गाभा:
सुपारी आणि नारळ:
आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो
एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो.
नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य.
पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते.
बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही)
तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी सूपारी" हे असे का यावर काही( ही) तरी प्रकाश दाखवावा
आपला अत्यंत अज्ञ...विजुभाऊ
प्रतिक्रिया
24 Mar 2008 - 2:08 pm | विजुभाऊ
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे.
पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले.
( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.)
पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी?
प्रश्नांकीत्..विजुभाऊ
24 Mar 2008 - 5:45 pm | प्रशांतकवळे
एखाद्याला "टपकवायचे" असेल तर "सुपारी "देतात
आपल्याला एवढेच माहीत आहे
प्रशांत.
24 Mar 2008 - 6:02 pm | विजुभाऊ
सुपारी घेतात . नारळ देतात. विडा उचलतात.
25 Mar 2008 - 10:00 am | विजुभाऊ
एकुणच्...स्त्री ही स्वीकारणारी आणि पुरुष हा फेकुन देणारा हे तर सूचवायचे नाही ना या रीतीमधुन
25 Mar 2008 - 12:45 pm | विजुभाऊ
हे केवळ महारष्ट्रा मधे नाही सार्या देशात आहे
25 Mar 2008 - 1:26 pm | धमाल मुलगा
हे केवळ महारष्ट्रा मधे नाही सार्या देशात आहे
काय? हे? एकुणच्...स्त्री ही स्वीकारणारी आणि पुरुष हा फेकुन देणारा
1 Jul 2008 - 3:34 pm | विजुभाऊ
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे.
याचे आश्चर्य वाटते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
1 Jul 2008 - 3:41 pm | ऋचा
:W
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
1 Jul 2008 - 4:03 pm | लिखाळ
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही)
हा हा हा .. हे बाकी मस्तच !
पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो !
काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न !
नारळाविषयी काही (ही),
नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्यास नारळ सोबत देत असावेत.
-- (उपयोगितावादी) लिखाळ.
नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत.
-- (परंपरावादी) लिखाळ.
सुपारी विषयी काही (ही)
सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी.
-- (व्यवहारी) लिखाळ.
सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्या-आम्रखंड ठेवतील का??
--(निरिक्षक) लिखाळ.
असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक.
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.