चिकित्सकांची नाडिपरीक्षा...!
श्री. घाटपांडे सो|,
हॅहॅहॅ! नमस्कार, कसे काय आहात?! चिकित्साकार्याविषयीची आपली निष्ठा आणि आपली चिकाटी ही शिकण्यासारखी आहे, बरे! असो. चिकित्सा कशी असावी ह्या अनुषंगाने आपला - माझा ह्यापूर्वीही एक दीर्घसंवाद झालेला आहे. आपल्या उभयतांच्या त्या चर्चेमध्ये विचारात घेतल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपणांस चक्क विसर पडलेला दिसतो. तरी त्यांची एक उजळणी करावयाचा एक नम्र प्रयत्न म्हणून आणि आपल्या चिकित्साकार्याची - किंबहुना त्या कार्याच्या महतीची - येथील नव्या वाचकांस एक जुजुबी माहिती असावी म्हणून ते महत्त्वाचे मुद्दे येथे पुनः चर्चेत आणतो आहे.
हा लेख आपण डकविलेल्या "ओंकाराची नाडिपरीक्षा" ह्या लेखास सविस्तर उत्तर म्हणून देतो आहे असे आपण एंव्हांना ओळखले असेलच! एकच विनंती आहे. हा लेख व्यक्तिगत मानून घेवू नये. एकूणांतच नाडिपरीक्षा प्रश्नाचे स्वरूप सामाजिक आहे, त्यातही आपले चिकित्साकार्य हे जनहितार्थ असल्याचे आपण सांगता, त्यामुळे ह्या प्रश्नाकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोन हा सर्वांगाने विस्तीर्ण झाला आहे अशी माझी ठाम समजूत आहे. तरीदेखील हे लेखन 'व्यक्तिगत रोख असलेले' किंवा 'व्यक्तिगत पातळीवर गेलेले' अशी एखाद्याची समजूत होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्याकरिता म्हणून येथे दिलेले संदर्भ - उपसंदर्भ तपासावेत. कुठलेही व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप टाळण्याची काळजी घेऊनच हे लेखन केले आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
असो. आपणास आठवत असेल, ह्या विषयावरील दीर्घसंवादात विचारल्या गेलेल्या चिकित्से विषयक माझ्या एकाही प्रश्नांस आपण आजपावेतो उत्तरे देवू शकलेला नाहीत हे सर्वमान्य उघड सत्य आहे. (पटेल अशी - समर्पक उत्तरे देणे वेगळे!) खरे पाहतां, आपल्याला काय करावयाचे आहे हे आपले आपल्यालाच अजून उमगले नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. मी पूर्वीही आपणांस ह्याबाबतीत विचारले होते, आता थोडे स्पष्ट विचारतो. आपणांस आणि आपणांसारख्या इतरांस नेमके काय करावयाचे आहे? खालीलपैकी एक अथवा अधिक उत्तरे निवडावीत.
- आम्हांस श्री. ओक ह्यांस खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस सारे नाडिवाचकांस खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस नाडिशास्त्रास खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस फलज्योतिषचिकित्सक म्हणून समाजमान्यता मिळवायची आहे.
- आम्हांस लोकांचे मनोरंजन करीत वेळ घालवावयाचा आहे.
प्रश्न जरा रोखठोक आहेत. (कृपया वाईट मानून घेवू नये!) परंतु उपक्रमावरील आपल्या - माझ्या दीर्घसंवादामध्ये देखील आपला गट आपली भूमिका स्पष्ट करू शकलेला नाही. आपण वरीलपैकी सारे पर्य्याय निवडलेत तरी मला आनंदच आहे - परंतु एखाद्यास खोटेच ठरवावयाचे असेल, तर ते तर्कबुद्धीस पटेल ह्या पद्धतीने ठरवावे असे मला वाटते.
असो. वरील कथेमध्ये मी श्री. पाटलांना दोष देणार नाही. श्री. पाटील हे बीएसएनएल मधील एक अधिकारी आहेत असे आपण सांगता. ते शास्त्राभ्यासकही नसावेत, नाडिशास्त्राभ्यासक असणे सोडाच! असे आहे, की श्री. पाटलांच्या स्वत:च्या तटस्थानुभवाविषयी प्रश्न नाही, त्यांच्या अभ्यासपद्धतीविषयीही प्रश्न नाही, परंतु सदरील विषयाच्या अभ्यासात त्यांच्या मतांस ग्राह्य धरावयाचे काय हा प्रश्न आहे. धरावयाचे असल्यास कितपत ग्राह्य धरतां येईल हा निराळा प्रश्न. श्री. पाटलांस नाडिवाचकांस खोटे ठरवावयाचे होते असे असल्यास त्यांनी ते कार्य यथामति सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असे एकंदर दिसते. परंतु त्यांच्या ह्या कार्यामुळे मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
श्री. पाटलांच्या तर्काने नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय हा प्रश्न सुटत नाही, कारण त्यांनी त्यावर काहीच भाष्य केलेले नाही. जोवर ह्या विषयाची उकल होत नाही तोवर इतर कितीही धोपटाधोपटी केली, तरी तो निव्वळ धिंगाणा ठरेल. श्री. पाटलांच्या शोधकार्यात 'बहुधा सांगितलेले भूत-भविष्य खरे ठरत असावे' असे गृहितक धरून त्या अनुषंगाने विचार तथा मांडणी आहे. ह्यामुळे श्री. पाटलांच्या लेखास एक विस्कळीतपणा आलेला आहे. श्री. पाटलांच्या विस्कळीत मताचा आधार घेवून नाडिशास्त्रास खोटे ठरविण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या चिकित्सा-वितर्कास घातक आहे, आणि म्हणून त्यांच्या मतांवर आधारलेला आपला युक्तिवाद मला पटत नाही. जसे नाडिग्रंथांच्या बाजूने बोलणारी मंडळी पटू शकेल असा युक्तिवाद करीत नाहीत, तसेच नाडिग्रंथांच्या विरोधाने बोलणारी आपण मंडळीही पटू शकेल असा युक्तिवाद करीत नाहीत; आणि येथेच आपण स्वतःची कोंडी करून घेता आहात.
