मला एक गाणे आठवते............नंदू भेंडेने गायले होते.. पूर्ण गाणे कोणाला माहीत असेल तर सांगा
खरे म्हणजे आपण एकटे सूखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला दिसतो
अक्कल गहाण पडते..भेजा कामातुन जातो
लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो
आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो
त्या चेहेर्याचे असली रूप मग आपल्याला कळते
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....
प्रतिक्रिया
21 Mar 2008 - 10:13 am | विसोबा खेचर
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....
हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे....
आपला,
(अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :)
21 Mar 2008 - 12:00 pm | विजुभाऊ
हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते
असो..........
कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच.
धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला
21 Mar 2008 - 7:27 pm | सुधीर कांदळकर
छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
21 Mar 2008 - 7:33 pm | मुक्तसुनीत
...यांचे हे गीत असावे असे मला अंधुक आठवते.