वाहणे खांद्यावरी ते,
गर्भ ….
कोवळ्या वासनांचे,
रक्ताळलेल्या जाणीवा अन..
व्याकूळता ओल्या स्पंदनांची !
पेलणे ओझे सदाचे,
माथ्यावरी संवेदनांचे..
गुंजती रंध्रात सार्या,
गुढगर्भित कंपने…
तृषार्त मुक्या शब्दांची !
सोसणे नकोसे अताशा,
पराभव वेदनांचे…
लढतो आहे जीव कधीचा,
लढाई आपुल्याच…
जिर्ण ओल्या जखमांची !
प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही..,
शोधणे नेहमीचे…
शोधतो आहे आरंभापासुन
कारणे …
माझ्याच पराभवाची !
विशाल.
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 12:58 pm | फ्रॅक्चर बंड्या
शोधतो आहे आरंभापासुन
कारणे …
माझ्याच पराभवाची !
छान आहे ...
binarybandya™
20 Apr 2010 - 1:11 pm | टारझन
एक वेगळीच ... परंतु हळवी कविता :)
- पाडेश काव्यहळवी
21 Apr 2010 - 1:04 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
20 Apr 2010 - 1:50 pm | मितभाषी
शोधतो आहे आरंभापासुन
कारणे …
माझ्याच पराभवाची !
-
---------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
20 Apr 2010 - 2:50 pm | मनीषा
पेलणे ओझे सदाचे,
माथ्यावरी संवेदनांचे..
गुंजती रंध्रात सार्या,
गुढगर्भित कंपने…
तृषार्त मुक्या शब्दांची !
छान आहे कविता... आवडली !
20 Apr 2010 - 11:48 pm | sur_nair
खानोलकर touch आहे कवितेला.
21 Apr 2010 - 12:17 pm | विशाल कुलकर्णी
खानोलकर touch आहे कवितेला.>>>>
नाही हो, मी खुप छोटा आणि तोकडा माणुस आहे. धन्यवाद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"