पूर्वी लिहिल्याप्रमाणे श्री. पाटलांच्या शोधकार्यात 'बहुधा सांगितलेले भूत-भविष्य खरे ठरत असावे' असे गृहितक धरून त्या अनुषंगाने विचार तथा मांडणी आहे. ह्यामुळे त्यांच्या संशोधनकार्यास 'टेपरेकॉर्डर ठेवणे' इत्यादिसारखी बालीश दिशा प्राप्ती झालेली आहे. ह्यासारखे हास्यास्पद संशोधन बहुधा दुसर्या कोणी केले नसावे! असो!
कोणी कोणावर आणि कशावर विश्वास ठेवावा हा वैयक्तिक प्रश्न होय. परंतु तर्काभ्यासदृष्टीने विचार करतां सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या पेक्षा:
- नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
- लेखन केले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये असते;
- ते लेखन कोणत्या भाषेमध्ये असते;
- त्या भाषेस काही व्याकरण आहे काय;
- व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;
- लेखनाच्या वाक्यरचनेचा काळ - खरोखरीच भविष्यकथन केलेले असते काय;
- नाडिकेंद्रांमध्ये पट्टी शोधण्यासाठी आपल्या अंगठ्याचा छाप कां द्यावा लागतो?
- तो तसा दिल्यानंतरसुद्धा आपणांस काही प्रश्न कां विचारले जातात?
अशा विषयांवर प्रकाश पडणे आवश्यक आहे. तेथून पुढे इतर विषय चर्चिल्या जाऊ शकतील.
तरी मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण स्वत: अथवा आपल्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा, आणि चिकित्साकार्य एका नव्या दिशेने आरंभावे. मुहूर्त्त काढून हवा असल्यास कोणत्याही नाडिपरीक्षकांशी संपर्क साधावा.
शुभस्य शीघ्रम! नन्राह वेलैगळुक्काह तामदप्पडक्कूडादु!
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
-
प्रतिक्रिया
4 Apr 2010 - 8:04 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. हैयैयो आणि श्री. घाटपांडे हे दोघेही अतिशय प्रामाणिक असल्याने या चर्चेचा वैयक्तिक भांडणांचा आखाडा होणार नाही हा विश्वास आहे. वरील लेखात मांडलेल्या श्री. पाटिल यांच्या लेखाबद्दल मांडलेले विचारही काहीसे पटण्यासारखे आहेत तरीही त्यांनी लिहिलेल्या प्रसंगातून नाडी केंद्रांची चलाखीच दिसते असे कितीही न्यूट्रल विचार केला तरी वाटते आहेच. यावरील श्री. घाटपांडे यांचे उत्तर वाचायची उत्सुकता आहे.
पण हे ही नमूद करावेसे वाटते की या आधी श्री. ओक यांच्याकडूनतरी फारशी गंभीरपणे चर्चा केली गेली नाही असे वाटते. ज्याबद्दल आपण हिरीरीने आणि अथकपणे प्रसार / प्रचार करतो त्याबद्दल काही प्रश्न विचारले की 'तुम्हीच अनुभव घ्या / तुम्हाला पाहिजे तिथे जा / मी काहीच सुचवणार नाही' अशी उत्तरे आली. पण या चर्चेतून तरी काही कळेल / निष्पन्न होईल अशी साधार आशा व्यक्त करतो.
बिपिन कार्यकर्ते
4 Apr 2010 - 8:26 pm | हैयो हैयैयो
चलाखीचा मुद्दा.
'नाडिकेंद्रचालकांची चलाखी' हा दुय्यम मुद्दा आहे; तो सद्यस्थितीत विचाराधीनही नाही. त्यामुळे त्याबाबतीत काहीही सिद्धासिद्ध झाले तरीही जोवर मूळ प्रश्नांची उकल करण्यास ते पूरक होत नाही तोवर एखाद्या शास्त्राच्या चिकित्साभ्यासामध्ये ते विचारार्ह असावे असे काही प्रामाणिकपणे वाटत नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हैयो हैयैयो!
4 Apr 2010 - 8:51 pm | अरुंधती
मला वाटते की ओकांनी onus to prove the authenticity of Nadi Bhavishya दुसर्यावर ढकलून देऊ नये. जर त्यांना जबाबदारीने, सुजाणतेने, जागरुकतेने नाडीभविष्याविषयी काही सांगायचे असेल तर त्याविषयी अधिक खोलवर जाऊन त्या विषयाची पाळेमुळे खोदणे हे त्यांना नाडीग्रंथवाचकांशी निकट परिचय असल्यामुळे जास्त शक्य आहे.
तसेच त्यांनी इन्डॉलॉजीच्या तज्ञांची वगैरे मदत घेतल्याचे जे उल्लेख आहेत त्यातून काय साध्य झाले हेही कळवावे. पुरातत्वशास्त्रातील तज्ञांची, लिपीतज्ञांची मदत घेणे एवढे अवघड नाही. पण नाडीवाचकांचे सहकार्य मिळणे अवघड, जे ओक साधू शकतात. त्यांना स्वतःला नाडीग्रंथाविषयी ठाम विश्वास असल्यामुळे कदाचित त्याचा शास्त्रशुध्द पध्दतीने संशोधित रूपात अभ्यास होणे किती आवश्यक आहे ह्याचे महत्त्व वाटत नसावे. अशा अभ्यासातून माझ्या मते २ गोष्टी किमान साधल्या जातील :
१. नाडीग्रंथांच्या पट्ट्यांच्या शास्त्रीय पृथःकरणाने त्यांचा नक्की काळ ठरवता येईल. ह्या पट्ट्या तमिळ भाषेत असल्याने त्या काळात तिथे कोणाचे राज्य होते, कशा प्रकारची संस्कृती होती इ.इ.चा आढावा घेऊन त्याबरहुकूम पट्ट्यांचा अभ्यास करता येईल. तसेच त्या कालातील भाषा, लिपी, व्याकरण, वनस्पती-प्राणी-देवी-देवता इ. सन्दर्भ ह्यांवरही प्रकाश पडेल.
