श्वास

नाद्खुळा's picture
नाद्खुळा in जे न देखे रवी...
4 Mar 2010 - 4:29 pm

कधी मी उरतो ,कधी मी पुरतो
एकमेव मी कधी न भुलतो
साथ माझी रे जन्मापासुनी
मी संपता जीव ना उरतो

कधी उश्वास नधी निश्वास
नावं माझी अनेक
हृदयाशी मैत्री माझी
फक्त श्वास म्हणूनच नेक

कधी शरीर, कधी काया
जेथे मी तेथे माया
क्षणार्धात मी सोडूनी जाता
नाती गोती सर्वही वाया

काळ मी आज मी
सुरवात मी शेवट मी
अनादी मी अनंत मी
दिव्यासारखा तेवत मी
दिव्यासारखा तेवत मी

कविता