अशीच जर आमुची आई असती........

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in कलादालन
20 Feb 2010 - 8:54 pm

अशीच जर आमुची आई असती........

असे हो कोणी दिनीचा तो वार
लागला होता महाराजांचा दरबार
आमचे मध्ये राजे भोवती सरदार
स्वराजाचा चाले असा कारभार जी........ जीजी

शौर्यी मोठे हो सरदार आले
आमच्या राज्यावरी जीव घाले
माग कोड प्रशंसा केले
नजराणे किमती पेश केले

एक नवा नवखा तो सरदार आला
मुजरा वाकुनी शिवबाला केला
त्याने फर्मावले हो सेवकाला
आत आणा त्या बंदी बालेला

बाला होती मोठी रूपवान
नाजूक बांधा यौवनी गोरी पान
शिवबाला उमजेना ध्यान
माझा सरदार कि हा सैतान

तेव्हा माझा शिवबा काय म्हणाला
" अशीच जर आमुची आई असती, आम्ही हि सुंदर जाहलो असतो छत्रपती "

आणि अचानक ..........

राजाचा राग अनावर झाला
क्षणी मुक्त केली बालेला
साम बजाविले सरदाराला
फर्मान सोडलं साऱ्या दरबारा

राजा गोड माझा त्याची कीर्ती
अध्याय लिहू पाने कमी पडती
आज कलयुगी ह्या घटना घडती
राजा थोर छत्रपती मला स्मरती..............

-मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

कविता

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

20 Feb 2010 - 10:32 pm | हर्षद आनंदी

गोर्‍या माकडांची ऊठसुट धुणी धुणार्‍या देशद्रोही कुत्र्यांनो, सहिष्णुतेच्या फसव्या बुरख्याखाली धर्मांध माकडांना पाठीशी घालणार्‍या धर्मद्रोही डुकरांनो, तुमच्या आख्ख्या विश्वाच्या ईतिहासात अशी दुसरी घटना शोधुन दाखवा ....

ही आणि अश्या अनेक घटनांचा कर्ता करविता असलेल्या माझ्या छत्रपतींना मानाचा मुजरा..

त्रिवार..दशवार..शतवार मुजरा!!!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

शुचि's picture

21 Feb 2010 - 1:06 am | शुचि

>>राजा गोड माझा त्याची कीर्ती
अध्याय लिहू पाने कमी पडती
आज कलयुगी ह्या घटना घडती
राजा थोर छत्रपती मला स्मरती>>

छान आहे कविता
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

फ्रॅक्चर बंड्या's picture

22 Feb 2010 - 12:24 pm | फ्रॅक्चर बंड्या

फार छान
binarybandya™