एके दिवशी ऑफिसमधून येताना माझा सहकारी मित्र प्रदीप मला म्हणाला "अरे मनिष, मलाव तलाव मध्ये मी कमळे फुललेली बघितली. " हा मलाव तलाव म्हणजे आमच्या घरापासून १ ते १.५ किलोमीटर दूर असलेली एक पाणथळीची जागा. त्याच्या भोवती एक बगिचा बनवलेला. जॉगिन्ग साठी सोय केलेली.
आता इतक्या जवळ असलेल्या जागी फुललेली कमळे बघायची सन्धी मिळते आहे म्हटल्या वर आम्ही ठरवले की रविवारी सकाळी उठून तिकडे जायचे. एरवी रविवार म्हणजे झोप पूर्ण करण्याचा दिवस. पण त्या रविवारी सकाळी साडे सातला आम्ही घराबाहेर पडलो. मलाव तलाव ला पोहोचलो. तिकडच्या रखवालदाराला सान्गितले की आमहाला काही फोटो काढायचे आहेत. त्याची सम्मती मिळवून आम्ही आत शिरलो.
पहिला फोटो काढला पावडर पफ या फुलाचा.
त्यानन्तर लाल्गुलाबी रन्गाची छोटी फुले दिसली. त्यानन्तर दिसली आपली ओळखीची शन्खासुरची फुले.
आणि त्यानन्तर आपले चिराट्याचे (दिवाळीत आपण नरकासूर म्हणून जे फळ फोडतो ते ) फुल. हे आकारानी जेममतेम आठ आण्याच्या नाण्याएवढे असते.
आता काही फुलपाखरे.
आणि शेवटी ज्यासाठी आम्ही आलो होतो, ती कमळे दिसली. बरीचशी पाण्यात बरीच आतमध्ये होती. एकच जरा काठा जवळ होते. आम्ही थोडेसे खाली उतरलो आणि देवाच्या क्रुपेने आम्हाला मनपसन्त फोटो काढता आले.
आत्ता पर्यन्त जवळपास दोन अडीच तास लओटले होते. प्रचन्ड खुश होवून आम्ही परत निघोलो.
प्रतिक्रिया
17 Feb 2010 - 10:42 pm | मदनबाण
व्वा...काय झकास फोटो आहेत. :)
शेवटुन दुसरा फोटु फार आवडला.
कृपया कॅमेराचे नाव लिहीत जा,,,कधी नविन कॅमेरा घ्यायचा इचार झाला तर त्यावेळी अशा नावांचा उपयोग होऊ शकेल. :)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
17 Feb 2010 - 11:01 pm | शुचि
आपल्याला ते काळंभोर फुल्पाखरू अवडलं ....... अन केशरी ही अन फुलंही ...... हा हा!!! सगळेच फोटो एकसे एक.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
20 Feb 2010 - 3:54 am | राजेश घासकडवी
विशेषत: पहिल्या चार चित्रांमध्ये - आवडले.
शेवटून दुसरा फोटो खूप आवडला. अतिशय रेखीव आला आहे. त्याची अंधुक पार्श्वभूमी मोनेच्या वॉटर लीलीज ची आठवण देऊन गेली.
http://en.wikipedia.org/wiki/File:Monet_-_Nen%C3%BAfares.jpg
http://en.wikipedia.org/wiki/File:Nympheas_71293_3.jpg
जर पार्श्वभूमी जास्त असलेले फोटो काढलेत तर ते पहायला आवडतील.
एक छोटी सूचना: फुलांमधनं आपल्याला डोळ्यांना दिसतो त्यापेक्षा अधिक प्रकाश (यु.व्ही. बहुतेक) येतो असं माझ्या फोटोग्राफर मित्राने सांगितलं होतं. त्यामुळे ती जास्त भगभगीत (ओव्हरएक्स्पोज्ड) दिसतात. तसं शेवटच्या काही चित्रांतून जाणवलं. कमी एक्स्पोजर वापरलं तर रंग जास्त सखोल येतील.
20 Feb 2010 - 11:19 am | Manish Mohile
प्रिय राजेश,
सूचनेबद्दल आभार. पुढील छायचित्रान्च्या वेळी अवश्य तुमच्या सूचना अमलात आणण्याचा प्रयत्न करीन. पुढच्या एक दोन दिवसात काही निसर्ग चित्रे (अधिक पार्श्वभूमीसहीत) प्रकाशित करीन म्हणतो.
प्रिय सुनील,
मलाव तलाव अहमदाबाद येथे आहे.
प्रिय मदन बाण ,
माझा camera - Canon 10 megapixel 6x optical zoom, 24x digital zoom. अजून जास्त चान्गल्या configuration चा घ्यायची ईच्छा आहे.
20 Feb 2010 - 8:03 am | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त आलेत फोटो.:)
20 Feb 2010 - 10:54 am | सुनील
सगळेच फोटो आवडले.
हा मलाव तलाव नक्की कोठे आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Feb 2010 - 9:56 pm | विनायक रानडे
फारच छान. अती रेखीव आले आहे. रंग बरोबर आहेत. फुलांची छायाचित्रे अशी मॅक्रो पध्दतीचीच असावी. तुमचा कॅमेरा ऍन्गल योग्य आहे.