***********************************************************************************
ती आजकाल माझ्याशी बोलतच नाही.
कधी कधी माझ्याबद्दल मात्र बोलते...
काल विचारलंच तिला...
माझी कविता वाचलीस?
...................
..........................
तर.....
तिच्या कपाळावर या एवढ्या आठ्या.....
कपाळावर आलेली बट तिने मागे सारली...
जवळ जवळ ओरडलीच.....
"आजकाल कसली कसली न्युड पोर्ट्रेट्स काढतोस रे?"
मानवाच्या फसकलेल्या नितीमत्तेची...
टरकलेल्या चारित्र्याची.... आणि सदैव कोड्यात पाडणार्या कडवट सत्याची?
असं नको रे करू राजा....
पोपट मेला आहे म्हणुन सांगायचे दिवस गेले आता....!
***********************************************************************************
विशाल.
प्रतिक्रिया
8 Mar 2010 - 4:39 pm | विसोबा खेचर
म्हणजे काय?
तात्या.
8 Mar 2010 - 4:48 pm | विशाल कुलकर्णी
स्पष्टवक्तेपणाचे दिवस राहीले नाहीत...किंबहुना लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिलेले आवडत नाही.... हा अर्थ ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
8 Mar 2010 - 4:45 pm | मेघवेडा
अगम्य! जल्ला काय पन कल्ला नाय!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
8 Mar 2010 - 4:52 pm | शानबा५१२
जर समजली अस्ती तर पोपट मेला अस्ता.... =))
8 Mar 2010 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते
छान... शेवटच्या वाक्याचा संदर्भ कळला लगेच.
बिपिन कार्यकर्ते
8 Mar 2010 - 6:02 pm | अविनाशकुलकर्णी
पोपटावरुन एक विनोद आठवला..
पोपटीण बाळंत होणार म्हणुन पोपट तिला दवाखान्यात नेतो...लेबर रुम मधुन डॉक्टर बाहेर येतात पोपट विचारतो उत्सुकतेने काय झाले? डॉक्टर ,म्हणतात.." काय होणार? पोपट झाला"
9 Mar 2010 - 12:59 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
9 Mar 2010 - 1:22 am | मिसळभोक्ता
कलादालनात घालायचा विषय कवितेत घातल्याचे पाहून अंमळ निराशा झाली.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
9 Mar 2010 - 4:38 am | शुचि
बर्याच वेळानी मिभो काय म्हणतायत ते ध्यानात आलं. आणि मग ..... ह. ह. पु. वा. : )
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
9 Mar 2010 - 6:03 pm | विशाल कुलकर्णी
वेगवेगळ्या चित्र (?)- विचित्र प्रतिसादाबद्दल धन्यवाद ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Mar 2010 - 9:54 pm | सागरलहरी
बिरबलाची गोष्ट आठवा म्हणजे संदर्भ कळेल
13 Mar 2010 - 10:14 pm | डावखुरा
मी याबद्द्ल न बोलणेच प्रशस्त समजतो....... 8| ."राजे!"
13 Mar 2010 - 10:59 pm | आनंद
चांगली कविता.