पाठलाग
गुंतुनी इश्कांत तुझिया , वैफल्यता मी ल्यायली.
दर्द आठवणींचा उरी, झोप नित्त्याची लोपली !
मरण माझे याच देहि याच डोळा पाहिले,
पोहोचलो मरणद्वारी परि,यातनांनी ना त्यागले !
होतो पहुडलो शांत येथे, आज मी सरणावरी,
आलीस त्रास देण्या पुन्हा, काढीत माग इथवरी !
निरंजन वहालेकर