घटक :
तांदूळ १ कप
तूरडाळ १ कप
बटाटा १
कांदा १
लसूण ३ पाकळ्या
तिखट २ टीस्पून
गरम मसाला दीड टी स्पून
मीठ
हिरवी मिरची १
कढीपत्ता ७-८ पाने
फोडणीसाठी :
तेल २ टेबलस्पून
मोहरी १ टीस्पून
जिरे १ टीस्पून
हिंग १ चिमट
हळद अर्धा टीस्पून
तयारी :
तांदूळ व तूरडाळ किमान अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवावी. बटाट्याच्या साली काढून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावेत. कांदा, मिरची व लसूण बारीक चिरून घ्यावे.
कृती :
फोडणीत मोहरी,जिरे, हिंग, हळद घालून त्यात भिजलेले तांदूळ - तूरडाळ खमंग परतावेत. त्यांना जरा शिजू द्यावे. पाच कप (अडीच पट) पाणी घालावे. त्यात चिरलेला बटाटा, कांदा, लसूण, मिरची, तिखट, गरम मसाला, कढीपत्ता घालून झाकण लावून शिजवावे. खिचडी थोडी ओलसरच राहिली पाहिजे. झटपट मसाला खिचडी तय्यार!
वाढताना वरून तूप, कोथिंबीर घालून, हवे असल्यास लिंबाचा रस पिळून द्यावे. सोबत दही, चटणी/ लोणचे, सलाड, पापड द्यावे.
प्रतिक्रिया
14 May 2010 - 11:02 pm | शुचि
छान :)
मला वाटतं मूग डाळ पण चालेल.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 11:06 pm | अरुंधती
हो, मूग डाळ, मिश्र डाळी (मूग, मसूर, तूर, छिलका डाळ) असेही करता येईल. पण तूरडाळीच्या खिचडीची चवच वेगळी असते! त्यावर तूप -- यम्म्मी!! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 May 2010 - 11:07 pm | शिल्पा ब
मी मुगडाळ घालूनच करते...पण पाणी दुप्पट घालते...बाकी फोटोवरून तर चमचमीत वाटतेय =P~ ...आज खिचडीच..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 11:09 pm | अक्षय पुर्णपात्रे
खिचडीचे के चार यार
दही, पापड, घी, आचार
असे काहीसेसे ऐकल्याचे आठवते.
14 May 2010 - 11:22 pm | शुचि
=D> =D> =D> :X :X :X >:D< >:D< >:D< ;;) ;;) ;;)
अन्नावर काव्य म्हटल की खूप एक्साईट्मेंट होते :D
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 11:26 pm | अरुंधती
शुचि, मग ''वदनी कवळ'' म्हणताना तर तुझं काय होत असेल? :D >:D<
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 May 2010 - 1:26 am | शुचि
>> तुझं काय होत असेल?>>
हा हा
आवरा!!!! ......... इमॅजिनेसण =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 11:14 pm | अरुंधती
व्वा!
<< खिचडीचे के चार यार
दही, पापड, घी, आचार >>
हे खिचडी काव्य माहीतच नव्हतं! मस्तंय :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 May 2010 - 11:32 pm | बेसनलाडू
उत्तम पाककृती. अनेकदा करतो, खातो, खिलवतो. फार आवडते. बादशहाचा खिचडी मसाला मिळतो, तो घालूनही छान होते.
(खवय्या)बेसनलाडू
दही, लोणचे, पापड इ. ला आणाखी एक पर्याय म्हणून सांडगी मिरची/भरली मिरची किंवा सांडगेही छान लागतात.
(पर्यायसूचक)बेसनलाडू
तांदूळ व तूरडाळ अर्धा-पाऊण तास भिजत घालूनही खिचडीला झटपट का म्हटले आहे, असा वाह्यात प्रश्न पडला. इतका वेळ भिजवल्यास खिचडी न होता (भिजत) घोंगडी होईल ;)
(टवाळखोर)बेसनलाडू
14 May 2010 - 11:40 pm | अरुंधती
हा हा हा, बेसनलाडू, तांदूळ व डाळ भिजवून ठेवायची आहे, भिजत नव्हे! ;-)
बाकी सांडगी मिरची तळून, सोबत बटाट्याची तळलेली मिरगुंडं, मठ्ठा....... 8>
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 May 2010 - 11:50 pm | पक्या
ह्यात वेगवेगळ्या भाज्या घातल्या की बिसिबेळे भात होईल.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
15 May 2010 - 12:09 am | शिल्पा ब
ढोबळी नव्हे..तर लांब खूप कमी तिखट जाडसर मिरची मिळते...एकदा त्यात कसलेसे सारण (बहुतेक बेसन )घालून केलेली भाजी खाल्ली होती...मिरची मध्यभागी चिरून, आतल्या बिया काढून सारणाने भरतात...जर कोणाला पाककृती माहिती असेल तर please इथे लिहा...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 May 2010 - 12:39 am | बहुगुणी
१ -तुम्हाला अभिप्रेत आहे ती बहुधा ही पाब्लॅनो पेपर असावी.
२
15 May 2010 - 1:07 am | शिल्पा ब
हो हो याच आहेत ...धन्यवाद.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 May 2010 - 12:16 am | स्वाती२
मस्त! अशी खिचडी आमच्या होस्टेलच्या मेसमधे असायची. जोडीला कढी आणि पापड.
15 May 2010 - 12:31 am | बहुगुणी
जानकी यांनी दिलेली थोडीशी अशीच पाककृती आठवली.
15 May 2010 - 9:36 am | मदनबाण
गरम गरम खिचडीवर लिंबाच तिखट-गोड लोणच....आहाहा... :)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
15 May 2010 - 10:05 am | अविनाशकुलकर्णी
लसुण सा~या मसाल्यांची चव तर मारणार नाहि ना? एक शंका :?
15 May 2010 - 2:02 pm | अरुंधती
लसूण इथे फोडणीत न परतता खिचडीबरोबर शिजवला जात आहे. तूरडाळीचा स्वतःचा एक उग्र दर्प असतो, त्यामुळे लसूण स्वाद वाढवतो, मारत नाही हे नक्की!!
[परवाच ही खिचडी केली होती घरी.... नेहमीप्रमाणेच तेव्हाही मस्तच लागली!]
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 May 2010 - 10:53 am | अस्मी
सह्ही :) छानच...!!!
झट्पट खिचडी एकदम मस्त आणि खिचडी बरोबर आमच्या कोकणात तिखटी पण करतात...ट्राय करुन बघ. :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
15 May 2010 - 2:06 pm | अरुंधती
व्वा! मस्तच गं मधुमती!
आम्ही हा प्रकार लसूण न घालता करतो.... त्याचं नाव नव्हतं माहीत... थॅन्क्स!:)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 May 2010 - 2:45 pm | मेघवेडा
खिचडी भारीच आणि तिखटी तर.. अहाहा!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!