( बे ) शरम ! ! !
आमच्या वेळी गावांत कधीतरी लाल दिव्याची गाडी दिसायची,
आत आपलं माणूस बघून छाती भरून यायची.
.
आज गल्लोगल्ली गाड्यांवर तसलेच लाल दिवे चमकतात,
आतील धनदांडगे मात्र आपले कुणीच नसतात.
गाड्या उदंड झाल्या लालदिव्याच्या, जनतेचे हाल कमी नाहीत,
लालदिव्याची गाडी बघून आता काहीच वाटत नाही.
गाडीवरच्या लाल दिव्यांना अब्रूची चाङ नाही
म्हणूनच रेडलाईट एरियात आता लाल दिवा लागत नाही,
लाल दिवा लागत नाही.
निरंजन वाहालेकर