सजा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
16 May 2010 - 12:13 pm

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

गझल

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

16 May 2010 - 12:20 pm | बेसनलाडू

(पादचारी)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

16 May 2010 - 5:54 pm | श्रावण मोडक

सहमत. गदारोळात असतानाच एक हलकी झुळूक यावी तसं वाचायला मिळाली.

शुचि's picture

16 May 2010 - 8:10 pm | शुचि

हा हा पादचारी बेला (संदर्भ ३ रे कडवे) :)

कविता छान आहे क्रांती पण करुण :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दत्ता काळे's picture

16 May 2010 - 4:22 pm | दत्ता काळे

दुसरे कडवे आवडले . .

मदनबाण's picture

16 May 2010 - 4:22 pm | मदनबाण

सुंदर... :)

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

अनिल हटेला's picture

16 May 2010 - 5:37 pm | अनिल हटेला

सुरेख........:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

पाषाणभेद's picture

16 May 2010 - 6:01 pm | पाषाणभेद

पहिले कडवे फक्कड झाले आहे.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

sur_nair's picture

16 May 2010 - 6:56 pm | sur_nair

माझं ज्ञान जरा तोकडं आहे म्हणून विचारतो कि हा चित्रगुप्त कोण? बाकी सर्व छान आहे

मेघवेडा's picture

16 May 2010 - 7:55 pm | मेघवेडा

सुरेख! थंडगार वार्‍याची झुळूकच जशी! मस्तच!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्राजु's picture

16 May 2010 - 9:11 pm | प्राजु

व्वा!!
क्या बात है!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

हे खास!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

राघव's picture

16 May 2010 - 11:46 pm | राघव

ह्या दोन्ही द्विपदी विशेष आवडल्यात.
शेवटही सुंदर. :)

श्रावणदांच्या "झुळुकेशी" सहमत!!
क्या बात है, श्रावणदा सुद्धा काव्यात्मक बोलायला लागलेत! ;)

राघव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2010 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

स्सही..! काय सुंदर कल्पना आहे. =D>

-दिलीप बिरुटे

शरदिनी's picture

16 May 2010 - 10:07 pm | शरदिनी

आपल्या कविता मला आवडतात...

मनीषा's picture

17 May 2010 - 9:32 am | मनीषा

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

वा!!! सुरेख...