गाभा:
विचारवंत म्हणजे नक्की कोण?
मागे एकदा "तेंडुलकरांना" असा प्रश्न कोणितरी विचारल्याचे स्मरणात आहे.
त्यावर त्यांचे उत्तर काय होते हे आता आठवत नाही.(कोणी ह्याबाबत त्यांच्या उत्तराचा दुवा दिला तर बरे होईल)
परंतु आजकालचा एकंदर कल पाहता
"विचारवंत" असण्यासाठी (तथाकथित) धर्मनिरपेक्षवादी (त्यातही अल्पसंख्यांक समाजाची बाजु घेणारे) वा अल्पसंख्यांक समाजाचे असणे आवश्यक आहे का?
उदा.तिस्ता सेटलवाड,जावेद अख्तर, मेधा पाटकर, वगैरे वगैरे....
मुत्सद्दि.
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 9:19 pm | प्रशु
सगळ्या गोष्टींसाठी ठाकरेंना जबाबदार धरुन मळमळ ओकणारे म्हणजे विचारवंत....
9 Mar 2010 - 9:22 pm | शुचि
पुष्पा भावे आणि वागळे अर्थात!
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”
9 Mar 2010 - 10:32 pm | शुचि
कलावंत म्हणजे जर कला अंगी असणार तर विचारवंत म्हणजे स्वतःचे विचार असणारा होऊ शकेल का?
अशी व्यक्ती माझ्या मते तरी चिकीत्सक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली, अभ्यासू, प्रश्न विचारणारी, व्यासंगी अर्थात आणि मनस्वी अशी असेल.
अशा व्यक्तीच्या "वैचारीक संपर्कात" येण्याने आपण विचार करण्यास नक्कीच उद्युक्त होत असू. आपल्या विचारांवर या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव पडत असेल. आपली मतं जरी तबडतोब बदलत नसतील तरी कुठेतरी चॅलेंज होत असतील आणि बदलाची प्रक्रिया तर सुरु नक्कीच सुरु होत असेल.
मग असे लोक - आपले मित्र, आई-वडील, लेखक , राजकारणी ते फिलॉसॉफर कोणीही असू शकतील. दे माइट इव्हन बी एन्टीटीज लाइक बुक्स. ओह येस व्हेरी मच.
मी या सर्व व्यक्तींना/ एन्टीटीज ना विचारवंत म्हणेन.
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”
10 Mar 2010 - 9:43 am | राजेश घासकडवी
>>दे माइट इव्हन बी एन्टीटीज लाइक बुक्स. ओह येस व्हेरी मच.
किंवा संस्थळ्स लाईक मिपा. (हलक्यानेच घ्या)
पण शुचि यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे, अभ्यासू व व्यासंगी असणे हे मुद्दे निश्चितच पटले. इतरांच्या मतावर आपल्या विचारांचा प्रभाव पाडणे हेसुद्धा महत्त्वाचं अंग आहे. खरा तालेवार विचार आपल्या अनुकूल व प्रतिकूल दोन्ही परिस्थितींत टिकतो. पापिलवार होऊन टिकणं सोपं असतं.
उत्तम विचार करणे, मांडणे, व इतरांना तो योग्य पद्धतीने स्वीकारायला उद्युक्त करणे यात संतुलित प्रश्न मांडणं येतं. माझ्या मते ज्या प्रश्नातच अभिप्रेत उत्तर दडलेलं आहे असा प्रश्न मांडणं हे विचारवंताचं लक्षण नाही.
राजेश
10 Mar 2010 - 9:54 am | शुचि
ते पुस्तकं उगच घुसडलय. सजीव प्राणीच हवं होत. :(
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
10 Mar 2010 - 12:00 am | धनंजय
माझ्या माहितीत "विचारवंत-इन-पॉलिटिक्स", "विचारवंत-इन-आर्ट्स" अशा पदव्या देण्याचा अधिकार असलेले पदवीपीठ नाही.
उदाहरणार्थ, वर श्री. मुत्सद्दि यांनी फक्त प्रश्न विचारला आहे. ते स्वतःचे मत ठामपणे देतील, तेव्हा ते "विचार सांगतील". मग त्यांनी की अन्य कोणीही त्यांना या बाबतीत विचारवंत म्हटल्यास (पूर्वीच्या अर्थाने) चालेल, असे वाटते.
.
