आभारी वेदनांचा !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
19 Mar 2010 - 11:16 am

कंटक सारे आठवांचे श्वासात सखे रुतलेले
कांगावे अन स्वप्नांचे.., आकांक्षात गुंतलेले.......

काळ ओलांडूनी मागे दिवस जुने फिरलेले
बोभाटे ओल्या स्मृतींचे अश्रुंनी ते मिरवलेले ....

श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले
लगाम वेड्या मनाचे मम हातातून सुटलेले....

मी आभारी वेदनांचा मज तयांनी सावरलेले
तटबंदीचे कोट मनाच्या भोवती मी बांधलेले....

नको दिलासे चांदण्याचे उजेडात बरबटलेले
मळलेले बिंब प्रकाशाचे.., अंधार उजळू लागले.....

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

19 Mar 2010 - 11:17 am | विशाल कुलकर्णी

कृपया शिर्षक सुचवा, मला तर काहीच सुचत नाहीय.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु's picture

19 Mar 2010 - 7:13 pm | प्राजु

श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले
लगाम वेड्या मनाचे मज हातातून सुटलेले....

मस्त!!
अवघड आहे प्रश्न. कविता मात्र सुरेख.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

राघव's picture

21 Mar 2010 - 12:07 am | राघव

एक सूचना कराविशी वाटली -

श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले
लगाम वेड्या मनाचे मज हातातून सुटलेले....

यात मज नको, मम असायला हवे.
बाकी कविता चांगली. पु.ले.शु.

राघव

पक्या's picture

19 Mar 2010 - 9:55 pm | पक्या

कविता छान आहे.
नायकाच्या पदरी दु:ख , निराशा आली तरी तो आता सावरला आहे.
मनास झालेल्या वेदनांनीचच त्याला सावरले...वगैरे अशी एकंदरीत भावना कवितेत प्रकट झाली आहे.
म्हणून त्या कडव्याची सुरवातच शीर्षक म्हणून वापरा. - मी आभारी वेदनांचा .

जय महाराष्ट्र , जय मराठी !

नंदू's picture

19 Mar 2010 - 10:07 pm | नंदू

क्षण आठवांचे ?

निरन्जन वहालेकर's picture

20 Mar 2010 - 9:31 am | निरन्जन वहालेकर

सुरेख कविता ! ! !

मन वढाळ ! अंतरंग ! मनोवेध ! मन- हिंदोळे !
ईत्यादि

माझं वैयक्तिक मत.

मदनबाण's picture

20 Mar 2010 - 9:33 am | मदनबाण

मस्तच...

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

विशाल कुलकर्णी's picture

23 Mar 2010 - 11:47 am | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! राघव, चुक दुरुस्त केलीय , धन्यवाद :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"