२. नाडीग्रंथ हे केवळ भविष्यकथनाचे माध्यम नसून त्यांच्याकडे एक साहित्यप्रकार म्हणून ही पाहणे अनिवार्य आहे. कारण त्यातील रचना ही म्हणे सांकेतिक लिपीत, पद्य स्वरूपात आहे. म्हणजेच त्या काळातील प्रतिभेचे, विद्वत्तेचे, कुशलतेचे ते प्रतिबिंब आहे. शिवाय अनेक शतके ही कला चालत आलेली आहे. [नाडीवाचन, कथन इ.इ.] त्याचे स्वरूपही बहुधा पारंपारिक आहे. एकप्रकारची लोककलाच म्हणू शकतो. आज ज्योतिषशास्त्रात असे परंपरागत ज्ञान/ कौशल्य अभावानेच दिसते. त्या दृष्टीने ह्या नाडीग्रंथवाचनकलेकडे पाहावयास गेल्यास त्याचा वेगळा पैलू समोर येतो.
३. ज्याप्रमाणे नॉस्ट्रडॅमसचे भविष्यकथन लोकप्रिय झाले त्याप्रमाणे ह्या नाडीग्रंथांमध्ये जगातील घटनांविषयी, समाजाविषयी भाष्य आहे काय हेही जाणणे औत्सुक्याचा विषय ठरेल.
तसेच शुकनाडी, शिवनाडी, अगस्त्यारनाडी, भृगुसंहिता, रावणसंहिता अशा विविध नाडीग्रंथांवर काम होणे आवश्यक आहे.
नाडीग्रंथांच्या विज्ञाननिष्ठ अभ्यासासाठी ''तू कर, तू कर'' असा खेळ खेळण्यापेक्षा ज्या ज्या कोणाला ह्यात रस आहे त्यांनी एकत्र येऊन [भले उद्देश काहीही असो!] त्यासाठी काम करायला हवे असे माझे मत आहे.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
4 Apr 2010 - 9:02 pm | शशिकांत ओक
अरुंधतीजी,
पुर्वग्रह न ठेवता, या कामात आपणांस आभिप्रेत नाडीग्रंथांच्या भाषेच्या, काव्याच्या, साहित्याच्या अंगाने आपण पुढाकार घेउन आपल्या माहितीतील काही समविचारांच्या शोधअभ्यासकांना एकत्र आणण्याची काही जबाबदारी पार पाडायला तयार असल्यास आत्ता पर्यंतच्या लेखनकार्याचे काही चीज झाल्यासारखे होईल.मला अशा कामात शक्य तितकी मदत करायला आवडेल.
प्रयत्न तर करून पहा. अवघड नाही.
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
4 Apr 2010 - 10:17 pm | प्रकाश घाटपांडे
नमस्कार मंडळी
नमस्कार हैयो हैयैयो (फारच टंकायला अवघड ब्वॉ)
ओंकार पाटील यांचा लेख फक्त द्यायचा राहिला होता. बाकी आम्हाला नाडी बद्दल जे काही सांगायचे आहे ते सांगुन झाले आहे. अनेकांना ओंकार पाटील यांचा अनुभव वाचायची इच्छा होती व ओकांच्या नाडीचे अनुभव चालू झाल्याने तो लेख दिला इतकेच.
#
गुढ विषयावर श्रद्धाळू लोक आपले अनुभव सांगताना मीठ मसाला लावुन सांगतात. अनेक थापाडे लोक हे आपले मित्र असतात म्हणुन ते लबाड असतातच असे नाही. आम्हाला यानिमित्त भ्रमाचा भोपळा हा लेख आठवतो. भ्रमसेन व ठकसेन यांची परंपरा बरीच जुनी आहे. बर्याच लोकांना नाडी अनुभव हा अनुभुतीचा वाटतो. एकदा अनुभुती म्हटले कि ती व्यक्तिगत पातळीवर जाते व चिकित्सेला ती फाटा देते. नाडी ज्योतिष व फलज्योतिष या प्रकरणात आम्हाला जे काही सांगायचे आहे त्याचा परामर्श घेतला
आहेच.
अंधश्रद्धाकडे पहाण्याची चिकित्सक दृष्टी या नारळीकरांनी लिहिलेल्या परिक्षणामुळे तो चिकित्सक शब्द फेमस झाला. नाही तर आम्हाला कोण विचारतो? काही लोक आयुर्वेद चिकित्सासारखा तो शब्द घेतात त्यांना आम्ही तो शवचिकित्सा सारखा घ्या असे सांगतो.
हॅहॅहॅ हे बाकी खर ब्वॉ! मनोरंजन करता करता चिकित्सेला प्रवृत्त करण्याचा कुटील डाव ही आमच्या मनात असतो.
आता नाडी ग्रंथांना लोकसाहित्य, लोककला अशा सदरात घातल्यावर बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. आम्ही त्याला या सदरात पुर्वीच घातले आहे. भाषा, लिपी, व्याकरण यात मग बसा खेळत. तो चक्रावुन टाकणारा चमत्कार वगैरे भानगड केली कि मग चिकित्सेचा प्रश्न येतो.
आमच्या लेखी नाडी ज्योतिष ही प्रायमा फेसी केसच नाही.
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
इथे आम्ही ते सांगितले आहेच.
नाडीवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते काहीही करुन ठेवतातच व ज्यांना ठेवायचा नाही ते काही झाले तरी ठेवत नाही असा आमचा अनुभव आहे. हे देव आत्मा प्लँचेट पुनर्जन्म भुतखेत सिद्धी वगैरे बाबतीत देखील खरे आहे.
एकतर श्रद्धाळू लोक चिकित्सेच्या भानगडीत पडत नाहित आणि अडचणीत आलेले तर अजिबात नाही त्यामुळे हे गुर्हाळ चालू राहणार. श्रद्धाळू लोकांना पटतील अशी उत्तरे देता येणे कठीण. आम्ही फक्त संशयाचा किडा सोडण्याचे काम करतो.
