!! चारोळ्या !!

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
23 Apr 2010 - 10:14 am

हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा..

तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

*******************

चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली
चिमणा व्याकुळतेने तडफड्ला
चिमणी शोधुनही नाही मिळाली
मग चिमण्यानेही प्राण सोडला..

आपला मराठमोळा

चारोळ्या

प्रतिक्रिया

टारझन's picture

23 Apr 2010 - 5:22 pm | टारझन

:) आपल्या चारोळ्यांची नोंद केली आहे. चुचुच्या हालव्यात किंवा शिर्‍यात वापरण्यात येतील .

कलोअ

- किटक

मदनबाण's picture

23 Apr 2010 - 5:38 pm | मदनबाण

वाटले होते तुला पाहताना

येणार नाहीस कधी परत तू

दिसलीस काल फ़िरताना

हसतेस गोड सुंदर तू... ;)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 6:31 pm | विसोबा खेचर

पहिली चारोळी क्लासच आहे रे मराठमोळ्या!

जियो..!

तात्या.

शेखर जोग's picture

23 Apr 2010 - 7:11 pm | शेखर जोग

अनंत अमुची ध्येयाशक्ती अनंत अन आशा !
किनारा तुला पामराला !!

'कुसुमाग्रज' कोलंबसाचे गर्वगीत