अरे ! अरे s s s रे ! ! !
जन्मलो तेव्हांच मृत्यो अरे !
भेट अपुली ठरली असे.
यौवानांत मी, अन अचानक,
आज तू द्वारी वसे.
अधिरता तुज, काय वेडी
मिलनाची आपल्या.
लोक म्हणतील हाय हाय,
मिलनासी आपल्या.
.
गेले आज विपरीत समयी,
खंत ह्याची इतुकी नसे.
गेले तुजसवे मी यौवनी
शोक याचा सकलां असे.
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
19 Apr 2010 - 2:50 pm | झुम्बर
वा मस्त आहे
भन्नाट आहे