पुणेरी पाट्या

ठणठणपाळ's picture
ठणठणपाळ in जनातलं, मनातलं
25 Mar 2008 - 10:32 pm

मित्रहो!
वेळात वेळ काढून खालील वेब्साईट पहा.
http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp
पुणेरी पाट्यांचे अनेक नमुने बघायला मिळतील.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्राजु's picture

26 Mar 2008 - 2:23 am | प्राजु

इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती.
सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Mar 2008 - 6:37 am | llपुण्याचे पेशवेll

अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे..

पुण्याचे पेशवे

मदनबाण's picture

28 Mar 2008 - 7:10 am | मदनबाण

मला ई-पत्रा द्वारे आलेली एक भन्नाट पाटी:--

Zakas Pati

(पाटी-पुस्तक वाचणारा)
मदनबाण

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 7:20 am | चतुरंग

आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे?
फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!!
आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!!

चतुरंग

केशवराव's picture

28 Mar 2008 - 3:56 pm | केशवराव

ज्याला ५१ /- ची गरज आहे तो शोधत फीरेल की ;

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

लै भारी पाटी आहे! :)

आपला,
(हागरा!) तात्या.

सुशील's picture

28 Mar 2008 - 9:28 am | सुशील

(हागरा!) तात्या.

तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 9:36 am | विसोबा खेचर

फोकलिच्या, तूच तर तो बाळासाहेब चौगुले नव्हतास ना ;)

तात्या.

सुशील's picture

28 Mar 2008 - 9:39 am | सुशील

तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 9:41 am | विसोबा खेचर

ओक्के बॉस! :)

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!!

(संत गाडगेबाबा प्रेमी)
मदनबाण

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2008 - 12:44 pm | प्रभाकर पेठकर

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले

'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.

मदनबाण's picture

30 Mar 2008 - 1:10 pm | मदनबाण

पेठकर साहेब गल्ल्त नको,
बसणार्‍यास= २०१ दंड
दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस

नविन निविदा :--
दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2008 - 1:22 pm | प्रभाकर पेठकर

गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे.

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास

ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.

कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही.
रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

30 Mar 2008 - 5:45 pm | सुधीर कांदळकर

मुंबैतील रेलवे ट्रॅकमध्ये लावायला पाहिजेत. व कारवाई करायला पाहिजे.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.