एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्‍या भावना

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
26 Feb 2010 - 10:06 am
गाभा: 

एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्‍या भावना हे मला आजतागायत न उलडलेले कोडे आहे. हिंदू त्यांच्या स्वतःच्या देवतांचा किती आदर करतात हे बघितले की इतराना टिंगल करायची संधी मिळणारच. आम्ही कसेही वागू, आम्हाला कुणि नावे ठेवायची नाहीत असा यात मला सूर ऐकू येतो.

गेले कित्येक वर्षे मी राहतो त्या ठिकाणी एका नाल्यात कुणितरी हे एक देऊळ बांधलेले आहे. या देवळाचे हूसेनने चित्र काढले तर हिंदूच्या भावना लगेच दूखावतील. पण वाहत्या गटारा शेजारी देउळ बांधण्याबद्दल कुणी हूं की चूं केलेले मला ऐकू आलेले नाही.

असेच एक दिवस मला भांडारकर रोडवर गोळविलकर लॅब शेजारील कचरापेटीच्या भिंतीवर ही मूर्ती सापडली. ज्याने कुणी ही कचरापेटीत टाकली त्याला नदीत अथवा विहीरीत विसर्जन करायची पण बुद्धी झाली नाही हे आश्चर्य!

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...

प्रतिक्रिया

शेखर's picture

26 Feb 2010 - 11:31 am | शेखर

>> असेच एक दिवस मला भांडारकर रोडवर गोळविलकर लॅब शेजारील कचरापेटीच्या भिंतीवर ही मूर्ती सापडली. ज्याने कुणी ही कचरापेटीत टाकली त्याला नदीत अथवा विहीरीत विसर्जन करायची पण बुद्धी झाली नाही हे आश्चर्य!

युयुत्सुजी, तुम्ही विसर्जन केले का त्या मुर्तीचे? आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत...

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 11:51 am | युयुत्सु

मला विसर्जन करता आले नाही कारण फोटो काढत असताना कचरा गोळा करणार्‍या एका बाईने ती पट्कन ताब्यात घेऊन तीच्या कचर्‍याच्या पोत्यात टाकली आणि काही बोलायच्या आत ती निघून गेली...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

दादा कोंडके's picture

26 Feb 2010 - 12:23 pm | दादा कोंडके

मला विसर्जन करता आले नाही कारण फोटो काढत असताना कचरा गोळा करणार्‍या एका बाईने ती पट्कन ताब्यात घेऊन तीच्या कचर्‍याच्या पोत्यात टाकली आणि काही बोलायच्या आत ती निघून गेली...

म्हणजे तुम्हाला त्या मूर्तीचं पटकन विसर्जन करण्यापेक्षा तीचा फोटो काढणं जास्तं महत्वाचं वाटलं.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 12:38 pm | युयुत्सु

फोटॉ काढण महत्त्वाच नक्की होतं कारण हिंदू त्यांच्या दैवतांचा मान ठेवत नाहीत याचा तो पुरावा होता. भीमाशंकरच्या देवळात असाच एक गणपती कित्येक वर्षे कचर्‍यात होता.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शेखर's picture

27 Feb 2010 - 12:51 am | शेखर

विसर्जन करताना फोटो काढला असतातर पुरावा नाहीसा झाला असता व धाग्याला वजन प्राप्त झाले नसते. बरोबर?
अरे हो .. हिंदुना नावे ठेवायला पण एक कारण कमी झाले असते....

विकास's picture

26 Feb 2010 - 10:25 am | विकास

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...

"गैरफायदा घेत आहेत" हे मान्य केल्याबद्दल आभार! :-)

हिंदू धर्मात (पांथिक दृष्ट्या) अनेक गोष्टी बदलण्याची गरज आहे, त्याबद्दल वादच नाही. टिका करणे आणि प्रत्यक्ष कामाची पण गरज आहेच आहे. म्हणून कुणीही उठून टपलीत मारावी आणि त्याला काही म्हणू नये हे परत ऐकावे ह्याला आक्षेप आहे.

