही का ? चल सही कर." ती सही करताच होती तेवढ्यात तिचे लक्ष बाजूच्या कॅम्पसमधील काही नागा आणि मिझो मुलींकडे गेले...त्या त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारीत उभ्या होत्या...तिने बाजूच्या मुलीला विचारले
" हा या पोरींना कसा काही बोलत नाही? या तर रोजच उशिरा येतात."
" काही बोललं तर या पोरी आरडाओरडा नाही का करायचा ? तुला काय वाटलं ..साध्यासुध्या आहेत का या महामाया.."

रूमवर आल्यावर काहीतरी खाल्लं...स्वयंपाक येत नव्हताच त्यामुळे काही बनवायचा प्रश्नच नव्हता...डोक्यात भुंगा सुरु झाला...काय चुकतंय? कोणाशी काही भांडण नाही...स्वतःहून ठराविक लोक सोडले तर कोणाशी बोलतही नाही...मग काय बिनसतंय? कोण आग लावतंय ? आणि का ? प्रश्नच प्रश्न आणि उत्तरं मिळण्याची शक्यता नाहीच .....ही warden तर काय उद्योग करते काही कळायला मार्ग नाही..कालच स्वतः वाचायला म्हणून दिलेलं पुस्तक कधी रूमवर येऊन मला न सांगता घेऊन गेली तर पत्ता नाही...मी किती वेळ शोधात होते...वाटलं हरवलं की काय...का सारखी चोरून माझ्या रूमवर येऊन माझं समान उचकत बसते? हिला काय माहिती नाही का काय चालू आहे आणि कोण करतेय ते? हरामखोर आहे साली ....

क्रमशः

समाज

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

23 May 2010 - 12:47 am | पांथस्थ

अजुन काही सुत्र सापडले नाही...पुढचा भाग लवकर येउद्या...

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

Pain's picture

23 May 2010 - 12:48 am | Pain

"क्रमशः" नामक शिवी आणि एवढा छोटा भाग ?
तुम्हालापण वाइट सवयी लागल्या तर :W

टारझन's picture

23 May 2010 - 12:49 am | टारझन

क्रमशः ??? इतक्यात ? आहो काहीच झेपलं नाही :(

असो,पुलेशु

बिपिन कार्यकर्ते's picture

23 May 2010 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते

मोठा भाग लिहा हो... उत्सुकता वाटते आहे.

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

23 May 2010 - 12:50 am | संदीप चित्रे

म्हणजे कथा, मुक्तक वगैरे ...
अजूनतरी नीट काहीच कळत नाहीये !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सुबक ठेंगणी's picture

23 May 2010 - 12:27 pm | सुबक ठेंगणी

प्रथमपुरुषी एकवचन आणि दोन तृतीयपुरुषी एकवचने ह्यावरून काहीच कळायला मार्ग नाहिये.

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2010 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

बाकी ह्या धाग्यावर "अय्या.. येवढे छान छान कसे काय सुचते तुला?" हि प्रतिक्रीया भयंकर मिस करतो आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"अय्या.. येवढे छान छान कसे काय सुचते तुला?"

अशी

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2010 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ..

आता ह्या प्रतिक्रीयेनंतर मी "काही फारसा उद्योग नसतो मग सुचतं असं काहीतरी..."" हि प्रतिक्रीया भयंकर मिस करत आहे.

बाय द वे नेहमी छान छान गोग्गोड खावे म्हणजे आपले लेखनही तसेच होते. वरच्या गोष्टीतली मुलगी बिअर पीते म्हणे, आता ती कशी बनणार ? कारण आपण जसे खातो पितो तसेच बनतो म्हणे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पंगा's picture

24 May 2010 - 8:19 pm | पंगा

आता ह्या प्रतिक्रीयेनंतर मी "काही फारसा उद्योग नसतो मग सुचतं असं काहीतरी..."" हि प्रतिक्रीया भयंकर मिस करत आहे.

काही फारसा उद्योग नसतो मग सुचतं असं काहीतरी...

बाय द वे नेहमी छान छान गोग्गोड खावे म्हणजे आपले लेखनही तसेच होते. वरच्या गोष्टीतली मुलगी बिअर पीते म्हणे, आता ती कशी बनणार ? कारण आपण जसे खातो पितो तसेच बनतो म्हणे.

रूट बियर पीत असावी.

- पंडित गागाभट्ट

शुचि's picture

23 May 2010 - 1:07 am | शुचि

ती १४ वर्षाची आहे ना मग बीअर कशी प्याली?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

23 May 2010 - 10:11 pm | पंगा

ती १४ वर्षाची आहे ना मग बीअर कशी प्याली?

तोंडाने. बहुतेक मगातून. किंवा थेट बाटलीतूनही असू शकेल. कल्पना नाही.

