कोण मी मलाच हे विचारू नका
आज मी जिवंत कां विचारू नका...
मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा?
आसवांचे अर्थ मला विचारू नका...
कां असा सुखांचा मार्ग बदलला?
वेदनांचा पत्ता मला विचारू नका...
तो सुर्य, चंद्र..,तारकाही गळाल्या
क्षितीजाचा गाव मला विचारू नका...
कोमेजल्या कळ्या चित्रातल्या?
कां फिकुटले रंग? विचारू नका ...
हरवला भाव सांगा कुणा गवसला?
सोडला ठाव, कां? मला विचारू नका....
विशाल
प्रतिक्रिया
20 May 2010 - 12:19 pm | निरन्जन वहालेकर
कां असा सुखांचा मार्ग बदलला?
वेदनांचा पत्ता मला विचारू नका
व्वा ! कुलकर्णी साहेब ! क्या बात है I सुंदर कविता !
20 May 2010 - 12:34 pm | राघव
एक सांगावेसे वाटले -
कोमेजल्या कळ्या कां चित्रातल्या ?
फिकुटले रंग मला विचारू नका ...
याऐवजी असे चालेल का -
कोमेजल्या कळ्या चित्रातल्या?
कां फिकुटले रंग? विचारू नका ...
कविता ठीक. थोड्या वेगळ्या कल्पना असल्यात तर जास्त मजा येईल असे वाटते. वेदना दर्शवण्यासाठी काही नवीन रूपके, उपमा मांडू शकता. शुभेच्छा!
राघव
20 May 2010 - 4:43 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद.
राघवजी बदल केला आहे. धन्स.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 May 2010 - 6:09 pm | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
20 May 2010 - 8:02 pm | sur_nair
छान जमून आलंय सर्व
21 May 2010 - 12:41 am | मीली
मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा?
आसवांचे अर्थ मला विचारू नका.....
सुरेख कविता!
मीली
21 May 2010 - 10:38 am | विशाल कुलकर्णी
मनःपूर्वक आभार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"