माझा आक्षेप हा हुसैन यांच्या कलेपेक्षा कायद्याच्या असमान वागणूकीस आणि त्यासंदर्भात हिंदूंना नावे ठेवण्याबद्दल आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Dipankar's picture

26 Feb 2010 - 10:39 am | Dipankar

हिंदुना बदलायची गरज तर आहेच हे सत्यच आहे, पण तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा इतर धर्मीयांची नग्न चित्रे रेखाटता तोच न्याय स्वधर्माला का लावत नाही?
राहिल्या तुमच्या गटारा शेजारी बांधलेल्या मंदिरांचा उल्लेख अशी उदाहरणे इतर धर्मियांच्या बाबतीत सुद्धा आपल्या देशात विशेषता मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात तर जागोजागी आढळतील हा आपला भारतीय समाजाचा दोष आहे

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 10:49 am | युयुत्सु

आता माझ्यावर हूसेनची बाजू घेतल्याचा आरोप होईल... पण तरीही.

जेव्हा इतर धर्मीयांची नग्न चित्रे रेखाटता तोच न्याय स्वधर्माला का लावत नाही?

इस्लाममध्ये अल्ला हा निराकार म्हणजे formless आहे. म्हणून त्याचे चित्र काढले जाउ शकत नाही...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

Dipankar's picture

26 Feb 2010 - 11:16 am | Dipankar

http://mfhusainpaintings.wordpress.com/2008/01/01/mf-husains-paintings/

वरील दुव्या चा आधारे कोणीही सांगू शकतो यातील मुस्लीम व्यक्ती (फातिमा, हुसेन यांची आई, मुलगी, एक मुस्लीम स्त्री ) या व्यक्ती पूर्ण कपड्यात आहेत, हुसेन यांनी त्यांच्या नग्न चित्रकलेचा यात का वापर केला नाही?

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 1:45 pm | युयुत्सु

नग्नता आणि कला या बद्दल इस्लामची मते मला ठाउक नाहीत. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकत नाही. पण विमानतळावरील बॉडीस्कॅनिंगला विरोध करणारा फतवा अलिकडेच निघाल्याचे कुठेतरी वाचले. त्यामुळे नग्नता इस्लाम विरोधी असू शकते असा माझा अंदाज आहे ( मला पूर्ण खात्री नाही), पण हिंदू नग्नता विरोधी नाही याची मला पूर्ण खात्री आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE's picture

26 Feb 2010 - 8:39 pm | JAGOMOHANPYARE

एकदा एक प्रभुचा पुत्र फादरला विचारतो... फादर, प्रार्थना करत असताना मध्येच सिगारेट ओढले तर चालते का?
फादरः नाही, सन, ते फार मोठे पाप आहे..
सनः मग सिगारेट ओढत मध्येच प्रार्थना केले तर चालते का?
फादर : हो, चालते ना! प्रार्थनेला बंधन नाही....
:)

तात्पर्यः गटाराजवळ मंदिर की मंदिराजवळ गटार?
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 8:45 pm | युयुत्सु

नाला नैसर्गिक रित्या निर्माण झाला आहे. देऊळ मानवनिर्मित आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विकास's picture

26 Feb 2010 - 10:04 pm | विकास

नाला नैसर्गिक रित्या निर्माण झाला आहे.

तुम्ही दिलेल्या चित्रातील कुठला नाला हा नैसर्गिकरित्या तयार झाला आहेअसे म्हणायचे आहे?

हा प्रतिसाद अवांतर आहे हुसैन विरूद्ध-बाजू असा नाही...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 10:13 pm | युयुत्सु

मी हा नाला ७२ सालापासून पहात आहे पण तेव्हा देऊळ नव्हते. त्यात पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेला पन्हळ अलिकडे २०-२५ वर्षापासून आहे. देउळ कधि बांधले ते ठाऊक नाही.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 10:43 am | युयुत्सु

माझा आक्षेप हा हुसैन यांच्या कलेपेक्षा कायद्याच्या असमान वागणूकीस आणि त्यासंदर्भात हिंदूंना नावे ठेवण्याबद्दल आहे.