- पंडित गागाभट्ट

टारझन's picture

23 May 2010 - 10:52 pm | टारझन

ओह्ह .. हाऊ इंटेलिजंट ... पंगा ... आयाम रिली रिली इंप्रेस्ड् :)
इकडे ये .. एक काजळाचा टिका लाऊंदे :) नजर नको लागायला ;)

- पंडित निगर्गट्ट

भडकमकर मास्तर's picture

23 May 2010 - 2:49 am | भडकमकर मास्तर

कविता आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता नव्हे, 'शरदिनी' म्हणा! ;-)

अदिती

तिमा's picture

23 May 2010 - 10:13 am | तिमा

एक ओळीचा धागा काढून देखील पुढे क्रमशः असे लिहावे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

टुकुल's picture

23 May 2010 - 12:38 pm | टुकुल

काय लिहिले आहे, काही *ट कळल नाही.

--टुकुल

खुप घाबरतोय वाचतना .......
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

23 May 2010 - 1:27 pm | टारझन

अगदी !! मी पुन्हा १२व्या वेळेस वाचलं तेंव्हा लेख डिकोड झाला , आणि सगळं कळलं ... माझी अजुन बोटखिळी बसलीये :) मी ही प्रतिक्रिया रुममेट कडुन टाईप करुन घेतली आहे.

- पावन दादामठ्ठ

वेताळ's picture

23 May 2010 - 1:39 pm | वेताळ

२७६ लोकानी वाचन केले आहे व १२ लोकानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या अर्थी उरलेल्या लोकाची बोटखिळी बसली असणार आहे. :D

वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

24 May 2010 - 12:54 pm | llपुण्याचे पेशवेll

अंबळ गल्लत होत आहे का वेताळा? लक्षात घे २७६ वाचने असतील तर त्यापैकी १३८ ही मूळ लेखकाचीच असतात काय काय प्रतिक्रिया आहेत ते वाचण्यासाठी. ;) उरलेल्या १३८ पैकी १०० प्रतिसादकांची , नवीन प्रतिसाद आलाय तो आपल्याला उपप्रतिसाद म्हणून आला आहे का हे पाहण्यासाठी. ;)
(प्रतिसाद प्रेमी)पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

भारद्वाज's picture

24 May 2010 - 1:01 pm | भारद्वाज

अगदी १००% सहमत
अचूक आकडेमोडात्मक विश्लेषण =D>

वेताळ's picture

24 May 2010 - 1:29 pm | वेताळ

विश्लेषणाबद्दल पुपेचे आभार :D

वेताळ

डावखुरा's picture

23 May 2010 - 10:54 pm | डावखुरा

वाचतोय...उस्तुकता आहे..
पुढे काय? आहे ते आल्यावर प्रतिक्रिया देईन...जरा मोठे भाग येउ द्यात...
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

llपुण्याचे पेशवेll's picture

24 May 2010 - 12:56 pm | llपुण्याचे पेशवेll

उत्सुकता चांगल्यापैकी ताणली आहे.
गायकवाड एकटीचा फायदा घेण्यासाठी खार खाऊन आहे का? त्या बाहेरच्या मिझो उशीरा येतात व त्या कारणासाठी गायकवाड 'वेगळी' कामे करून घेतो वगैरे आहे का? तसंच हिच्या बाबतीत करावं पण ही लवकर येते मग काय करायचं, असं आहे का हे वाचण्यास उत्सुक.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Aug 2010 - 10:23 am | ज्ञानोबाचे पैजार

शिल्पा ताई,

ईतका सुंदर लेख असा अर्ध्यावर का बर सोडलात? ईतके दीवस आम्ही वाट पहात होतो पुढच्या भागाची पण नाही.....

चला चला लवकर लेखणी उचला आणि लागा कामाला.

तुमच्या लेखनाची चातका सारखी प्रतिक्षा करणार्‍या मि.पा.करांना असे वार्‍यावर सोडणे बरे नाही. बर या लेखात मि.पा. वर वहाणार्‍या नविन वार्‍यांचाही संदर्भ आहेत. तेव्हा आपल्याला अग्रहाची विनंती चटकन पुढील भाग टाका बुवा,

या साठी खरे तर मी तुम्हाला व्य. नी. करु शकलो असतो. पण माझ्या सारखे अजुनही काही चातक असतील याची मला खात्री आहे. म्हणुन हे जाहीर प्रकटन

अगाध प्रतिभावाले पैजारबुवा (ढ)

शिल्पा ताईंनी बस स्टँडवर आणलं खरं, पण आता कुठल्या यष्टीत बसायच? असं विचारायचा अवकाश तितक्यात त्यांनी "क्रमशः" हा बोर्ड लावला!!