नाडी विषयावर प्रतिसाद देताना तुम्हाला ती राजा भिकारीची गोष्ट आठवते का? मला थोडी फार आठवते अशी कि एका उंदराला रस्त्यामदी लाल फडक सापडल. त्या फडक्याची त्याने एक टोपी शिवली आणी राज्याच्या महालाच्या समोर जाऊन ढुमक वाजवत म्हणला , "राजाची टोपी घान घान मपली टोपी छान छान..... ढुम ढुम ढुमाक". राजाला त्याचा वात्रटपना आवडला नाही. त्याच्या चमच्यांनी उंदराची टोपी हिसकुन घेतली तर लगी उनंदीर म्हनायाला लागला कि, "राजा भिकारी माझी टोपी घेतली... ढुम ढुम ढुमाक". .राजाला वैतागला आन त्यानी ती टोपी परत केली. तर हा उन्दीर म्हनतो कसा,"राजा घाबरला , मपली टोपी दिली ... ढुम ढुम ढुमाक".
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
4 Apr 2010 - 10:18 pm | नितिन थत्ते
(पाटलांनी लिहिलेला अनुभव खरा आहे असे गृहीत धरून)
जातकानेच दिलेल्या माहितीखेरीज एकही जास्तीची गोष्ट नाडीवाचक गुरुजींना सांगता आली नाही. आणि भविष्यविषयक विचारलेल्या एकाही प्रश्नाचे ठोस उत्तर गुरुजींनी दिले नाही. हे पाटलांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.
जी माहिती सांगितली ती पाटलांनीच आधी सांगितली होती हे पाटलांनी आधीच्या प्रश्नांचे संदर्भ देऊन दाखवून दिले आहे.
या काथ्याकुटात उपस्थित केलेले प्रश्न काथ्याकूट या शब्दाला जागणारे आहेत. त्यांचा चिकित्सा या शब्दाशी काही संबंध दिसत नाही.
मूल प्रश्न नाडीवाचनातून भूत भविष्य कळते का हाच आहे. तुम्ही ज्याची चिकित्सा करायला सांगत आहात उदा. नाडीतील लिपी, व्याकरण ते विषय मूळ प्रश्नाच्या निर्णयासाठी अजिबात संबंधित नाही.
पाटलांना जर नाडीवाचक गुरुजींनी नवीन काही सांगितले असते जे पातलांनी आधी सांगितलेले नाही तरच या लिपी, व्याकरण आदि प्रश्नांचा पुढे पाठपुरावा करण्यात हशील असते.
(अवांतरः ओकांची नाडी आता सुटलीच आहे अशी वेळ आली की हैयो हैयैयो मैदानात येतात हे आमच्या नाडी न पाहता लक्षात आले आहे.)
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
5 Apr 2010 - 10:05 am | प्रकाश घाटपांडे
नाडीला चक्रावुन टाकणारा चमत्कार वरुन इंडॉलॉजी कडे नेण्याच्या प्रयत्नाचा प्रवास पाहिला कि ते लगेच लक्षात येते. मूळ प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्याचाच हा प्रयत्न आहे. खर तर हा प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही.
"नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात." हे आम्ही विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` मधे म्हटले आहेच.
भ्रमसेन हेच ठकसेनांचे उत्तम मार्केटिंग एजंट असतात. अंधश्रद्धांचे बळी हेच बुवा बाबांचे उत्तम प्रसारक व प्रचारक असतात. बर्याचदा अंनिस मुळेच बुवा बाबांना प्रसिद्धी मिळते. मी त्याचे गोड बाबा हे उत्तम उदाहण नेहमी देत असतो.
नाडीपट्ट्यांची संख्या एवढयाच एकमेव मुद्द्यावर हे प्रकरण निकालात निघते.बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकातील
पृष्ठ १२१ वर ते म्हणतात 'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ओकांचे हे विधान त्यांच्या बिनधास्त व बिनडोकपणाचे द्योतक आहे. याच्या पेक्षा आता काय बोलणार ? हा मजकुर आपोआप कसा काय बदलतो बुवा!
त्यांच अत्री जीव नाडी प्रकरण तर कडी आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
2 May 2010 - 10:36 am | हैयो हैयैयो
भरकटली!
मी नाडिस 'चक्रावून टाकणारा चमत्कार' असे कधीही म्हटलेले नाही. आपली चित्तभ्रांति होते आहे. आपण चर्चेमध्ये नेहमीच कसे काय बुवा भरकटतां? असो. एकदा आपण आपणांस काहीच करावयाचे नाही असे जाहीर केल्यानंतर आपल्या भरकटण्यासही महत्त्व देतां येत नाही!
हैयो हैयैयो!
2 May 2010 - 10:30 am | हैयो हैयैयो
वकिली प्रयत्न.
भूतभविष्यास न मानणा-या माझ्यासारख्या व्यक्तिंसाठी मूळप्रश्न भूतभविष्य कळते काय हा नाहीच! किंबहुना मी चिकित्सा करावयास सांगत असलेले विषय हे मला मूळप्रश्न वाटतात. ते विषयाशी संपूर्णतः संबंधित आहेत, (कसे ते मी पूर्वीच दाखवून दिलेले आहे.) ह्या विषयांची चिकित्सा ही आपल्या मूळप्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ ठरू शकेल.
श्री. नितीन थत्ते, आपण काही प्रतिसाद फारच 'वैयक्तिकरीत्या' विचारात घेता, राव! एखाद्याने योग्य वाटत असल्यास प्रयत्न (अथवा आपण म्हणतां तसे वकीली प्रयत्न) करू नयेत असा काही नियम आहे की काय? ;-) मी निदान 'वकीली प्रयत्न' तरी करतो आहे! असो. माझ्या वकीली प्रयत्नांस इतरांच्या वैज्ञानिक / ऐतिहासिक / इतर प्रयत्नांची जोड मिळाली तर खरेखोटे ते लवकरच हाती येईल.
हैयो हैयैयो!
4 Apr 2010 - 10:29 pm | अरुंधती
हेच!
