पहिला पाउस .. शीघ्र कविता'
रिमझिम धून ...आभाळ भरुनं (मूळ कवीची माफी मागून )
आला गार वारा सरताना फाल्गुन
अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर
पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर
थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो
क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो...
कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब
रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब
उना वारयासंगे मग पुन्हा प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश (मूळ कवीची माफी मागून )
-के गा
प्रतिक्रिया
11 Mar 2010 - 2:44 pm | सविता
छान झालय!!
12 Mar 2010 - 10:55 am | नाद्खुळा
आवडली कविता ?
धन्यवाद सविता :)
-के गा
12 Mar 2010 - 12:49 pm | राजेश घासकडवी
-क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो...
बंद वरचा श्लेष छान वाटतो.
-रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब
एकाकी, निर्मनुष्य पण पावसाने भिजणारं तरी न डगमगणारं असं काही डोळ्यासमोर येतं.
एक प्रश्न - शीघ्रकविता म्हटलंय म्हणून - कडव्यांचा क्रम चुकला का? मधल्या तीन कडव्यांसाठी
कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब
रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब
अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर
पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर
थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो
क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो...
हा क्रम जास्त सुसंगत वाटला.
राजेश
12 Mar 2010 - 12:56 pm | नाद्खुळा
राजेश सर,
तुम्हि म्हणालात तसा क्रम खरच जास्त सुसंगत वाटला. :)
13 Mar 2010 - 7:10 am | विसोबा खेचर
अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर
पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर
सुंदर! :)