(कदाचित)

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
20 May 2010 - 6:16 pm

प्रेरणा : - कुमार जावडेकरांची सुंदर गझल कदाचित

सरेल एवढा प्रहर कदाचित..? #:S
असेल बाधली भगर कदाचित..! :S

पुन्हा कधीतरी समीप येता..
तुझी चळेलही नजर कदाचित. ;)

समोरुनी तुझ्या निघून गेलो.
(पुन्हा खोदली मी कबर कदाचित..)

करेल शांत या मनास आता..
तुझ्या कुपीतली लिकर कदाचित..

तरी किती मी बजावले मनाला-
नसेल खोल ती गटर कदाचित.

निघेल एक एवढी लचक अन.
बनेल पूर्ववत कमर कदाचित?

----- B)

विडंबन

प्रतिक्रिया

फटू's picture

20 May 2010 - 6:25 pm | फटू

लय भारी !!!

हा "भगर" काय प्रकार आहे बरे 8>
- फटू

पक्या's picture

20 May 2010 - 9:29 pm | पक्या

वरईच्या ( वर्‍याच्या ) तांदळाचा भात
जय महाराष्ट्र , जय मराठी !

पिंगू's picture

20 May 2010 - 6:41 pm | पिंगू

उडालोच रे वाचून!!!!!!! आणि इतकं सगळं होउन पण कबंर पूर्ववत होणे कठीण.. :))

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 11:10 pm | बेसनलाडू

विडंबन आवडले. वाचून छान करमणूक झाली.
(करमणूकप्रिय)बेसनलाडू

निरन्जन वहालेकर's picture

21 May 2010 - 8:23 am | निरन्जन वहालेकर

हा ! हा ! हा ! मस्तच ! ! !

कानडाऊ योगेशु's picture

21 May 2010 - 7:10 pm | कानडाऊ योगेशु

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आणि प्रतिसाद न देता नुसतेच वाचुन गेलेल्यांचे आभार!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.