IPL प्रवेश परि़क्षा

नितिनकरमरकर's picture
नितिनकरमरकर in जनातलं, मनातलं
19 Mar 2010 - 7:10 pm

सध्या IPL चा जमाना आहे. हळूहळू हे प्रस्थ वाढतच जाणर, क्रिकेट येण्या बरोबरच नविन "रिक्रुटांचा" IQ तपासण्याची गरज भासू शकेल ती परिक्षा अशी असू शकेल.

१. इंग्लंड मधे कोणती भाषा बोलली जाते?
२. हडप्पा संस्क्रुती मधिल वास्तुशास्त्र, कला या वर चर ओळी निबंध लिहा.

किंवा
सचिन तेंडुलकर चे आडनाव सांगा.

३. पु. ल. देशपांडे खलिल पैकी कश्यासाठी प्रसिद्ध आहेत,
अ. वास्तुशास्त्र
ब. क्रिकेट
क. लेखन.

४. पोप कोणत्या धर्माशी संबधीत आहेत,
अ. हिंदू
ब. मुस्लिम
क. यहूदी

५. ०.० मीटर म्हणजे किती फूट?

६. तुम्हाला न्युटनचा पहिला सिद्धांत माहित आहे का?
अ. होय
ब. नाही.

७. एका ईमारतीचा चौथा मजला हा सर्वात वरचा मजला आहे तर ती ईमारत किती मजली असावी?

८.सर्वात कमी शटकांचा सामना कोणता?
अ. टी २०
ब. एक दिवसीय
क. कसोटी.

९. इंग्लिश : Bat, Ball किंवा Stumps या पैकी कोण्याएकाचे स्पेलिंग सांगा.

१०. स्लिप मधे उभे असतांना बॅट्समनला त्रास देण्यास तुमची संस्क्रुती अटकाव करते काय?

टीप : १ ते ९ पैकी किमान ४ प्रश्णांची बरोबर उत्तरे देणे गरजेचे आहे. १० वा प्रश्ण अनिवार्य आहे.

मौजमजा

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

19 Mar 2010 - 7:55 pm | राजेश घासकडवी

६. तुम्हाला न्युटनचा पहिला सिद्धांत माहित आहे का?
अ. होय
ब. नाही.

हे तर मस्तच!

बाकी तिसरा प्रश्न अंमळ कठीण वाटला...

गणपा's picture

20 Mar 2010 - 3:19 am | गणपा

IPL प्रवेश परि़क्षा ؟؟؟؟؟؟؟
प्रश्नांचा एकमेकांशी सुतराम संबंध नाहीये.. (विषयाशीतर लांबची गोष्ट)

प्रश्न क्रमांक ८, ९ , १०(؟) वगळता बाकिच्यांचा क्रिकेटशी संबंध काय ते तो प्रश्नकर्ताच जाणे.

बाकी पेपर अंमळ कठीण गेला.
-(नापास) गणु
(मेघवेड्या धन्यु :))

नितिन थत्ते's picture

19 Mar 2010 - 9:37 pm | नितिन थत्ते

>>प्रश्न क्रमांक ८, ९ , १०(؟) वगळता बाकिच्यांचा क्रिकेटशी संबंध काय ते तो प्रश्नकर्ताच जाणे

हॅ हॅ हॅ. आय पी एलचा तरी क्रिकेटशी काय संबंध आहे?

नितिन थत्ते

मेघवेडा's picture

19 Mar 2010 - 10:39 pm | मेघवेडा

हॅ हॅ हॅ. आय पी एलचा तरी क्रिकेटशी काय संबंध आहे?

काही अंशी सहमत! परंतु आज जगभर क्रेझ आहे हो आयपीएलची!! काही वर्षात ईपीएल ला टक्कर देऊ हे ललित मोदीचं भाकीत खरं ठरेल तेव्हा ठरेल पण सध्या आयपीएलचं फॅन फॉलोविंग जगभर वाढतंय हे मात्र नक्की!!

बाकी या धाग्याचं प्रयोजन कळलं नाही.. आणि हे टुकार प्रश्न वाचून अंमळ मौज वाटली!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मी-सौरभ's picture

20 Mar 2010 - 12:23 am | मी-सौरभ

त्यांच ईंड्क्शन पण करणार का ?

-----
सौरभ :)