' जाळीदार पान '

साईली's picture
साईली in जनातलं, मनातलं
3 Mar 2010 - 4:54 pm

हळुवार ज्योत पेटावी तश्या आठवणी हळुवार उजळू लागतात. आणि या उजळणाय्रा आठवणीत लाकडाचे शांतपणे पहुडलेले
बाक उभे राहतात. सगळे कसे शिस्तंबद्ध लयीत मांडलेले असतात. आणि अचानक ते भरून जातात चिवचिवाट करणाय्रा
पिल्लांनी. मग गोंगाटावर नियंत्रण करायला एक पट्टी वर्गात येते. साहजीकच ही पट्टी एकटी नसते. सर कींवा बाईरुपी
माणसाच्या हातात ही पट्टी असते.

या शिस्तीचा तेव्हा राग येत असे. पण शिस्तीला जिवनात फार महत्त्व आहे हे फार उशीरा ध्यानात येत. पद्धत चुकिची असेल कदाचित पण हेतू मात्र एकच शिस्तिचा. जन गण मन आणि भारत माझा देश आहे हे आपल्याशी तेव्हाच जुळले जातात.
आत्ता मॉल मध्ये जन गन मन एकताना आपल्याला त्याचा अर्थ माहित असतो. पन तेव्हा नुसतीच पोपटपंची.

शाळा संपल्याची किणकिण घंटा आणि एकच हेदोस. हा सुटकेचा आनंद, बालपणीचा अनुभव. त्यातली लय हातात मिळत नाही,
आणि शब्दात पकडता येत नाही. ती भावनाच काही और असते. ती मुठीत पकडून ठेवता आली असती तर आजही ऑफिस
सुटल्या वर मी ती भावना अनुभवली असती.

ती एक घाबरवणारी परिस्थिती परत परत येत राहाते. तिचं नाव आहे परिक्षा. या मजेच्या काळात ती एक पारंब्या असलेल्या वडाच्या गत घाबरवत उभी असते. परिक्षा संपेपर्यंत होणारी हुरहुर आणि परिक्षा संपल्यावर पुन्हा एक आगळा अनुभव मोठ्ठ्या सुट्टिच्या आधी वाटणारा. त्या सुट्टीच आणि आंब्याच्या चविचं मिश्रण म्हणजे दुधात साखर घातल्याचा आनंद. कदाचीत हा दुध साखरेचा आनंदही फिका पडावा असा तो आनंद.

शाळेचा रहाटगाडा असा दहावी पर्यंत चालू राहतो. मग वेगळे तरुण जीव जन्म घेतात. त्यांना व्हॉल्यूस येतात, आवडी निवडी येतात. आणि नकळत कधितरी फुटलेले पंख पसरून ते दुर उडून जातात.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

गणपा's picture

3 Mar 2010 - 5:12 pm | गणपा

मुक्तक आवडल.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2010 - 6:55 pm | विसोबा खेचर

मुक्तक आवडल.

हेच म्हणतो..

अजूनही लिहा..

तात्या.

मेघवेडा's picture

3 Mar 2010 - 5:15 pm | मेघवेडा

छान लिहिलंय! आवडलं मनापासून!

--मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि's picture

3 Mar 2010 - 6:10 pm | शुचि

छान आहे
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चिर्कुट's picture

3 Mar 2010 - 6:33 pm | चिर्कुट

>>शिस्तीला जिवनात फार महत्त्व आहे

असहमत. :B

'कंपनी पॉलिसी'च्या नावाखाली जे अन्याय आमच्यासारख्या गरीब एम्प्लॉयींवर होतात, त्याला या शिस्तीचंच गोंडस नाव दिलं जातं... X(

--(बेशिस्त) चिर्कुट

अश्विनीका's picture

3 Mar 2010 - 11:28 pm | अश्विनीका

छान लिहीलंय. शीर्षक पण आवडलं.

- अश्विनी

टारझन's picture

4 Mar 2010 - 12:03 am | टारझन

किती सहज .. किती सुंदर उतरल्यात भावना !!
खल्लास !!

आम्ही लहानपणी आमची नवी सायकल रात्री लाईट लाऊन तासंतास न्याहाळायचो ! आता कश्शाचं काही वाटत नाही :(

राजेश घासकडवी's picture

4 Mar 2010 - 1:01 am | राजेश घासकडवी

या संदर्भात लेखन वाचताना गंमत वाटली.

एका धड्यात वाचलं होतं. बाहेर पडणाऱ्या बर्फातून, थंडीतून कुडकु़डत एक माणूस घरी येतो आणि म्हणतो 'वा, इतकी थंडी आहे म्हणून उबेत परत येण्याची मजा कळते.'

सुटकेचा आनंद उपभोगायला मिळणं, हा शिस्तीचा फायदा आहे असं म्हणायचं आहे का? आणि प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण तो गमवतो का?

शुचि's picture

4 Mar 2010 - 6:43 pm | शुचि

सुरेख कलाटणी
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

फ्रॅक्चर बंड्या's picture

4 Mar 2010 - 9:55 am | फ्रॅक्चर बंड्या

छान लिहिलंय

binarybandya™

जोश्या's picture

4 Mar 2010 - 3:35 pm | जोश्या

अतिशय सुरेख जुन्या अथावनि जाग्या झाल्या

साईली's picture

4 Mar 2010 - 6:29 pm | साईली

धन्यवाद
छान वाटले प्रतिक्रिया वाचुन

पक्या's picture

5 Mar 2010 - 12:48 am | पक्या

सुरेख लेख. शाळेच्या जुन्या आठवणी जागवल्या गेल्या.

शाळेची किणकिण घंटा हा शब्दप्रयोग पटला नाही. आमच्या शाळेची घंटा वाजू लागली की अगदी दूरवर पण 'ठणठण' अशीच ऐ़कू यायची.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

हर्षद आनंदी's picture

5 Mar 2010 - 9:09 am | हर्षद आनंदी

एकदम सहज आणि सुंदर..

अवांतर :- शिर्षक वाचुन मला "जाळीदार बनियन" जोक आठवला.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

नाद्खुळा's picture

5 Mar 2010 - 3:26 pm | नाद्खुळा

अप्रतिम... खुपच चान खुप खुप खुप आवडलं