धन्य ! धन्य ते मरण ! ! !
आयुष्याच्या वळणावर यम मला भेटला
म्हणाला,
" कधीचंच भेटायचं होतं तुला, जरा उशीरच झाला.”
.” चल आटप लवकर आता, वेळ नाही मला,
सख्खे, सोयरे, जमले सारे, आता उशीर कशाला ? "
मी म्हटलं,
"थांब थोडं
नको घाई
भेट तिची बाकी,
सरणावर वियोगाचे
दुखः नको बाकी."
प्रतीक्षेवीण भेटण्याची, नसे रीत तिची,
वेळेवर आली आज, मला साथ.नशिबाची.
जिच्यासाठी माझ्या नयनी, नित्य अश्रू वाहिले,
कलेवर आज , तिच्या आसवांनी न्हाइले.
वियोगाचे दुखः माझे, अन्ति आता शमले,
अन मरण तिच्या आसवांनी धन्य धन्य झाले
मरण तिच्या आसवांनी धन्य धन्य झाले ! ! !
निरंजन वाहलेकर