आताशा डोळ्यात
आषाढमेघ येऊन वसलाय
मनात मात्र माझ्या
वैशाखवणवा पेटलाय
*********
तुझी जागा मनामध्ये
अपुरीच राहिली
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?
*********
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं
*********
माणसे तशीच राहतात
युग फक्त सरते
महाभारतातली द्रौपदी
कलियुगातही झुरते
सुरेश नायर
प्रतिक्रिया
2 May 2010 - 9:30 pm | टारझन
:) द्रौपदीला पाच ऑप्शन्स ,,, आणि पाच जणांना एकंच ऑप्शन ,
झुरणार कोण ? विचार करण्याचा प्रश्न आहे ;)
बाकी महाभारत म्हंटलं की आपली संस्कृती किती करप्टेड , किती भोग-विलासी , किती वायझेड आहे , ह्याची प्रचिती येते :)
2 May 2010 - 9:50 pm | sur_nair
पण तो ऑप्शन तिने निवडलेला नव्हता, तिच्यावर लादला गेला होता. करप्टेड , भोग-विलासी , वायझेड हे आजच्या संस्कुतीचे सुद्धा वर्णन होऊ शकेल. द्रौपदी इथे त्या सर्वाचं प्रतिक मात्र आहे.
3 May 2010 - 12:47 am | टारझन
का म्हणे लादला गेला होता? एवढीच प्रतिकात्मक होती तर करुन दाखवायचा ना विरोध ? मस्त नांदली !! नांदलीच नाही तर महाभारत घडवलं :)
शकेल नव्हे , आहेच्च्च !! :) पुर्वीच्या संस्कृतीचे गोडवे गात आजही वायझेडगिरी चालु आहे :)
4 May 2010 - 1:47 am | sur_nair
टारझनराव, आता तुम्हीच सांगा बिचारी विरोध, तक्रार करेल तर कुणाकडे? सासूने मुलांमध्ये वाटली, नवऱ्यांनी द्यूतात पणाला लावली आणि सासऱ्याच्या जागी होते ते खरेच आंधळे नाहीतर डोळे झाकून झालेले आंधळे, सगळे पराक्रमी पण षंड(तुमच्या भाषेत वायझेड) असल्यासारखे वागले. शेवटी बिचारीला गार्हाणे घालावे लागले ते त्या नारायणाला.
बाकी तुमच्या स्मायली वरून नक्की चेष्टा करताय का सिरीयस आहात काही कळत नाही बुवा. सोडा ना त्यांचा नाद.
2 May 2010 - 11:32 pm | राघव
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?
या ओळी खास! पु.ले.शु. :)
राघव
4 May 2010 - 1:50 am | प्राजु
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं
क्लास!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
4 May 2010 - 1:53 am | शुचि
+१
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
7 May 2010 - 5:38 am | sur_nair
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे धन्यवाद
7 May 2010 - 7:08 am | बेसनलाडू
पहिल्या तीन कळल्या. म्हणजे महाभारतात ती कुणासाठी/कशासाठी झुरली आणि कलियुगात कुणासाठी/कशासाठी हे नाही कळले.
(अज्ञ)बेसनलाडू
7 May 2010 - 11:52 am | शानबा५१२
तुझी जागा मनामध्ये
अपुरीच राहिली
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?
मस्त!!
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.