"आम्ही फक्त कृती करतो, विचार-बिचार करत नाही" म्हणणारे लोकही कुठलातरी विचार आडून सांगतात. पण "आम्ही विचार करतो" हे सांगण्यात कदाचित लाज वाटत असावी. कारण मग स्वतःला नावडणार्या लोकांच्या रांगेमध्ये बसावे लागेल. (वरील लेखातील उदाहरणादाखल नावांची यादी आहे.)
ज्या लोकांचे विचार श्री. मुत्सद्दि यांना पटतात (कदाचित तथाकथित-नसलेले धर्मसापेक्षवादी, त्यातल्या त्यात बहुसंख्यांची बाजू घेणारे) त्या लोकांना श्री. मुत्सद्दि काय म्हणतात?
श्री. मुत्सद्दि यांना कोणालातरी "विचारवंत" म्हणायचे आहे, आणि कोणी त्यांची मुस्कटदाबी केली, तर तो गुन्हा आहे. मात्र अशी मुस्कटदाबी कोणी करत असेल, असे वाटत नाही. (मुस्कटदाबी म्हणजे "कोणी त्यांना हसले" असे नव्हे. वेडे लोकही फिदीफिदी हसतात. ती मुस्कटदाबी नव्हे. कोणी त्यांचे तोंड बळजबरीने बंद केले, त्यांना मारहाण केली, किंवा त्यांना रुपया-पैशांचा दंड केला, तरच ती मुस्कटदाबी.)
श्री. मुत्सद्दि यांनी त्यांच्या आवडत्या लोकांना "विचारवंत" म्हणण्याचे कार्य जरूर सुरू करावे. त्यांना मुक्तपणे तोंड उघडण्यात यश येईल असे मला मनोमन वाटते. कोणी मारहाण करणार नाही. कोणी दंड भरायला लावणार नाही. कोणी त्यांना मारहाण केली, दंड केला, तर गुन्हेगाराविरुद्ध खटला चालवायचे साहाय्य मी जरूर करीन.
त्याच प्रमाणे कुणीतरी यादीतल्या लोकांना "विचारवंत" म्हणत असेल त्यांचे हसे करायचे श्री. मुत्सद्दि यांना स्वातंत्र्य आहे. तेही त्यांनी वापरावे.
श्री. मुत्सद्दि हेसुद्धा "आजकालचा कल"चे घटक आहेत. त्यांनी सुरुवात केली तर "आज-उद्याचा कल" त्यांच्या आवडीचा होऊ शकतो.
12 Mar 2010 - 12:07 am | मुत्सद्दि
"विचारवंत" = "मला न आवडणारे लोक"
हि श्री.धनंजय ह्यांनी केलेली व्याख्या हि निश्चितच रोचक आहे.
मला वाटते कि प्रश्न हा फक्त विचारवंत म्हणजे नक्की कोण? असा आहे. अर्थात त्यात काहिशी संदिग्धता राहून गेली आहे.
विचारवंत म्हणजे कोण हे मुळात ठरवायचे कोणी?अन ह्याची व्याख्या ठरवायची ती देखील कशी? असा काहिसा हा प्रश्न आहे.
माध्यमे ह्या प्रक्रियेत निश्चितच हातभार लावु शकतात.परंतु उदाहरणादाखल माध्यमांच्या मार्फत (इथे माध्यमे म्हणजे दुरदर्शनवरील (टि.व्ही.)वृत्तवाहिन्या) उल्लेख केल्याप्रमाणे काहि "विशिष्ठ" लोकांना विचारवंत वा बुद्धीजीवी ह्या स्वरूपात प्रोजेक्ट केले जातेय.वर उल्लेख केलेल्या मंडळीं व्यतिरिक्त आजकाल बरेचसे पत्रकारदेखील ह्या भुमिकेत दिसु लागले आहेत.
त्या अनुषंगाने काहि (गमतीदार?) प्रश्न निर्माण होताना दिसतात.
आता सर्व पत्रकार हे विचारवंत असतात/असावेत का? :)
हा गमतीचा भाग सोडला तर हा प्रश्न थोडासा जटिल वाटला.
वास्तविक हा प्रश्न मी मला स्वतःला विचारून पाहिला होता.
परंतु एक त्याची निश्चित अशी व्याख्या मला तरी करता आलेलि नाहि.
इतर मंडळींच्या प्रतिक्रियाही रोचकच.
मुत्सद्दि.
12 Mar 2010 - 11:18 am | नील_गंधार
आता सर्व पत्रकार हे विचारवंत असतात/असावेत का?
