काहीशी सरधोपट वाटली. सरळसोट कल्पना तशीच रोखठोक मांडल्यासारखी. अर्थात, त्यात गैर नाही काही; पण त्यासाठी कवितेच्या इतर माध्यमांचा वापर करता येईल. त्रिवेणी हा प्रकारच असा आहे की साधीसरळ किंवा क्लिष्ट - कशीही कल्पना तीनच ओळींत, मोजक्याच शब्दांत पण तरीही एखाद्या रूपकातून सट्ली मांडता आल्यास उत्तम! त्यातील गूढता इतकीही नसावी की कळणारच नाही, पण एकूण त्रिवेणी इतकीही सरधोपट नको की वाचल्यानंतर मिळणारा पहिला, उत्स्फूर्त प्रतिसाद"बरं मग?" असा असेल.
(स्पष्टवक्ता)बेसनलाडू
अस्मादिकांच्या काही त्रिवेणी येथे वाचता येतील. या दुव्यावर गुलजार यांनी केलेली त्रिवेणीची व्याख्या, त्रिवेणीकडून असलेल्या अपेक्षा यांबद्दल कळेल. गुलजार यांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद माझ्या आवडत्या जालनिशीवर वाचता येईल.
(दुवादार)बेसनलाडू
आपण उत्तम माहिती दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद. आपला स्पष्टवक्ते पणा आवडला....!!
गुलजार यांनी केलेली त्रिवेणीची व्याख्या आपण दिलेल्या दुव्या वर वाचून माझ्या काव्य ज्ञानात भरच पडली... परत एकदा मनःपुर्वक धन्यवाद...!!!
ता.क.: आपले नांव एकून/पाहून स्पंदने माझी भूकेली झाली. :) :)
जरा काहीतरी वेगळं मांडायला हवं. ह्या कल्पना त्याच त्याच असल्याशा वाटतात. "हल्ली वेडेपणाचा अर्थ समजू लागलाय" हे एखाद्या हिंदी /उर्दू गजल किंवा गाण्यातले वाटते.
बेसनलाडू यांनी दिलेल्या जालावरच्या गुलजारच्या त्रिवेणी कशा ताज्या टवटवीत वाटतात
प्रतिक्रिया
30 Apr 2010 - 10:06 am | वेताळ
हल्ली वेडेपणाचा अर्थ समजू लागलाय...
त्यातले हे वाक्य जाम आवडले.
वेताळ
30 Apr 2010 - 10:45 am | बेसनलाडू
काहीशी सरधोपट वाटली. सरळसोट कल्पना तशीच रोखठोक मांडल्यासारखी. अर्थात, त्यात गैर नाही काही; पण त्यासाठी कवितेच्या इतर माध्यमांचा वापर करता येईल. त्रिवेणी हा प्रकारच असा आहे की साधीसरळ किंवा क्लिष्ट - कशीही कल्पना तीनच ओळींत, मोजक्याच शब्दांत पण तरीही एखाद्या रूपकातून सट्ली मांडता आल्यास उत्तम! त्यातील गूढता इतकीही नसावी की कळणारच नाही, पण एकूण त्रिवेणी इतकीही सरधोपट नको की वाचल्यानंतर मिळणारा पहिला, उत्स्फूर्त प्रतिसाद"बरं मग?" असा असेल.
(स्पष्टवक्ता)बेसनलाडू
अस्मादिकांच्या काही त्रिवेणी येथे वाचता येतील. या दुव्यावर गुलजार यांनी केलेली त्रिवेणीची व्याख्या, त्रिवेणीकडून असलेल्या अपेक्षा यांबद्दल कळेल. गुलजार यांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद माझ्या आवडत्या जालनिशीवर वाचता येईल.
(दुवादार)बेसनलाडू
1 May 2010 - 6:53 am | स्पंदन
आपण उत्तम माहिती दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद. आपला स्पष्टवक्ते पणा आवडला....!!
गुलजार यांनी केलेली त्रिवेणीची व्याख्या आपण दिलेल्या दुव्या वर वाचून माझ्या काव्य ज्ञानात भरच पडली... परत एकदा मनःपुर्वक धन्यवाद...!!!
ता.क.: आपले नांव एकून/पाहून स्पंदने माझी भूकेली झाली. :) :)
(त्रिवेणी भूकेला) स्पंदन.
1 May 2010 - 6:05 am | sur_nair
जरा काहीतरी वेगळं मांडायला हवं. ह्या कल्पना त्याच त्याच असल्याशा वाटतात. "हल्ली वेडेपणाचा अर्थ समजू लागलाय" हे एखाद्या हिंदी /उर्दू गजल किंवा गाण्यातले वाटते.
बेसनलाडू यांनी दिलेल्या जालावरच्या गुलजारच्या त्रिवेणी कशा ताज्या टवटवीत वाटतात
1 May 2010 - 6:55 am | स्पंदन
एकदम बाडीस.....!!! सूधारणा नक्कीच करेल.
~ स्पंदन ~