कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.........
साधी सोज्वळ निरागस होती
पण जगाचे भान मित्रत्वाची सान
चांगलेच ओळखून होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी
हातात हात नसेल कदाचित
पण डोळ्यानेच मला समजून घेत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते
फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो
ती हि कधी हा विचार करत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा
कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो
माझ्या साठी वाट पाहत गेट बाहेर उभी होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी आहे का
पण दुसरे मन मित्ररेखेच्या आतच खेचायचे
ती बिचारी मनात माझी मित्रताच सांभाळत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
माझ्या मित्र मला तीच नाव घेऊन चिडवायचे
एकदा तर गोष्ट हातघाईवर आली
हात खेचून मला घोळक्यातून बाहेर घेऊन आली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.......
..हे नाते निखळ मैत्रीचेच होते
प्रेमापेक्षा अधिक महान होते
कधी एकमेकांकडून तश्या प्रेमाची अपेक्षाच केली नव्हती.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती......
...आता मात्र वाटत मैत्रीचे प्रेमात रुपांतर का होते
तिला स्वच्छंद जगण्याचा हक्क नव्हता का
कि मला मित्र बनवणे का तिची चूक होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.
एकदा मित्रांच्या सांगण्यावरून तिचा हात धरला होता
गम्मत म्हणून केले होते सगळे पण हसे तिचे झाले
एका शब्दा ने मला ती काही बोलली नव्हती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.
आजकाल मी एकटाच जातो कॉलेजला
परवा पासून कोणी वाट हि पाहत नव्हत गेट जवळ
तेव्हा मित्र विचारत होते कि ती कुठे होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.
मला वाटल कि काय करून बसलो
मित्रांचा सांगण्यावर चांगला मैत्र गमावून बसलो
ती काल भेटली तेव्हा म्हणाली सख्या मी तर बाहेर गेली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
क्षमा मागितली असती मी तिची
पण तरी हसून वेडा आहेस का म्हणून गेली
आता पुन्हा ती माझ्या गेट जवळ दिसली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती
मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
5 Mar 2010 - 3:13 am | संदीप चित्रे
स्त्री-पुरूषात निखळ मैत्री असणं आणि अशी मैत्रीण मिळणं ह्यासाठी त्याचं तसेच असा मित्र मिळणं ह्यासाठी तिचं भाग्य चांगलं असावं असतं.
सुदैवाने तुम्हाला असं मैत्र मिळाली आहे तर ती मैत्री तुम्ही दोघंही मनापासून जपा ह्या शुभेच्छा.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
10 Mar 2010 - 7:29 pm | अंकिता
खुप छान आहे तुमची कविता व मैत्री सुद्धा...
10 Mar 2010 - 7:44 pm | अविनाशकुलकर्णी
खुप छान आहे कविता
10 Mar 2010 - 7:48 pm | jaypal
दोघांनाही मैत्रीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
कविता आवडली
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Mar 2010 - 4:01 am | मदनबाण
कविता आवडली.
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
11 Mar 2010 - 9:47 am | राजेश घासकडवी
जमलाय लेख. जागोजाग धृपद घातल्याने मस्त इफेक्ट येतो.
बाकी तुमच्या मैत्रीसाठी शुभेच्छा.
राजेश