उत्तर सोपे आहे, हिंदूनी नावे ठेवायची संधी देऊ नये...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2010 - 11:08 am | कानडाऊ योगेशु

ज्या कुणी ती मूर्ती लोकांच्या नजरेपासुन दूर रहावी म्हणुन बहुदा मुद्दामुन कचरा पेटीत ठेवली त्या मूर्तीला असे आंतरजालावर आणुन तुम्ही नक्की काय साधले युयुत्सु?

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 11:17 am | युयुत्सु

तुम्ही नक्की काय साधले युयुत्सु

हिंदूंच्या खोड्या काढायची संधी इतरांना कशी मिळते याची जाणिव निर्माण करून दिली.

बाकी आपले तर्कशास्त्र अजब आहे. लोकांच्या नजरेपासुन दूर रहावी म्हणून कचरापेटीत मूर्ती टाकणे यात आपल्याला गैर काही वाटत नाही?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शेखर's picture

27 Feb 2010 - 1:05 am | शेखर

लोकांच्या नजरेपासुन दूर रहावी म्हणून कचरापेटीत मूर्ती टाकणे यात आपल्याला गैर काही वाटत नाही?

आपल्याला गैर वाटत नाही का?

आनंद घारे's picture

26 Feb 2010 - 11:27 am | आनंद घारे

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच

मला हुसेनचे समर्थन करायचे नाही, पण देशोधडीला लागून त्याचा काय फायदा झाला हे मात्र समजत नाही. त्याने हिंदू देवतांची काढलेली गैर प्रकारची चित्रे वगळून सुध्दा त्याची इतर असंख्य चित्रे कोट्यवधी डॉलर्सना विकली गेली आहेत. त्यामुळे पैशासाठी हा उद्योग केलेला नसावा. मग त्याने कसला गैरफायदा घेतला?

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

चिरोटा's picture

26 Feb 2010 - 12:14 pm | चिरोटा

मुळात हुसेन ह्यांची ७० वर्षाहून अधिक कारकीर्द कौतुकास्पद्च आहे. हुसेन ह्यांनी १९७० साली काढलेले चित्र १९९६ साली छापून एका हिंदी दैनिकाने त्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशातले त्यावेळचे वातावरणही त्यास पूरक असल्याने 'हुसेन मुद्दामून अशी चित्रे काढतात' ह्या गैरसमजास उत्तेजन मिळाले.
भेंडी
P = NP

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 12:16 pm | युयुत्सु

मग त्याने कसला गैरफायदा घेतला?

खोडी काढून प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा...

युयुत्सु

-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2010 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>खोडी काढून प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा...

-दिलीप बिरुटे

नीधप's picture

26 Feb 2010 - 6:39 pm | नीधप

ह्या चित्रांमुळे प्रसिद्धीच्या झोतात रहायची वेळ हुसेनवर नक्कीच आलेली नाही.
आख्खं कलाजगत त्यांना त्यांच्या चित्रासाठी ओळखतं. वर घारे काकांनी सांगितल्याप्रमाणे हे असले झोत मिळायच्या आधीही त्यांची चित्रं कोट्यावधी रूपयांना भारतात-परदेशात विकली जात होतीच.

सामान्य माणसाला कदाचित यामुळे हे नाव माहीत झालं. पण त्याने हुसेनचा काय फायदा? सामान्य माणूस ज्याला चित्रकलेची तशीही काही पडलेली नसते त्याला हुसेन माहीत झाला काय आणि न झाला काय फरक काय?
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

मदनबाण's picture

26 Feb 2010 - 12:24 pm | मदनबाण

युयुस्तु महोदय गणपती विसर्जन झाल्यानंतर कधी आपण समुद्र किनारा पाहिलेला आहे काय ?
आपण बदलले पाहिजे याचा अर्थ हा होत नाही की कोणीही तथाकथित चित्रकार हिंदुंच्या देवदेवतांना नग्न दाखवण्यास मोकळा झाला...
दोष काढायचे झाल्यास प्रत्येक माणसात दोष काढता येईल आणि धर्मात सुद्धा,पण कलाकृतीच्या नावाने धार्मीक भावना दुखावणे योग्य नाही.