मला म्हणायचे होते ते हेच : नाडीभविष्याच्या सत्यासत्यतेचा भाग तूर्तास बाजूला ठेवा व त्याकडे केवळ एक ग्रंथ म्हणून किंवा संकलन म्हणून पहा. मग काय दिसेल? तर अनेक शतके लोकप्रिय असणारा भविष्यकथनाचा एक साहित्यपूर्ण प्रकार....
आता त्यावर फोकस केल्यास त्या अनुषंगाने इतरही चर्चा होऊ शकते.
नाडीकथन करणार्यांचे ट्रेनिंग हा एक उत्सुकतेचा विषय. कारण त्यांचे औपचारिक/ शालेय शिक्षण फार झाले असेलच असे नाही! मग त्यांना इतर कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्यात येते?
हा प्रकार परंपरागत असल्यामुळे त्यातही काही कोण गादी चालवणार इत्यादी नियम आहेत काय? प्रमुख नाडीवाचक कसा ठरतो? नाडीवाचकांची जीवनशैली कशी असते? सर्वसामान्यांपेक्षा त्यात काय वेगळे असते? स्वतः नाडीवाचक स्वतःची नाडी वाचतात का? ह्या समाजातील उच्चशिक्षित लोक असल्यास त्यांचे नाडीविषयक विचार काय? नाडीपट्ट्या ठेवायची त्यांची काही लायब्ररीसारखी सिस्टीम आहे काय? ह्या पट्ट्यांमधून तुम्हाला अपेक्षित नाडी हुडकून काढायची त्यांची काय पध्दत आहे?
तसेच आत्ताच्या बोली/ लिखित तमिळ भाषेत व नाडीग्रंथांच्या तमिळ भाषेत अर्थातच बरीच तफावत असणार. ह्या प्राचीन तमिळ भाषेवर इतर कोणत्या भाषांचा प्रभाव [जसे संस्कृत] जाणवतो का? त्या प्रकारच्या भाषेतील अन्य साहित्य तमिळ भाषेत उपलब्ध आहे काय? असल्यास ते कोणत्या कालातले आहे? त्या लिखाणाछी शैली व ह्या काव्याची शैली यांच्यात साधर्म्य आढळून येते काय? इ. इ. इ.....
असे बरेच श्रध्देशी संबंध नसणारे आणि तरीही नाडीग्रंथांबाबत अर्थपूर्ण असे खूप सवाल आहेत. घाटपांडे साहेब, तुम्हालाही ह्या कामात केवळ अभ्यास म्हणून रुची घेता येईल... किंवा सत्य पुढे आणायचे ह्या भावनेतूनही!
ओकसाहेब, माझे सर्व इन्डॉलॉजीचे ज्ञान गेली अनेक वर्षे धूळ खात आहे हो! मी सध्या अजिबात टचमध्ये नाहीए.... फारतर माझ्या डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधक मंडळ, टिमवि येथील तज्ञ मित्रमैत्रिणींची नावे वगैरे तुम्हाला देऊ शकते. पण त्या काळाशी संबंधित संशोधन करत आहेत वा नाही हेही मला माहित नाही. किंवा तुम्ही देगलूरकर सर, ढवळीकर सर, गोखले मॅडम, बहुलीकर सरांशी संपर्क साधू शकता. तसेच चेन्नईच्या पुरातत्व विभागाचे, प्राचीन तमिळ साहित्य विभागाचे तज्ञ ह्या ग्रंथांविषयी काय म्हणतात? ते जाणून घ्यायला आवडेल!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
4 Apr 2010 - 11:15 pm | शशिकांत ओक
आपण उल्लेखलेल्या व्यक्तींशी मी व्यक्तीशः संपर्क केला नाही पण त्या संस्थांना भेट देऊन आलो आहे. तेथे नाडी ग्रंथावरील शोध कार्य झालेले नाही. होण्याची शक्यता ही नाही. अन्य ठिकाणी मी तमिळनाडूतील संस्थांशी संपर्क करून आहे. पण त्यांनीही काही शोध कार्य केलेले नाही व करावे अशी परिस्थिती सध्या तरी नाही.
अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
5 Apr 2010 - 2:28 pm | शशिकांत ओक
उंदीर-राजाच्या गोष्टीतील उंदीर फक्त शाब्दिक विजय मिळवल्याच्या समाधानाची टिमकी बडवतो. आष्श्चर्य असे की आपल्या कुटिल हेतूपासून प्रवृत्त होऊन एकही उंदीर राजाला पहायला व शोध घेण्याला निघाला का नाही? गप्पा व तर्क करून नाडीग्रंथ राजाला कसे फसवले वा बनवले असे मानून असे आनंदी होता येत असेल तर रहा त्याच आनंदात.
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
5 Apr 2010 - 6:31 pm | चित्रगुप्त
मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल.
या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे:
१. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे.
२. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे.
३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे.
४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणार्या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे.
५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी.
६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा.
हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल.
सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.
6 Apr 2010 - 2:56 pm | अरुंधती
हे खरे सकारात्मक पाऊल असेल नाडीग्रंथांच्या भविष्यकथना विषयी खरे-खुरे, प्रत्यक्ष जाणून घेण्याविषयी! त्यात प्रथमदर्शी पुरावाही मिळेल व केवळ तर्क-क्रीडा करण्यापेक्षा व नाडीग्रंथ खरे की खोटे ह्यांवर तासन्तास चर्वितचर्वण करण्यापेक्षा अशा पध्दतीने आलेल्या अनुभवांतून सप्रमाण चर्चा होऊ शकेल. अन्यथा बाकी सर्व काही बौध्दिक कसरती! त्याला पुरेशा पुराव्यांची जोड नाही. म्हणजे नाडीग्रंथ थोतांड अथवा नाही ह्यातही संशयच!!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
10 Apr 2010 - 4:31 pm | तिमा
नाडीग्रंथाबद्दल सत्य जाणून घ्यायचे असेल तर मिपाकरांनी एक समिती नेमावी व त्यांनी नाडीकेंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी. पट्टीवाचन हे तिथल्या माणसावर न सोपवता तामिळ जाणणार्या ' हैयो हैयैयो' यांना वाचण्यास सांगावे. त्या समितीत घाटपांडे, ओक, संपादक यांनी भाग घ्यावा.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Apr 2010 - 6:34 pm | अरुंधती
@ओकसाहेबः आत्तापर्यंत नाडीग्रंथांवर अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास भारतातील कोणत्याही पुरातत्व खात्याने/ अभ्यासक मंडळींनी रुची दाखवली नाही हे गृहित धरले तर ह्या 'लोकप्रिय' भविष्यकथनाच्या ताडपट्ट्यांसंबंधी ते एक प्रकारचा अविश्वास, अरुचि व उदासीनता प्रकट करत आहेत हे आपणास लक्षात येत आहे काय?
