पाउस एक चिंब अंगण
पाउस म्हणजे भिजलेलं मन
पावसा संगे बेभान वारा
पाउस म्हणजे श्रावण धारा
पाउस म्हणजे काळे ढग
पावसात हरवलेल धुक्याचं जग
पावसातली एक गोड मिठी
पाउस म्हणजे भजी ओठी
पाउस म्हणजे गोड आठवण
पाउस म्हणजे मैत्रीची साठवण
पावसात द्यावी भेट सप्रेम
अहो पाउस ,तुमचा -आमचा अगदी सेम टू सेम
--के गा
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 12:09 am | प्राजु
छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
1 Apr 2010 - 6:18 am | बेसनलाडू
यमकाधिष्ठित बडबडगीतासारखी कविता - अर्थात याला उपहास समजू नये, मुख्यत्त्वे कवितेच्या रुपड्याविषयी मत व्यक्त करीत आहे. भावनांशी प्रामाणिक राहिली तरी बडबडगीताचा बाज असलेली किंवा एखाद्या नाटुकल्यातील काव्यात्मक संवाद वाटावीशी कविता आहे.
(बालक)बेसनलाडू
खमंग भजी आणि गोड मिठी यांचे समीकरण तसे जमत नाही; अर्थात मिठी मारणार्यांनी एकमेकांच्या मिठीत एकच भजे चवीचवीने एकत्र खाल्ले नसल्यास! ;-) मात्र तसे असल्यास खमंगपणा आणि गोडव्यात अधिक प्रिय काय याबद्दल डावेउजवे करणे कठीण आहे.
(खवय्या)बेसनलाडू
1 Apr 2010 - 7:29 am | sur_nair
शेवटची ओळीचा विचार करतोय तुमचा आमचा paus कसा same आहे ते http://www.misalpav.com/node/11115 बाकी बेसन लाडूंची मिठीत भजी खाण्याची idea जबरी.