ओम नमो गजानना | आणि समर्था तुम्ही सुद्धा ||
ऐकुनी घ्या भगवंता | या पाप्या चे बोल ||
करू कशी सुरवात | नं कळे मला मनात ||
ना शिरता अति खोलात | करितो दहा श्लोकी शेवट ||
ऐकिला का ऐसा देश | सर्व धर्मांचा चालतो पाश ||
अभिमानाचा नाही लवलेश | लाज वाटते सांगाया || (समर्थांना हे सांगण्यास मला लाज वाटते.. या अर्थाने )
ऐकिला का ऐसा नेता | सेवा करी जनाची येत जाता ||
लोकविचार करितो केंव्हा || येता वेळ निवडणुकीची |
ऐकिली का ऐसी सत्ता | मिळतो पक्ष बदलण्याचा भत्ता ||
आज समता उद्या ममता | परवाचे काय सांगावे ||
ऐकिला का ऐसा रोग | कारण जायचे भोग ||
फसले ज्यात नाना लोग | सांगा तो कोणता ||
करी मत्सर दुसर्याचा | जप इकडे रामाचा||
पुण्याचा साठ फुकाचा | पाप तिकडे वाहिले ||
मूर्ख लक्षणे अजुनी जना | हि तर होती प्रस्तावना||
सुचतील जैसी माझिया मना| रोज सांगेन तुम्हासी ||
घेऊ नका देवा आता अवतार | घेतला तर होईल अविचार ||
जसा जाहला सावरकर | आणि सुभाष चंद्राचा || (ज्यांचे कार्य लोकांना कळलेच नाही असे हे थोर नेते म्हणून आता अवतार घेऊ नका असे देवा चरणी सांगणे )
सर्व मुर्खालाक्षाने या केदारासी | असुनी हे संगे तुम्हासी||
पहा काय गती कलियुगाची | समावितो हे चर्र्हाट ||
( हे श्लोक्र रुपी काव्य १६ वर्ष जुने आहे .. ६वीत असतानाचे ) चू भू दे घे :)