कारण जर त्यांना त्या विषयात काही गम्य असते तर आतापर्यंत हा विषय संशोधनावाचून दुर्लक्षित राहिला नसता.
तुम्ही जे केवळ चमत्कृतीपूर्ण घटना, भविष्यकथन ह्यांचे किस्से सुनावता त्या ऐवजी जर आपण त्या ग्रंथांवर जर कोणी वैज्ञानिक अथवा साहित्यिक धाटणीचे संशोधन केले असेल ते पुढे आणलेत तर फार बरे होईल. अन्यथा आपले लेख म्हणजे फुटकळ मनोरंजन/ विरंगुळा ह्याखेरीज काहीच सिध्द करू शकणार नाहीत. त्यातून लोकांना तुम्ही नेमका काय संदेश देत आहात तेही जरा तपासून पहा.
''नाडीभविष्याच्या आधारे आयुष्यातील सर्व समस्यांचे परिहार होतात, त्यातून मार्ग निघतो वगैरे वगैरे...'' जे फक्त अर्धसत्य/विश्वास आहे. माणसाला आपल्या प्रयत्नांतून, आत्मविश्वासातून व मनोबळातूनच समस्यांवर मात करता येते. आपली संकल्प शक्ती वाढवण्यासाठी तो निरनिराळ्या दैवी, आध्यात्मिक मार्गांची मदत घेऊ शकतो. परंतु शेवटी कर्म त्यालाच करावे लागते! पण आपले लेख याच्या उलट संदेश देतात. मनुष्याच्या प्रयत्नशीलतेला, कर्तव्यशक्तीला कमी लेखतात. तसे न होऊ द्यावे. त्या ऐवजी आपल्याला विशेष रुची असलेल्या नाडीग्रंथांतील भाषा, संज्ञा, उपमा, उदाहरणे, संख्या, लालित्य इत्यादीच्या विषयी किंवा त्या नाडी पट्टीला कसे ठेवले जाते, कसे प्रिझर्व्ह केले जाते, त्या पट्टीवर रासायनिक प्रयोग केले आहेत काय, जर एका पट्टीतला मजकूर बदलत असेल तर तो कसा 'बदलतो'.... ह्यात परमिटेशन, कॉम्बिनेशन असते काय इ.इ. माहिती पुढे आणलीत तर ते वाचकांच्या व नाडीग्रंथांच्या जास्त फायद्याचे ठरेल असे माझे व्यक्तिगत मत आहे.
पुरातत्वीय संशोधनात नाडीग्रंथांना जर काही स्थान असेल तर तीही माहिती पुढे आणावीत. फक्त किस्से कथन एवढेच आपल्या लेखनाचे स्वरूप आहे ते कृपया बदलावेत. आणि जर तशी माहिती उपलब्धच नसेल, त्यावर संशोधन झालेच नसेल (जी गोष्ट पचवायला अवघड आहे - कारण जर नाडीग्रंथांना संशोधक जेन्युईन मानत असते तर असे झालेच नसते!) तर त्यातून काय सूचित होते ते तुम्हाला कळले असेलच!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Apr 2010 - 2:52 pm | समंजस
अरुंधतीतै, तुम्ही विचारात घेतलेले मुद्दे नक्कीच विचारणीय आणि उपयोगी आहेत. मात्र तुम्हाला अपेक्षित असलेलं संशोधन या विषयावर होणे मला तरी शक्य वाटत नाही. (सरकारी अनुदान मिळत असेल तर आम्ही भारतीय उत्सुक असतो कुठल्याही संशोधना मध्ये, पदरचे खर्च करून संशोधन करायला काय आम्ही युरोपीयन/अमेरीकन आहोत का ? :) कृ.ह.घे. )
खुप आधीपासून या विषयावर टाकण्यात आलेले धागे (दोन्ही बाजूंनी)
मी वाचत आलोय. प्रत्येक वेळेस मला वाटायचे की, कदाचीत आता तरी या विषयावर फक्त निष्फळ चर्चा न होता काही तरी संशोधन(तपासणी) होउन नेमकं सत्य काय ते कळेल आणि हा नाडीग्रंथावरचा वाद संपुष्टात येइल पण या धाग्यावरचे प्रतिसाद वाचता नाडीग्रंथाबद्दल काही निर्णायक स्वरुपाची माहिती मिळेल असे मला स्वतः ला तरी वाटत नाही :(
नेहमी प्रमाणे दोन्ही बाजूंचे योद्धा आपापल्या मुद्यांवर ठाम आहेत :)
(चला आता दोन्ही बाजूंचे धागे वाचूया. नाडीग्रंथावर विश्वास असलेल्यांचे अनुभव तसेच नाडीग्रंथावर विश्वास नसलेल्यांचे अनुभव दोन्हीही वाचूया कसलाही भेदभाव न ठेवता :) )
6 Apr 2010 - 2:03 am | शशिकांत ओक
१) मी नाडीग्रंथावर आधारित कथा वा विलक्षण अनुभव कथन करून लोकांचे मनोरंजन करत असेनही पण त्यामागील नाडी ग्रंथकर्त्या महर्षींच्या विलक्षण प्रज्ञेची जनसामान्यांना कल्पना व्हावी हा उद्देश आहे.
२) नाडी ग्रंथांतून मानवी कर्त्तृत्वाला स्थान नाही असा सोईचा निष्कर्ष काढून धोपटले जाते. तसा तो नाही. मात्र मानवी प्रयत्नांशिवाय काही अन्य घटकांची मदत लागते ती सुचवून कर्मसिद्धांतच सुकर केला जातो. असे सुक्ष्म विचार केला की लक्षात येते.
