अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीच्या प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांचा नुक्ताच "संशयास्पद" मृत्यू झाला. त्यांना अलीकडेच विद्यापीठातील त्यांच्या पदावरून समलैंगिक संबंध ठेवल्याकारणाने निलंबित करण्यात अाले होते. प्रा. सिरास हे मराठी साहित्याचे अभ्यासक व शिक्षक होते. कुठल्यातरी बातमीपत्रात कवि ग्रेस यांनी त्यांची प्रशंसा केल्याचे वाचले. ते कविताही करत असत, व त्यांच्या कवितासंग्रहाला पारितोषिकही मिळाले होते असे ऐकले.
त्यांच्या कविता किंवा अन्य लेख कोणी वाचलेय? त्याबद्दल काही अभिप्राय? मराठी साहित्यजगाकडून या घटनेला काय प्रतिसाद मिळाला अाहे? अंतरजालावरच्या शोधात फक्त हिंदी-मराठी वर्तमानपत्रातील मृत्यूची बातमी तेवढीच आढळली. त्यांच्या बद्दल मराठीत लिहीलेले लेख कुठे अाढळल्यास कृपया त्यांचा संदर्भ इथे कळवावा.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
15 Apr 2010 - 8:07 am | पाषाणभेद
त्यांच्या जाण्याबद्दल संवेदना तर आहेतच. मोठे नुकसान झाले. त्यांना आदरांजली पण...
एक तर आहे उत्तर प्रदेश, त्यात आहे अलीगढ त्यात आहे मुस्लिम युनिवर्सिटी, त्यात आहे प्राध्यापक, त्यात त्यांचे नाव आहे श्रीनिवास रामचंद्र, त्यात त्यांचा मृत्यू "संशयास्पद", त्यात त्यांना विद्यापीठातील त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले, त्यात समलैंगिक संबंध, त्यात ते आहेत मराठी साहित्याचे अभ्यासक
एकूणच मामला गंभीरच होता.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
20 Apr 2010 - 11:15 am | अमोल नागपूरकर
११ एप्रिलच्या नागपुर तरुण भारत मध्ये त्यान्च्या बद्दल लेख आला आहे.
http://www.tarunbharat.net/site.home/paper_type/1/date/2010-04-11/page_no/5
20 Apr 2010 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रा. सिरास यांच्या बद्दल वर्तमानपत्रातूनच कळले. अजूनही बरीच माहिती येत आहे. त्यांच्या बद्दल फारसे माहित नाही पण मराठी साहित्यात काहीसे ऐकलेले नाव असलेल्या बाई त्यांच्या नातेवाईक आहेत हे परवा सकाळमधे वाचले.
हा गुंता वाढतो आहे हे मात्र नक्की.
बिपिन कार्यकर्ते