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 4:06 pm | युयुत्सु

"युयुस्तु महोदय गणपती विसर्जन झाल्यानंतर कधी आपण समुद्र किनारा पाहिलेला आहे काय ?"

हो. इथे भेट द्या - http://ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 4:14 pm | युयुत्सु

याचा अर्थ हा होत नाही की कोणीही तथाकथित चित्रकार हिंदुंच्या देवदेवतांना नग्न दाखवण्यास मोकळा झाला...

कालिदासाच्या कुमारसंभवात शंकरपार्वतीच्या समागमाचे (intercourse) रसभरीत वर्णन आहे. आता कालिदासाचं काय करायच?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शुचि's picture

26 Feb 2010 - 5:24 pm | शुचि

कुठे कालीदास आणि कुठे एम एफ हुसेइन. काय बोलता युयुत्सु? कोणाची काय पातळी ते तरी बघा. कोणाचा काय व्यासंग/अभ्यास्/पात्रता ........ गु णवत्ता .........ते तरी बघा.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2010 - 5:28 pm | कानडाऊ योगेशु

कालिदासच कशाला..खजुराहोचे मूर्तिकार व त्यांना प्रोत्साहन देणारे त्याकाळचे राजे महाराजे ह्यांचेही काहीतरी करा ना मग!
विशेष म्हणजे खजुराहो येथील मैथुन शिल्पांची तोडफोड ही इस्लामी राजवटीतच झाली आणि तोच धर्म मिरविणारा एक कलाकार आज त्याच नग्नतेचे उदात्तीकरण करतोय.काय हा विरोधाभास!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2010 - 5:31 pm | कानडाऊ योगेशु

कालिदासाच्या कुमारसंभवात शंकरपार्वतीच्या समागमाचे (intercourse) रसभरीत वर्णन आहे.

ह्याचे मराठी भाषांतर कुठे मिळेल हो!
:?
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि's picture

26 Feb 2010 - 5:42 pm | शुचि

कुमारसंभव वाचताना अंग रोमाचीत होतं , एक उत्कट आनंद मिळतो, आयुष्यभराची भक्ती आणि उत्कटता मिळून जाते. शब्दतीत काहीतरी मिळत. हे कालीदासचं कौशल्य/ कसब.

त्या हुसैन्ची चित्र पहताना काय होत?

युयुत्सु तुम्हाला जर इंद्राचा ऐरावत आणि शाम्भाटची तट्टाणी यात फरक कळत नसेल तर झकली मूठ ठेवा ना राव ..... कशाला हसं करून घेता??????????
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

सन्जोप राव's picture

27 Feb 2010 - 6:08 am | सन्जोप राव

युयुत्सु तुम्हाला जर इंद्राचा ऐरावत आणि शाम्भाटची तट्टाणी यात फरक कळत नसेल तर झकली मूठ ठेवा ना राव .....
समागमाविषयी चर्चा सुरु असताना लिहिलेले वरील वाक्य अश्लील आहे काय युयुत्सु? उत्तर आपण दोघांनी देणे अपेक्षित आहे कारण मूळ वाक्यात माझेही नाव आहे...
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

शुचि's picture

27 Feb 2010 - 6:14 am | शुचि

काय बोलू? स्लँग होत. : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

टारझन's picture

27 Feb 2010 - 7:51 am | टारझन

उत्तर आपण दोघांनी देणे अपेक्षित आहे कारण मूळ वाक्यात माझेही नाव आहे...

हॅहॅहॅ .. मान ना मान .. मै तेरा राव =))

- टि.व्ही. लिंगसिंव्हराव
जोवर अंगात दम आहे , तोवरंच मजा घेण्यात मजा आहे.