३) मी कोणाही नाडी केंद्राची किंवा वाचकांची तरफदारी करत नाही. जीव नाडी पट्ट्यातील मजकूर बदलतो असा ज्या नाडीवाचकांचा अनुभव आहे. त्यांना पण ते कसे घडते ते सांगता येत नाही असे ते म्हणतात.
आपण जी शक्यता { नाडी ग्रंथ संशोधनाच्या लायकीचे नाहीत असे मानून अद्याप संशोधन केले गेले नव्हते. पण आता मनोवृत्ती बदलते आहे. अनेक ठिकाणी लोकांनी यावर शोध कार्य केले आहे. मात्र त्याला हवी तशी मान्यता मिळवण्यास वेळ लागतो आहे.} सूचित करता ती सत्यता आहे.
आपण इतक्या कळकळीने यावर लिहिता असे वाटून आपल्या माहितीसाठी सांगता येईल की युनेस्कोच्या फंडींग मधून नॅशनल कमिशन ऑन मॅन्युस्क्रिप्ट्स हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री फॉर कल्चरतर्फे संपुर्ण देशभरात चालवला जातो.
त्यामधे देशभरातील व विशेषतः तामिळनाडूतील प्राचीन तमिळ भाषेतील ताडपट्ट्यांवर काम करायला पांडिचेरीतील एका प्राच्यसंस्थेला जबाबदार केले गेले आहे.
त्या केंद्राच्या मुख्य संग्राहकांना, 'आपणाकडे नाडी ग्रंथांच्या किती ताडपट्ट्या आहेत?' असे मी विचारले असता, 'एकही नाही' असे उत्तर आले.
त्यावर माझ्याकडील एका नाडी ग्रंथाची पट्टी त्यांच्या हातात देत मी विचारले, 'का नसावी?'
'वाचायला ती येणार नाही असे वाटून त्यांच्या कडे दुर्लक्ष केले गेले' असे गुळमुळीत उत्तर ऐकून माझ्या सोबतचा नाडी वाचक व भाषांतरकार भडकला.
'मी जर ती वाचू शकतो. तर आपणासारख्याला - ताडपट्ट्यातील लिखाण वाचण्यात प्रवीण असे आपले व्हिजिटिंग कार्ड सांगते- वाचता येणार नाही हे काय कारण आहे?'
'याठिकाणी इतक्या थप्प्यांनी लावलेल्या ताडपट्ट्यांच्या पॅकेट्सच्या सुतळ्या सोडवून कोणी त्यात काय लिहिलय याचे वाचन ही न करता त्यांना 'राष्ट्रीय संपत्ती' म्हणून फक्त सडून आणखी खराब होण्याआधी 'डिजिटलायझेशन' करून ठेवण्याची कामगिरी आम्हास दिली गेली आहे' ते म्हणाले.
नंतर मी त्यांना ताडपट्टयांच्या संरक्षणाच्या त्यांच्या कामासाठी सन्मान म्हणून शाल अर्पण केली. माझ्या इंग्रजी पुस्तकातील ताडपट्टीच्या फोटोचे वाचन करून त्यातील नाव वाचवून घेऊन त्यांना ते सप्रेम भेट दिले.
'आपल्या सारख्यांनी यात लक्ष घातले आहे तर आता मी ही घालेन' असे त्यांनी निदान तोंड देखले म्हटले. हे ही नसे थोडके!
आपण म्हणता त्या सर्व अभ्यासाच्या गोष्टी एकदम होणार नाहीत पण त्यांना चालना मिळायला काहीशी सुरवात झाली तरी खूप आहे.
सध्या यावर इतकेच लिहू इच्छितो.
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
7 Apr 2010 - 1:51 pm | अरुंधती
दुर्दैवाने तुम्ही जे संशोधनाविषयी म्हणत आहात की भारत इतिहास संशोधक, टिमवि विषयी... तिथे असलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर त्यांना ह्या संदर्भातील काहीही माहिती नाही हे निष्पन्न झाले आहे. आता भांडारकर प्राच्यविद्या मधील माझ्या एका परिचितांकडे चौकशी केली आहे. त्यांचा काय प्रतिसाद येतो हे बघायला हवे.
<<युनेस्कोच्या फंडींग मधून नॅशनल कमिशन ऑन मॅन्युस्क्रिप्ट्स हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री फॉर कल्चरतर्फे संपुर्ण देशभरात चालवला जातो.
त्यामधे देशभरातील व विशेषतः तामिळनाडूतील प्राचीन तमिळ भाषेतील ताडपट्ट्यांवर काम करायला पांडिचेरीतील एका प्राच्यसंस्थेला जबाबदार केले गेले आहे.
त्या केंद्राच्या मुख्य संग्राहकांना, 'आपणाकडे नाडी ग्रंथांच्या किती ताडपट्ट्या आहेत?' असे मी विचारले असता, 'एकही नाही' असे उत्तर आले.
त्यावर माझ्याकडील एका नाडी ग्रंथाची पट्टी त्यांच्या हातात देत मी विचारले, 'का नसावी?'
'वाचायला ती येणार नाही असे वाटून त्यांच्या कडे दुर्लक्ष केले गेले' असे गुळमुळीत उत्तर ऐकून माझ्या सोबतचा नाडी वाचक व भाषांतरकार भडकला.
'मी जर ती वाचू शकतो. तर आपणासारख्याला - ताडपट्ट्यातील लिखाण वाचण्यात प्रवीण असे आपले व्हिजिटिंग कार्ड सांगते- वाचता येणार नाही हे काय कारण आहे?'
'याठिकाणी इतक्या थप्प्यांनी लावलेल्या ताडपट्ट्यांच्या पॅकेट्सच्या सुतळ्या सोडवून कोणी त्यात काय लिहिलय याचे वाचन ही न करता त्यांना 'राष्ट्रीय संपत्ती' म्हणून फक्त सडून आणखी खराब होण्याआधी 'डिजिटलायझेशन' करून ठेवण्याची कामगिरी आम्हास दिली गेली आहे' ते म्हणाले.
