चिकित्सकांची नाडिपरीक्षा...!
चिकित्सकांची नाडिपरीक्षा...!
श्री. घाटपांडे सो|,
हॅहॅहॅ! नमस्कार, कसे काय आहात?! चिकित्साकार्याविषयीची आपली निष्ठा आणि आपली चिकाटी ही शिकण्यासारखी आहे, बरे! असो. चिकित्सा कशी असावी ह्या अनुषंगाने आपला - माझा ह्यापूर्वीही एक दीर्घसंवाद झालेला आहे. आपल्या उभयतांच्या त्या चर्चेमध्ये विचारात घेतल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपणांस चक्क विसर पडलेला दिसतो. तरी त्यांची एक उजळणी करावयाचा एक नम्र प्रयत्न म्हणून आणि आपल्या चिकित्साकार्याची - किंबहुना त्या कार्याच्या महतीची - येथील नव्या वाचकांस एक जुजुबी माहिती असावी म्हणून ते महत्त्वाचे मुद्दे येथे पुनः चर्चेत आणतो आहे.
हा लेख आपण डकविलेल्या "ओंकाराची नाडिपरीक्षा" ह्या लेखास सविस्तर उत्तर म्हणून देतो आहे असे आपण एंव्हांना ओळखले असेलच! एकच विनंती आहे. हा लेख व्यक्तिगत मानून घेवू नये. एकूणांतच नाडिपरीक्षा प्रश्नाचे स्वरूप सामाजिक आहे, त्यातही आपले चिकित्साकार्य हे जनहितार्थ असल्याचे आपण सांगता, त्यामुळे ह्या प्रश्नाकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोन हा सर्वांगाने विस्तीर्ण झाला आहे अशी माझी ठाम समजूत आहे. तरीदेखील हे लेखन 'व्यक्तिगत रोख असलेले' किंवा 'व्यक्तिगत पातळीवर गेलेले' अशी एखाद्याची समजूत होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्याकरिता म्हणून येथे दिलेले संदर्भ - उपसंदर्भ तपासावेत. कुठलेही व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप टाळण्याची काळजी घेऊनच हे लेखन केले आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
असो. आपणास आठवत असेल, ह्या विषयावरील दीर्घसंवादात विचारल्या गेलेल्या चिकित्से विषयक माझ्या एकाही प्रश्नांस आपण आजपावेतो उत्तरे देवू शकलेला नाहीत हे सर्वमान्य उघड सत्य आहे. (पटेल अशी - समर्पक उत्तरे देणे वेगळे!) खरे पाहतां, आपल्याला काय करावयाचे आहे हे आपले आपल्यालाच अजून उमगले नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. मी पूर्वीही आपणांस ह्याबाबतीत विचारले होते, आता थोडे स्पष्ट विचारतो. आपणांस आणि आपणांसारख्या इतरांस नेमके काय करावयाचे आहे? खालीलपैकी एक अथवा अधिक उत्तरे निवडावीत.
- आम्हांस श्री. ओक ह्यांस खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस सारे नाडिवाचकांस खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस नाडिशास्त्रास खोटे ठरवायचे आहे.
- आम्हांस फलज्योतिषचिकित्सक म्हणून समाजमान्यता मिळवायची आहे.
- आम्हांस लोकांचे मनोरंजन करीत वेळ घालवावयाचा आहे.
- नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
- लेखन केले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये असते;
- ते लेखन कोणत्या भाषेमध्ये असते;
- त्या भाषेस काही व्याकरण आहे काय;
- व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;
- लेखनाच्या वाक्यरचनेचा काळ - खरोखरीच भविष्यकथन केलेले असते काय;
- नाडिकेंद्रांमध्ये पट्टी शोधण्यासाठी आपल्या अंगठ्याचा छाप कां द्यावा लागतो?
- तो तसा दिल्यानंतरसुद्धा आपणांस काही प्रश्न कां विचारले जातात?
वाचने
6255
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
श्री.
In reply to श्री. by बिपिन कार्यकर्ते
चलाखीचा मुद्दा.
मला वाटते
In reply to मला वाटते by अरुंधती
आपण पुढाकार घेउन - पुर्वग्रह न ठेवता
नमस्कार
मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा वकिली प्रयत्न
In reply to मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा वकिली प्रयत्न by नितिन थत्ते
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by प्रकाश घाटपांडे
भरकटली!
In reply to मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा वकिली प्रयत्न by नितिन थत्ते
वकिली प्रयत्न.
हेच! मला
तेथे नाडी ग्रंथावरील शोध कार्य झालेले नाही.
संशयाचा किडा
मिपाकरांनी स्वतः नाडी केंद्रांना भेट द्यायची आवश्यकता आहे....
In reply to मिपाकरांनी स्वतः नाडी केंद्रांना भेट द्यायची आवश्यकता आहे.... by चित्रगुप्त
हे खरे
In reply to हे खरे by अरुंधती
नाडी
@ओकसाहेबः
In reply to @ओकसाहेबः by अरुंधती
अरुंधतीतै
संकल्प शक्ती वाढवण्यासाठी नाडीने काम करावे
In reply to संकल्प शक्ती वाढवण्यासाठी नाडीने काम करावे by शशिकांत ओक
दुर्दैवान
श्री. ओकांचे लेखन वाचून मजा आली
1.आम्हांस
In reply to 1.आम्हांस by विजुभाऊ
आहो नाही !
आवरा !!
वैधानिक इशारा
In reply to वैधानिक इशारा by ऋषिकेश
+१
कुत्र्याचे शेपुट....
थोडेसे अवांतर
काय राव ,