चतुर

झकासराव's picture
झकासराव in कलादालन
19 Apr 2010 - 5:14 pm

घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो.
तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं.

1

छायाचित्रण

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Apr 2010 - 5:21 pm | शुचि

तळ्यावर भिरभिरताना पाहीले होते. माझ्या मुलीला लहानपणी एकदा दाखवला होता शांत बसलेला त्याची रम्य आठवण आहे : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

झुम्बर's picture

19 Apr 2010 - 5:37 pm | झुम्बर

लहान पणा पसुन मला त्यच्या जाळीदार पन्खाच आकर्षण होत...

दिपक's picture

19 Apr 2010 - 5:40 pm | दिपक

वाह. मस्त बसलय हेलीकॉप्टर.. लहानपणी ह्यांना पकडुन त्यांच्या शेपटीला छोटासा धागा बांधायचो(अर्थात त्याला इजा होणार नाही ह्याची काळजी घेऊन). त्याची आठवण झाली.

शुचि's picture

19 Apr 2010 - 6:45 pm | शुचि

वा रे वा त्या नाजूक जीवाला पकडायचा त्यातच त्याला इजा झाली .... त्यात वर धागा? :O
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 8:12 pm | धमाल मुलगा

अहो, नाही होत इजा.
बारीक पुडीचा दोरा शेपटीला बांधायचा त्याच्या. मस्त भुर्रर्र उडतो :)

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 11:22 pm | राजेश घासकडवी

लहानपणीसुद्धा इतर पोरं करायची. मला कधी ते झेपलं नाही. मला त्याला हात लावायची पण भीती वाटायची.

फोटो फारच छान आला आहे. पंखांचा नाजूकपणा, त्यावरची जाळी सुरेखच.

दिपक's picture

20 Apr 2010 - 9:29 am | दिपक

नाही हो. एकाही चितुराला आम्ही इजा नाही करायचो. धागा थोड्यावेळाने निघुन जाईल एवढा सैल बांधायचो.
एकदा गणपतीच्या मुर्ती कारखाण्यात एका कुत्र्याने गणपतीचा हात मोडला म्हणुन त्या रानटी लोकांनी त्या कुत्र्याला मारायला सुरवात केली होती. त्या कुत्र्याला आमच्याच बालसेनेने वाचवुन दुर सोडले होते.

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 5:52 pm | धमाल मुलगा

च्यायला!
झक्या, लेका पक्का फोटुग्राफी एक्सपर्ट हैस की रे.

मस्त पकडलायस चतुराला :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2010 - 11:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही लहाणपणी त्याला 'देवाचा घोडा' म्हणायचो.

-दिलीप बिरुटे

प्रशु's picture

19 Apr 2010 - 11:27 pm | प्रशु

ह्या चतुर बरोबर अजुन एक प्रकारचा किटक आमच्या शाळेजवळ असायचा, आम्ही तीला सुई म्हणत असु, कारण ती आकाराने फार बारीक असते पण रंग संगती खुपच सुंदर...

वरील छायाचित्र आवडले...

झकासराव's picture

20 Apr 2010 - 12:01 pm | झकासराव

धन्यवाद दोस्तहो. :)

सुई झिरो फिगरची असते. :D
ते चतुर पकडुन त्याच्या शेपटीला धागा बांधुन उडवण्याचा कार्यक्रम शाळेत असताना बर्‍याच वेळा सोबत्यानी केलाय.
मला कधी सापडायचाच नाही शिवाय आई धोपटेल ही भिती असायचीच. :)