गंमतीदार प्रश्न.
नील.
10 Mar 2010 - 8:45 am | प्रकाश घाटपांडे
जो ईचार करतो तो ईचारवंत.मंग तो ईचार कंचा का आसना! म्हजी तुमी आमी सम्दे ईचारवंत!!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
10 Mar 2010 - 9:45 am | विकास
प्रकाशरावांच्या व्याखेप्रमाणे मी देखील विचारवंत होऊ शकत असल्याने त्यांच्याशी पूर्ण सहमत! ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
10 Mar 2010 - 9:53 am | Dipankar
जो कृती पेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो (अर्थात आम्हि)
10 Mar 2010 - 11:25 am | चिंतातुर जंतू
'थ्री मस्केटिअर्स'चा लेखक अलेक्झांडर द्युमाच्या मते जेवणातले मांस, भाज्या, ब्रेड वगैरे भाग भौतिक आहेत, तर वाईन हा जेवणातला वैचारिक भाग आहे. यावरून विचारवंत म्हणजे काय, ते आमच्या सूज्ञ वाचकांस सहज ओळखता यावे.
आणखी काही व्याख्या:
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
11 Mar 2010 - 9:45 am | उल्हास
जावेद अख्तर, महेश मट्ट , शबाना, हेमंत देसाई, प्रकाश बाळ, कुमार केकटकर, तिस्ता , अॅडगुरु शेठ, वा(ब)गले तसेच मटातील भटेवरा,आसबे (थोड्क्यात जगातील सर्व घटनान्चे आपणासच ज्ञान आहे व सर्व समस्यांचे उत्तर आपल्याशिवाय कोणलाही येत नाहि असे समजणारे )
खरे म्हणजे वरील लोकांचे विचार ऐकले/ वाचले तर ही सर्व माणसे पाकीट घेऊन आपापल्या पित्त्त्यांचे विचार मांड्त असतात हे लगेच लक्षात येते ( सगळ्या वाहीनीवर हीच लोक विचारवंत म्हणून वावरताना दिसतात)
यांचा बड्बड्ण्याणे समाज , देश याचे काही भले होते असे वाट्त नाही
वा हे कुठलीही समस्येवर तोडगाही देत नाहीत
आपापल्या पित्त्त्यांचे विचार मांडणे हेच यांचे काम
उ. भटेवरा ,केकटकर - सोनिया
आसबे - पवार
जावेद अख्तर, महेश मट्ट , शबाना, हेमंत देसाई, प्रकाश बाळ, कुमार वगैरे - शिवसेना, मनसे, भाजपा विरोध (सर्व समस्यांना हे पक्ष जबाबदार ही भुमिका असते)
12 Mar 2010 - 8:47 am | मुक्तसुनीत
ज्या लोकांबद्दल अनेक विधाने वर केली गेली आहेत त्यांच्याबद्दल निदान एखादा संदर्भ देता आला तर फारच आवडेल.
12 Mar 2010 - 3:42 am | शाहरुख
हा धागालेखक आणि प्रतिसादक (मी सोडून ;-)) हे विचारवंत आहेत :-D
शोधा सार्धम्य :-)
12 Mar 2010 - 8:39 am | अक्षय पुर्णपात्रे
ज्याचे कुंपण नित्य विस्तीर्ण होत असते त्यास विचारवंत म्हणावे.
12 Mar 2010 - 8:50 am | मुक्तसुनीत
उत्तम वाक्य ! एकदम आवडले.
थोडी गंमत : या न्यायाने अशा लोकांना "शिपाई" सुद्धा म्हणायला हवे ! ओळखा पाहू का ते ?
12 Mar 2010 - 8:56 am | अक्षय पुर्णपात्रे
ज्याच्या आत कल्याणाची वृद्धी होण्याचा प्रयत्न केला जातो त्यास कुंपण म्हणावे. ज्या शिपायाचे कुंपण तसे आहे तोही विचारवंत आहे.
कल्याण म्हणजे काय?
12 Mar 2010 - 8:58 am | मुक्तसुनीत
कल्याणाचा संदर्भ लागला नाही. पण माझ्या गमतीच्या प्रश्नाचे उत्तर एका प्रसिद्ध कवितेत दडले आहे :
नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे।
ब्राह्मण नाही हिंदुही नाही न मी एक पंथाचा
तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा
खादाड असे माझी भूक
चतकोराने मला न सूख
कूपातिल मी नच मंडूक
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे।
12 Mar 2010 - 9:13 am | अक्षय पुर्णपात्रे
शिपाई म्हणता क्षणी ही कविता का आठवली नाही याचे आश्चर्य वाटले. हा शिपाई (माझ्या मनात आलेला शिपाई अगदीच पादचारी होता.) तर विचारवंतच.
