पांढरा रस्सा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
17 Mar 2008 - 6:26 pm

काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात...
उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या.
तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू.
दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला.
मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.

पाकक्रिया

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 6:30 pm | धमाल मुलगा

स्वातीताई झि॑दाबाद.

आणखी कोण देणार बॉ ???

स्वाती राजेश's picture

17 Mar 2008 - 6:36 pm | स्वाती राजेश

मी अगोदरच दिली आहे. तुमच्या रेसिपीची मी वाट पाहात आहे.:)))))))))))
http://www.misalpav.com/node/553

धमाल मुलगा's picture

18 Mar 2008 - 10:50 am | धमाल मुलगा

स्वातीताई,
मी काय रेसिपी देणार कप्पाळ?
साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल.
म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील.
त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-)

आपला,
- स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा
ध मा ल.

विजुभाऊ's picture

17 Mar 2008 - 7:14 pm | विजुभाऊ

धन्यवाद स्वाती ताइ
तुमच्या साठी माझी एक रेसीपी
शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन

पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे.
तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा.
अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी.
समोसा तळून् घ्यावा.
मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात

प्राजु's picture

18 Mar 2008 - 6:33 am | प्राजु

मस्त आहे आयडिया.... विजुभाऊ..अशाच आणखी काही असतील तर येउद्यात..

- (सर्वव्यापी)प्राजु

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 11:14 am | मनस्वी

रेसिपी आवडली.

मनस्वी

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 4:44 pm | स्वाती राजेश

विजुभाऊ, चांगली आहे...
उरलेल्या भाज्यांचा चांगला खमंग पदार्थ आहे..
नक्की करेन...

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 2:43 am | विसोबा खेचर

पांढर्‍या रस्स्यापेक्षा तांबडा रस्सा अधिक आवडतो..

विजूभाऊचे सामोसेही छानच.. :)

तात्या.

चकली's picture

18 Mar 2008 - 7:02 am | चकली

आयडिया आवड्ली !

चकली
http://chakali.blogspot.com

शैलेश दामले's picture

4 Apr 2008 - 12:25 pm | शैलेश दामले

त्याचा कोणीच विचार केला नाही

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 12:30 pm | मनस्वी

अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.