आज विसरुनी यत्न कालचे
नवदिनी गुंतलो आज पुन्हा
नकारघंटा वाजत राही
तरी मनी आशा हा काय गुन्हा
भूमीपुत्र हा असा मी अडलो
संथता,अनुबंध,अतिक्रमणात अडकलो
पात्रता निपुणता धाब्यावर बसवली
आता मात्र प्रभूरामाची वाणी उमगली
असे हे कलयुग आज उगवले
काग मोत्य कंकर हंस गमले
परकीयांचे गमभन रुजले
राज्कृत्या राजनितीस रमले
आज वाचा हि फोडत येथे
युवाशक्ती महायुवाच नेते
अतिक्रमणास धड्भू धम लावू
नैपुण्य, पात्रता शिरोधिनी पाहू
- मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
22 Feb 2010 - 12:33 pm | राधा१
कविता छान आहे पण ती कलादालन मध्ये का आली?