बेरंग होळी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
1 Mar 2010 - 7:47 am

आली रंगीबेरंगी होळी
पण झाली आहे महाग पुरणपोळी
झाल्या महाग तांदूळ अन डाळी
महागाई सर्वांचे कानपीळी
रिकामीच आहे सामान्यांची झोळी...

आली रंगीबेरंगी होळी
पण आहे मनी दहशतीची भिती काळी
नेत्यांची राजकारणी खेळी
जातो जनतेचा बळी
कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2010 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होळी आवडली बरं का ! :)

बाकी, रंगीबेरंगी शब्दामधून आम्ही
आनंदाच्या छटा शोधत होतो. :)

-दिलीप बिरुटे

अनामिका's picture

1 Mar 2010 - 2:47 pm | अनामिका

क्ष-सो !
कवितेचे शिर्षक "बेरंग होळी" असे केलेत तर जास्त बरे.
असो सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता आवडली
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

निमिष सोनार's picture

1 Mar 2010 - 4:42 pm | निमिष सोनार

शिर्षक बदलवले आहे. सूचवल्याबद्दल धन्यवाद.
पण, मूळ कवितेत मात्र ,
"आली रंगीबेरंगी होळी" असेच वाक्य आहे, आणि-
त्याखाली वाक्याआधी "पण" शब्द टाकला आहे.
म्हणजे अर्थ अधिक गडद होतो.
धन्यवाद.