समर्थ

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
17 Mar 2010 - 11:34 am

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

गझल

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

17 Mar 2010 - 12:35 pm | राजेश घासकडवी

काव्य झालेलं आहे. नादमय आणि अर्थवाही.
तुमच्या संहितेला तक्रार करायला जागा नाही.

काव्य हे समर्थ अर्थ गर्भ जाहले
संहितेस डोहळे मुळी न राहिले

राजेश

बेसनलाडू's picture

17 Mar 2010 - 12:48 pm | बेसनलाडू

आवडली. सशर्त भेट मस्त!
(बिनशर्त)बेसनलाडू

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 1:04 pm | शानबा५१२

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
--ती कोण? संहीता? पण संहीता म्हणजे काय?
आमच अज्ञान मोठ्या मनाने दुर करा.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 3:13 pm | विसोबा खेचर

क्लासच!

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Mar 2010 - 4:11 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच......

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

17 Mar 2010 - 8:46 pm | प्रभो

सुंदर

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 8:48 pm | मदनबाण

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

वा,अती सुंदर... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

प्राजु's picture

17 Mar 2010 - 9:10 pm | प्राजु

अफाट!!!

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

खासच!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अनिल हटेला's picture

17 Mar 2010 - 11:09 pm | अनिल हटेला

सुंदर नेहेमीप्रमाणेच !!

:)

बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

श्रावण मोडक's picture

17 Mar 2010 - 11:11 pm | श्रावण मोडक

आवडली!!!

चतुरंग's picture

17 Mar 2010 - 11:24 pm | चतुरंग

चतुरंग

राघव's picture

18 Mar 2010 - 12:38 am | राघव

लय भारी! नेहमीप्रमाणेच!!

राघव

टारझन's picture

18 Mar 2010 - 1:08 am | टारझन

व्वा !! अप्रतिम कविता !

-(समर्थ) टारदास

मला "काय त्या दयाघनास व्यर्थ मागते" या ओळीचा नीटसा संदर्भ लागला नाही. बाकी सर्व अप्रतिम.

प्रमोद देव's picture

25 Mar 2010 - 7:55 am | प्रमोद देव

ज्याच्याकडे देण्यासारखे काही असेल...त्याच्याकडे...इथे तो स्वत:च रिता कमंडलू घेऊन दारोदार भटकतोय...
आता आलं लक्षात?
क्रान्ति,नेहमीप्रमाणेच अतिशय सकस अशी रचना झालेय...अभिनंदन.

sur_nair's picture

25 Mar 2010 - 9:09 pm | sur_nair

कळलं. पण बाकीची सर्व कडवी 'third person ' मध्ये लिहिली आहेत आणि ह्या कडव्यात मात्र 'first person ' मध्ये प्रश्न आहे म्हणून थोडा गोंधळलो.

धनंजय's picture

25 Mar 2010 - 9:50 pm | धनंजय

समर्थ!

("अर्थ मागते" चे यमक दोनदा घेतल्यामुळे थोडेसे बोचते. फार नाही.)

sidhivinayak's picture

27 Mar 2010 - 1:40 pm | sidhivinayak

खुपच सुन्दर !!
नविन समर्थ खरेच हवेत !!
शेकदार

अन्वय's picture

29 Mar 2010 - 11:51 pm | अन्वय

छानच