शुचि's picture

26 Feb 2010 - 6:12 pm | शुचि

आणि कशाला "रसभरीत" म्हणता? शंकर हे वीर्यस्खलनास अनंत काळ लवत होते म्हणून देवसभा झाली आणि अग्नीस शिव-पार्वतीची समाधी भंग करण्यास पठविण्यात आले (कारण तारकासुरास मारण्यास पुत्र हवा होता) . पार्वती अग्नीस पाहून लाजली आणि शंकरांपासून दूर झाली, शंकरांचे वीर्यस्खलन झाले जे की अग्नीने धरण केले. ........... हे हे रसभरीत????? अहो हा तर इतिहास आहे!!!!!!!!! धिस इस फॅक्ट. ही विकृती नाही.एवढच एवढच वर्णन आहे.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 6:37 pm | युयुत्सु

आठवा सर्ग परत एकदा वाचा. ९१ श्लोक आहेत.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 8:50 pm | युयुत्सु

अहो हा तर इतिहास आहे

या घटनेचा इसवी सन अंदाजे सांगू शकाल का?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शुचि's picture

26 Feb 2010 - 8:56 pm | शुचि

इतिहास म्हणजे पुराण म्हणायचं होतं मला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 9:08 pm | युयुत्सु

जे लोक पुराणाला इतिहास म्हणतात त्यांची गीता कशाला ऐकत बसायचं?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शुचि's picture

26 Feb 2010 - 9:14 pm | शुचि

माफ करा - ती म्हण म्हणून वापरली होती. आपल्याला लागण्यासाठी नाही. संपादीत करते.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 9:20 pm | युयुत्सु

संपादीत करते.

धन्यवाद!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शुचि's picture

26 Feb 2010 - 9:23 pm | शुचि

खरच माफ करा. माझी चूक झाली. धन्यवाद कसला हो? : )
~ शुचि
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

Dipankar's picture

26 Feb 2010 - 3:27 pm | Dipankar

हुसेन हि चूक आणि ती मंडळे(भल्या मोठ्या मूर्ती विसर्जित करणारी) हि चूक, कारण दोघेही मूर्तीची विटंबना करत आहेत. दोघांना हि थांबवणे गरजेचे आहे. आपल्या लोकांच्या (मंडळे) चुका सुधारण्यापेक्षा दुसरांच्या(हुसेन) चुका कशा बरोबर आहेत हे सांगणे आणि दुसरांच्या चुकांचे समर्थन करणे हा परधाजीर्णे पणा आहे.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 4:02 pm | युयुत्सु

दुसरांच्या चुकांचे समर्थन करणे हा परधाजीर्णे पणा आहे

एकदम मान्य!

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सन्जोप राव's picture

26 Feb 2010 - 5:11 pm | सन्जोप राव

मूर्तीत देव पहाणारे हिंदू धन्य, त्या मूर्तींची विटंबना (म्हणजे मोडतोड) झाली की दुखावल्या जाणार्‍या भावना धन्य, एका कुणीतरी काही नग्न चित्रे काढली म्हणून रसातळाला जाणारा धर्म धन्य, असले काहीतरी केले की लोक उफाळून उठतील हे माहिती असूनही हा खोडसाळपणा करणारे कलाकार धन्य....
हरीफ-ए-मतलब-ए-मुश्किल नहीं, फुसून-ए-नियाज
दुआ कुबूल हो यारब! कि उम्र-ए-खिज्र-दराज
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

नि३'s picture

26 Feb 2010 - 5:45 pm | नि३

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...

युयुत्सु साहेब ,

आपण आपल्या दैवतांचा आदर करत नाही (तुम्ही जे दोन SO CALLED उदाहरण दिले त्यावरुन)
त्याचा अर्थ हा नाही कि , तो विक्रुत हुसैन कलेच्या नावाखाली काहीही करो....