नंतर मी त्यांना ताडपट्टयांच्या संरक्षणाच्या त्यांच्या कामासाठी सन्मान म्हणून शाल अर्पण केली. माझ्या इंग्रजी पुस्तकातील ताडपट्टीच्या फोटोचे वाचन करून त्यातील नाव वाचवून घेऊन त्यांना ते सप्रेम भेट दिले.>>
युनेस्को चे जर ह्या ताडपट्ट्यांचे जतन करण्यास फंडिंग असेल तर ही नोंद नाडीग्रंथांवर टीका करणार्यांनी जरूर लक्षात घ्यावी व नोंदवावी असे वाटते. कारण यथायोग्य छाननीशिवाय असे फंडिंग मिळणे सहजशक्य नसते. शिवाय यातून त्यांना तरी ह्या नाडीग्रंथांच्या ताडपट्ट्या प्राचीन आहेत / प्राचीन तमिळ भाषेतील आहेत असे वाटते हे प्रकाशात आले. ह्या माहितीबद्दल धन्यवाद! पांडिचेरी प्राच्यसंस्थेतील मुख्य संग्राहकांचे सुरुवातीचे बोल वाचून मात्र फार वाईट वाटले. हीच उदासीनता आपल्यापेक्षा पाश्चात्यांना ह्या कार्यात आपल्याही पुढे घेऊन जाते आणि नंतर मग आपल्यावर ''ही आमची संस्कृती, आमची, आमची'' करत त्यांनी केलेल्या संशोधनाला ''आपलेसे'' करण्याची वेळ येते!!!
त्यांनी एव्हाना जर काही ताडपट्ट्यांचे वाचन केले असेल तर ते वाचन तुम्हाला वाचकांसमोर आणता येईल का? कारण हे थर्ड पार्टी रीडिंग असेल. त्यात वाचनकर्त्याचा काहीही स्वार्थ गुंतलेला नाही. संशोधकाच्या भूमिकेतून केलेले रीडिंग वाचक अधिक खुलेपणाने स्वीकारू शकतो. त्यातूनही पुन्हा भाषाविलास, व्याकरण वगैरे मी अगोदर उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करता येईल.
नाडीकथन भविष्य कितपत खरे- कितपत खोटे ह्या वादापेक्षा मला ह्या नाडीग्रंथांतून काय काय माहिती पुढे येते, इतिहासाच्या कोणत्या अंगावर प्रकाश पडतो त्यात गम्य आहे.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Apr 2010 - 7:40 pm | जयंत कुलकर्णी
फारच विनोदी आहेत बुवा हे ओक ! डॉ. अब्राहम कोवूरांचे बक्षीस अजून शिल्लक आहे. ते मिळवून ओकांना मिपाला देणगी म्हणून देता आली तर दोन पैसे तरी मिळ्तील मिपाला. त्यांना नको असेल तर वाटून घ्या !
जयंत कुलकर्णी
7 Apr 2010 - 7:34 pm | विजुभाऊ
1.आम्हांस श्री. ओक ह्यांस खोटे ठरवायचे आहे.
2.आम्हांस सारे नाडिवाचकांस खोटे ठरवायचे आहे.
3.आम्हांस नाडिशास्त्रास खोटे ठरवायचे आहे.
हे सगळे एकच आहे.
ओक साहेब खोटे नसतीलही पण ते जे लिहितात ते सगळे एक नाडी शास्त्र आणि ताडपट्ट्या नामक मोठ्या खोट्यावर आधारीत आहे
7 Apr 2010 - 9:47 pm | जयंत कुलकर्णी
पहिले केले तर दुसरे व तिसरे होईल असे नाही
दुसरे केले तर पहिले आणि तिसरे होईल असे नाही
तिसरे केले तर सगळेच प्रश्नच मिटतात.
तेच करायला पाहिजे !
जयंत कुलकर्णी.
7 Apr 2010 - 10:11 pm | टारझन
आवरा !!
8 Apr 2010 - 12:02 am | ऋषिकेश
माझ्या मते चिकित्सकांचे काम केवळ शक्य तितकी तर्कशुद्ध चिकित्सा करणे हे असले तरी त्याहुन महत्त्वाचे म्हणजे वैधानिक इशारा देणे आहे.
जसे सिगरेटच्या पाकिटावर असलेला वैधानिक इशारा वाचूनही ज्यांना हवी ते सिगरेट पितातच तसे चिकित्सकांच्या मुद्यांचे महत्त्व आहे. ज्यांना नाड्या बघायच्या आहेत ते चिकित्सकांनी काहिहि सिद्ध केले तरी बघणारच आहे. म्हणून वैधानिक इशारा देऊ नये अथवा असा इशारा देणार्यांनी स्वतः सिगारेट पिऊन बघावी म्हणणे हास्यास्पद आहे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
2 May 2010 - 1:38 pm | इंटरनेटस्नेही
असेच म्हणतो.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
8 Apr 2010 - 1:50 am | खादाड_बोका
शेवटी कुत्र्याचे शेपुट.... वाकडे ते वाकडे
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
चांगल्या चांगल्यांची नाडी सोडणे हाच आमचा खानदानी धंदा.....
2 May 2010 - 2:07 pm | पिंगू
अहो नाडीग्रंथ आणि इतर बुवाबाजी ह्या गोष्टी एकाच सदरात मोडणार्या आहेत. शेवटी दोन्ही गोष्टींचा संबंध पैसे लाटण्याशी आहे. त्यामुळे असल्या विषयाबद्दल उगाच वायफळ चर्चा नकोच.
वरील मत हे माझे वैयक्तिक मत आहे.
- (पक्का बुवाविरोधी) पिंगू
2 May 2010 - 2:44 pm | सुधीर१३७
काय राव , उगा फुक्कट येळ घालवताय वितंड्वाद करत ..... हे न संपणारे गु-हाळ आता बंद करा................ कारण दोन्ही बाजू आपलेच खरे म्हणून स्वतःचे ..... बडवून घेत आहेत..................................................................................................................
बाकी चालू द्या.......... ;) ;) ;)