दिनान्क ७ फेब्रुवारी २०१० - रविवार. सकाळी ६:१५ वाजता आम्ही घरून निघालो - नल सरोवर ला जाण्यासाठी. नल सरोवर पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ६० किलोमीटर दूर असलेले एक सरोवर. क्षेत्रफळ ११६ चौ. कि. या सरोवराच्या मध्ये छोटी छोटी बेटे आहेत . त्या बेटान्वर आणि सरोवराच्या पाण्यामध्ये पक्षी निरीक्षण करायचे. गुजरातमधले हे सगळ्यात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य. दर हिवाळ्यात येथे खूप वेगवेगळे परदेशी पक्षी स्थलान्तर करून येतात.
आम्हालाही काही दुर्मिळ पक्षी बघायला मिळतील अशी आशा मनात धरून आम्ही निघालो. साधरण तासा सव्वा तासाचे अन्तर. सकाळचा प्रसन्न करणारा गारवा वातावरणात होता. जवळपास पाऊण रस्ता पोचलो आणि सुर्योदय झाला.
साधारण साडेसातला आम्ही तिकीट विन्डोपाशी पोचलो. तिकीते काढून आत गेलो. गाडी पार्क केली तोपर्यन्त काही होडीवाले आजुबाजुला जमा झाले. सरोवर एवढे मोठे आहे की होडी घ्यावीच लागते. थोडी घासाघीस करून तीन तासान्साठी भाव नक्की केला आणि होडीत बसलो. होडी अरर्थातच वल्ह्याची होडी कारण आवाज कमीत कमी व्हायला पाहीजे. आमच्या नावड्याचे नाव होते कमरूद्दीन.
आमचे नशीब जोरावर असले पाहीजे कारण पहिलाच पक्षी दिसला पेलिकन - हे एक भले मोठे बदक असते - जवळपास वीस एक किलो वजनाचे. पण "लाजाळू" होते. त्यामुळे आम्ही थोडे जवळ जाण्याचा प्रयत्न करताच दूर जायचे. शेवटी दुरूनच मिळाला तेवढा क्लोज अप घेतला. तेवढ्यात ते उडालेच.
तिथून थोडे पुढे गेलो आणि दिसले प्रसिद्ध अग्निपन्ख पक्षी म्हणजेच फ्लेमिन्गोज.
मग आम्ही होडी बेटाजवळ नेली आणि खाली ऊतरून थोडे जवळ जाऊन बघायचे ठरवले. तरी जवळ म्हणजे ५० ते ६० फुट अन्तरावरूनच निरीक्षण करावे लागत होते.
अगदी मनसोक्त फ्लेमिन्गोज बघितले. आणि मग ते सगळे थव्याने ऊडाले - त्यावेळचा त्यान्च्या पन्खान्चा तो अफलातून सुन्दर केशरी रन्ग दिसला आणि "अग्निपन्ख" या नावाची सार्थकता पटली.
परत येऊन होडीत बसलो आणि तळ्यातील पुढील फेरी सुरू केली. त्यानन्तर दिसली ब्राम्हणी बदकाची जोडी .
आपण चक्रवाक पक्ष्याचे नाव वाचले किन्वा ऐकले असेल. तोच हा पक्षी. हे तिबेटहून स्थलान्तर करून येतात. या पक्ष्याचा अगदी जवळून फोटो मिळाला. एवढा गोन्डस आणि सुन्दर पक्षी आहे - जणू एखादे सॉफ्ट टॉयच.
आणि तेवढ्यात दिसले Sea Gulls. हा देखील एक अतिशय गोड आणि गोन्डस दिसणारा पक्षी आहे. हे येतात ऑस्ट्रेलियामधून.
पण या गोड दिसणार्या पक्ष्याच्या पन्खामधले बळ दिसते ते त्याने पन्ख पूर्ण पसरल्यावर. ते बघून पटते की ते एवढा लाम्बचा पल्ला लीलया गाठू शकतात.
आत्तापर्यन्त तीन तास झालेले होते. ऊन्हे वाढायला लागली होती. मग आम्ही होडी परत फिरवायला सान्गितली. काठावर आलो आणि लगेच परत जायला निघालो. तर परत जाताना सुद्धा दोन झकास sightings झाली. एक इन्डियन रोलर उर्फ नवरन्ग उर्फ चातक पक्षी दिसला . ह्याचा रन्ग जवळपास किन्गफिशर सारखाच झळाळणारा निळा असतो. फरक असतो तो चोचीच्या आकारामध्ये. किनन्गफिशरची चोच खूप लाम्ब असते तर चातकाची छोटी.
आणि दुसरी दिसली Black Winged Kite.
आणि त्या घारीचे फोटो काढताना मला एक झकास फोटो मिळाला. मी एक क्लोज अप क्लिक करत असतानाच एक बी ईटर उर्फ वेडा राघू जवळून उडाला आणि त्याला बघण्यासाठी म्हणून त्या घारीने मान वळवली. फोटो बघितला आणि वाटले ह्या अशा दुर्मिळ क्षणान्मध्येच आयुष्यातले छोटे पण खूप समाधान देणारे आनन्द साठवलेले असतात.
रविवारी सकाळी ऊठून केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले होते. आज किती दुर्मिळ पक्षी बघायला मिळाले होते. पक्षी जरा लाम्ब होते. आपला camera अधिक चान्गला असायला हवा होता असे वाटले. पण पक्षी निरीक्षणातून मिळालेला आनन्द अवर्णनीय होता.
प्रतिक्रिया
2 Mar 2010 - 9:42 pm | टारझन
क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!
फोटू केवळ सुरेख आहेतंच पण नावं कडेला घेतल्याने अजुन सुरेख झालेले आहेत.
अजुन येऊन द्यात :)
फोटू ला बॉर्डर केली तर अजुन भारी दिसतील :)
- (निसर्ग प्रेमी) फोटोबा ग्राफर
3 Mar 2010 - 1:22 am | प्राजु
मस्त!!
वर्णन आणि फोटोज दोन्ही छान.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
3 Mar 2010 - 1:27 am | शुचि
मला तो चक्रवाक खूप आवडला. वर्णन मस्त जमलय. फोटो सुरेखच.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
3 Mar 2010 - 8:49 am | प्रभो
फोटो आवडले
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
3 Mar 2010 - 3:23 pm | गुपचुप
वर्णन,फोटो सुरेखच.
"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
3 Mar 2010 - 3:40 pm | गणपा
आवडले :)
3 Mar 2010 - 6:28 pm | विसोबा खेचर
वा!
3 Mar 2010 - 6:36 pm | चंबा मुतनाळ
सुरेखच फोटो आले आहेत. माहिती देखील छान. वाचताना जाणवले, आपल्याला किती कमी कळते प्क्षांबद्दल ते!
4 Mar 2010 - 6:17 pm | कपिल रावल
अप्रतिम
4 Mar 2010 - 10:31 pm | मदनबाण
मस्त फोटो...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
4 Mar 2010 - 11:22 pm | अक्षय पुर्णपात्रे
छान चित्रे