त्याच्या काही पेंटिग्स च वर्णन इथे करत आहे..
मला लिहताना आणि टाइप करताना अत्यंत वेदना होत आहे पण काय कराव तुमच्यासारख्या लोकांना त्याशिवाय कळ्तच नाही ना..

“”"A nude Ravana with a nude Sita in his lap, alongwith a demon-headed Hanuman watching.
- A nude Hanuman with an erection that is pointing towards a nude Sita and nude Ram
- Nude Parvati having sex with Nandi, while Shiva watches with an erection
- Nude images of Lakshmi, Durga, Saraswati in various positions, sometimes copulating with animals, sometimes with demons, etc.”"

बोला आता काय म्हणता आपण युयुत्सु साहेब...

प्रतिसाद संपादीत

---नि३.

शुचि's picture

26 Feb 2010 - 9:15 pm | शुचि

नि३ जाऊ द्यात त्रागा करून घेऊ नका. ते लिहूनही काही लोकाना कळत नाहीये.
कशाला रक्त जळवता. आपल्या वेदनांशी सहमत. अशी चित्रे देव करो कधी दृष्टीस पडू नये.

ॐ भद्रम कर्णेभि शृणुयाम देवा
भद्रम पश्येमाक्ष भिर्यजत्रा: भद्रम पश्येमाक्ष भिर्यजत्रा: भद्रम पश्येमाक्ष भिर्यजत्रा:

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 7:16 pm | युयुत्सु

बोला आता काय म्हणता आपण युयुत्सु साहेब...

मी एवढेच म्हणेन की नावडतीचं मीठ अळणी...!

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

हा खूप जुना पण सदाहरित विषय आहे! कधीच संपत नाहीं.
पण ही चित्रं काढल्यावर हुसेनवर केस लावली होती व त्यामुळे हुसेन दुबईला पसार झाले होते. अजून तिथेच आहेत कीं परत आले माहीत नाहीं.
त्यांचा तिथला खर्च कोण करत होतं याबद्दलपण आलं होतं पण आता आठवत नाहीं.
पण हा इसम इतका वेळ देण्यायोग्य नाहीं. कारण कायद्याचा सामना करायच्या ऐवजी पळून गेलेल्याची काय ती किंमत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

पक्या's picture

27 Feb 2010 - 12:02 am | पक्या

हो, ते काही काळ दुबई ला होते ..हे बरोबर आहे.
माझी एक नात्यातील बहीण दुबई ला असते. ती रहात असलेल्या बिल्डींग (गोल्डन सँड परिसर) मधे तिला ते एकदा लिफ्ट मधून बाहेर पडताना दिसले होते (२००६ मधे बहुधा). नंतर चौकशी केल्यावर समजले की ते तिथे सध्या वास्तव्यास आलेले होते..वरच्याच मजल्यावरील एका फ्लॅट मध्ये.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

सुधीर काळे's picture

26 Feb 2010 - 10:11 pm | सुधीर काळे

ती मूर्ती देवाचीच कशावरून? एकाद्या दमल्या-भागल्या वाटसरूचा पुतळाही असू शकेल!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

टारझन's picture

26 Feb 2010 - 11:45 pm | टारझन

अंमळ मजेशिर प्रतिसाद ... ह्या युयुत्सुला ही वेळ नाही असले डुचमळे धागे काढण्यावाचून .. आणि पब्लिकलाही रहावत नाही असल्या वांझोट्या चर्चा झाडून :)
हुसेन बसलाय तिकडे .. चित्र काढत :)

हुसेन येडझवा आहेच :) पण बाकी हिंदुंच्या भावना दुखवायला काही कारण लागत नाही , युयुत्सु चा एखादा धागा ही पुरतो !

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:10 am | विसोबा खेचर

आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...

करेक्ट!

तात्या.

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 2:36 pm | शानबा५१२

त्या पागलने काय हे तुमचे फोटो पाहुन ती चित्रे काढली का?

आणि हे फोटो व तो MF,,,...हाहाहाहा....ह्यांचा संबंध काय?

तुम्ही दोन अलग लेख लिहायला हवे होते.