कल्याण वेल्फेअर या अर्थाने. जोसेफ कॉन्रॅडच्या 'हार्ट ऑफ डार्कनेस'वर आधारीत 'अॅपोकॅलिप्स नाउ' हा माझ्या सर्वात आवडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यात मार्लन ब्रँडो भिती या भावनेस मानवाच्या कल्याणाचे सूत्र समजतो. तोही विचारवंतच.
12 Mar 2010 - 1:33 pm | बिपिन कार्यकर्ते
सर्वच प्रतिसाद उत्तम. हा संवादही आवडला.
बिपिन कार्यकर्ते
12 Mar 2010 - 9:00 am | आनंद घारे
सध्या तरी 'विचारवंत' ही मिसळपाववरील एक शिवी आहे किंवा त्यापेक्षाही वाईट असे विशेषण असावे असे वाटते. इथे 'च्यायला', 'मायला' '..च्चा' म्हणून पुढे कधी कधी कौतुकाने लिहितात, पण या 'विचारवंतां'बद्दल कोणी बरे लिहिलेले वाचल्याचे आठवत नाही.
कृपया या विधानावर फार विचार करू नये (मीही ते विचारपूर्वक केलेले नाही) आणि जुन्या चर्चांचे धागे दाखवू नयेत. तसे केलेत तर तुमची गणना विचारवंतांमध्ये होईल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
12 Mar 2010 - 11:50 am | चिंतातुर जंतू
विचारवंतांवर दुगाण्या झाडणे ही काही नवीन गोष्ट नाही. हा दुवा वाचल्यास आपल्यामागे किती पुरातन, भक्कम आणि समृध्द परंपरा आहे याचे भान या संस्थळावरील अनेकांस यावे, व त्यांच्या हृदयी तदनुरूप स्वाभिमान जागा व्हावा. या बाबतीतील भारताचा इतिहास समाजासमोर मांडावा, हीच आमची अशा सर्वांस कळकळीची विनंती.
वि.सू. एकंदरीत ठो ठो बोंबलतात, ते विचारवंत नव्हेत, असा आमचा निष्कर्ष आहे. त्यामुळे तीस्ता सीतलवड, जावेद अख्तर, मेधा पाटकर, निखिल वागळे प्रभृतींना आम्ही विचारवंत मानीत नाही; तसेच बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे वा नितीन राऊत यांनाही आम्ही विचारवंत मानीत नाही.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
13 Mar 2010 - 9:18 am | आनंद घारे
नको नको म्हणत असतांनाही दुवा टाकलातच! पण या भक्कम आणि समृध्द परंपरेत भारतीयांचा साधा उल्लेख नाही. शेम शेम टू विकी!!! राडावीरांनो, या अन्यायाच्या विरुध्द आवाज उठवायलाच पायजेल हाय !
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
13 Mar 2010 - 10:20 am | अप्पा जोगळेकर
एक विचार एका माणसाच्या डोक्यात असतो तेंव्हा तो विचार दुबळा असतो. पण लाख माणसे एकच विचार करु लागतात तेंव्हा ती मोठी शक्ती बनते आणि परिवर्तनाची लाट निर्माण होते. म्हणूनच लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी यांच्यासारखे 'कृतिशील विचारवंत' आदरणीय ठरतात. नरहर कुरुंदकर लिहितात् ,'' चरखा फिरवून स्वराज्य मिळत नसते. एका माणसच्या सांगण्यावरुन हजारो माणसे एकाचवेळी चरखा फिरवू लागतात. स्वराज्य त्यामुळे मिळत असते." या न्यायाने राज ठाकरे किंवा बाळ ठाकरे हेदेखील 'कृतिशील विचारवंत' आहेत. अर्थातच ते आदरणीय नाहीत हेही तितकेच खरे.
14 Mar 2010 - 9:37 am | शेखर काळे
विचारवंत. आपल्याकडे नको असलेल्याच गोष्टी फेकतो ना आपण ?
17 May 2024 - 7:21 pm | अहिरावण
सध्या कोण कोण विचारवंत आहेत?