Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Mon, 03/24/2008 - 11:43
  • Log in or register to post comments
  • 4486 views

प्रतिक्रिया

Submitted by विजुभाऊ on Mon, 03/24/2008 - 14:08

Permalink

सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे

एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांतकवळे on Mon, 03/24/2008 - 17:45

Permalink

सुपारी

एखाद्याला "टपकवायचे" असेल तर "सुपारी "देतात आपल्याला एवढेच माहीत आहे प्रशांत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 03/24/2008 - 18:02

Permalink

सुपारी घेतात आणि नारळ देतात

सुपारी घेतात . नारळ देतात. विडा उचलतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 03/25/2008 - 10:00

Permalink

स्त्री ही स्वीकारणारी आणि पुरुष हा फेकुन देणारा

एकुणच्...स्त्री ही स्वीकारणारी आणि पुरुष हा फेकुन देणारा हे तर सूचवायचे नाही ना या रीतीमधुन
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 03/25/2008 - 12:45

Permalink

हे सार्‍या देशात आहे

हे केवळ महारष्ट्रा मधे नाही सार्‍या देशात आहे
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 03/25/2008 - 13:26

In reply to हे सार्‍या देशात आहे by विजुभाऊ

Permalink

काय?

हे केवळ महारष्ट्रा मधे नाही सार्‍या देशात आहे काय? हे? एकुणच्...स्त्री ही स्वीकारणारी आणि पुरुष हा फेकुन देणारा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 07/01/2008 - 15:34

Permalink

आश्चर्य वाटते

या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Tue, 07/01/2008 - 15:41

Permalink

खरच विचार करायची गोष्ट आहे.

:W "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 07/01/2008 - 16:03

Permalink

काही (ही) !

....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com