तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही,
पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही.
तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही,
खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही.
तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट,
आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ.
तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही,
अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही.
तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा,
वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता.
तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही,
शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही.
- तुका म्हणे
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 7:09 pm | शुचि
तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा,
वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता.
....... मस्त
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole